Home » समुद्र तळाशी टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीच्या दुर्घटनेचे काय असेल कारण?

समुद्र तळाशी टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीच्या दुर्घटनेचे काय असेल कारण?

by Team Gajawaja
0 comment
titanic submarine missing
Share

१९१२ मध्ये समुद्रात बुडालेल्याटायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीच्या दुर्घटनेत पाच अरबपतींचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी काही दल तयार करण्यात आले होते. अमेरिकेतील कोस्टगार्ड्सचे असे म्हणणे आहे की, २२ जूनला पाणबुडीचे अवशेष हे टायटानिकजवळ मिळाले. जे कॅनाडात स्थानिक ठिकाणाहून ऑपरेट होणाऱ्या UAV ने जप्त केले आहेत. टायटन पाणबुडीला ऑपरेट करणारी कंपनी ओशनगेट यांनी याची पुष्टी केली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, या घटनेत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांचा सुद्धा समावेश आहे. काही रिपोर्ट्समध्ये या दुर्घटनेचे कारण कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन असल्याचे सांगितले जात आहे. तर कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे नक्की काय याच बद्दल आपण जाणून घेऊयात.(Titanic Submarine Missing)

कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे काय?
कॅटास्ट्रॉफिक इम्लोजन शब्दाचा वापर अशा वेळी केला जातो जेव्हा पाणबुडीच्या आतमधील भागात अशा प्रकारे दबाव निर्माण होतो जो अत्यंत पूर्णपणे डॅमेज होण्याची स्थिती निर्माण करतो. एचटीच्या रिपोर्ट्सनुसार, जेव्हा एका मर्यादित ठिकाणी गरजेपेक्षा अधिक दबाव वाढला जातो तेव्हा ती स्थिती सांभाळणे अतिशय मुश्किल होते. तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. हेच आतमधील विस्फोटाचे कारण ठरु शकते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये सुद्धा असा दावा केला गेला आहे. अवशेषाच्या सुरुवातीच्या तपासात असे समोर आले की, पाणबुडीच्या आतमधील स्फोटाच्या कारणास्तवच पाणबुडी बुडाली होती. परंतु अद्याप अवशेषांच्या तपासाचे रिपोर्ट समोर आलेले नाहीत.

किती खोलवर जाण्याची क्षमता होती?
टायटन पाणबुडीची क्षमता पाण्यात ४ हजार मीटर खोल जाण्याची असल्याची सांगितली गेली. ऐवढ्या खोलवर गेल्यानंतर पृष्ठभागाच्या तुलनेत पाणबुडीवर दबाव हा २९६ पटींनी वाढला जातो. जर पाणबुडी अधिक खोलवर गेली तर दबाव अधिक वाढल्यास स्फोट होण्याचा धोका वाढला जातो. दरम्यान पाणबुडी समुद्रात पाठवणारी कंपनी ओशियनगेट यांचे असे म्हणणे आहे की, अवशेषांच्या विस्तृत तपासानंतर असे सांगितले जाईल की, दुर्घटनेचे खरं कारण काय आहे. (Titanic Submarine Missing)

जेव्हा त्यांच्यासोबत संपर्क तुटला गेला तेव्हा सर्च अभियान सुरु केले. या अभियानात अमेरिका आणि कॅनडाच्या नौसेनेसह काही खासगी एजेंसियांचा समावेश करण्यात आला.असा दावा केला जात होता की, या पाणबुडीत ९६ तासांचे ऑक्सिजन होते. या दाव्यावर तज्ञांनी आधीच चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा- 27 वर्षांआधी टायटानिकचे सापडले होते अवशेष, पण आजवर बाहेर का काढले नाहीत?

चार दिवस सातत्याने शोध घेतल्यानंतर पाणबुडी मिळाली नाही. अमेरिकेन कोस्ट गार्डने आपल्या विधानात असे सांगितले की, मध्य अटलांटिक महासागराजवळ पाणबुडीचे अवशेष मिळाले आहेत. हे ठिकाण त्या ठिकाणापासून जवळ होते जेथे १९१२ मध्ये टायटानिक जहाज बुडाले होते. परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही की, अवशेष हे त्याच पाणबुडीचे आहेत जी रविवारी बेपत्ता झाली होती. कंपनीचे असे म्हणणे आहे की, विस्तृत तपासानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.