Home » नासाला भीती कोणाची ?

नासाला भीती कोणाची ?

by Team Gajawaja
0 comment
Three Gorges Dam
Share

नासामधील शास्त्रज्ञ सध्या धास्तावले आहेत. त्यांच्या या भीती मागे आहे, चीनमधील महाकाय असे धरण. जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या शक्तीची नासाच्या शास्त्रज्ञांना भीती वाटू लागली आहे. चीनमधील थ्री गॉर्जेस धरण हे पूर्णपणे पाण्यानं भरल्यावर त्याच्या पाण्याचा भाराचा जोर पृथ्वीवर येणार असून त्यामुळे पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडणार असल्याचा नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. गेले काही वर्ष नासाच्या शास्त्रज्ञांची एक टीम चीनमधील थ्री गॉर्जेस धरणाचा अभ्यास करीत आहे. मात्र यातून स्पष्ट झालेल्या कारणामुळे ही टिम घाबरली आहे. या धरणाचा पृथ्वीवरील सर्वच मानवजातीला धोका होऊ शकतो, असा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. (Three Gorges Dam)

चीन आपल्या देशात सर्वात अवाढव्य गोष्टी करण्याचा अट्टहास करीत असते. हाच अट्टहास आता फक्त चीनमधीलच नाही, तर जगभरातील नागरिकांसाठी धोकादायाक ठरणार आहे. चीन जगातील नैसर्गिक संसाधने आपल्या ताब्यात करण्याचा प्रयत्न करीत आहे. यातूनच चीनमध्ये थ्री गॉर्जेस धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम झाल्याची शंका नासाच्या शास्त्रज्ञांना होता. त्यामुळे या शास्त्रज्ञांनी थ्री गॉर्जेस धरणाचा अभ्यास केल्यावर त्यातून धक्कादायक परिणाम समोर आले आहेत. नासासोबत आयएफएल सायन्सचाही अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार थ्री गॉर्जेस धरण भविष्यात जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे. हे धरण मध्य चीनमधील हुबेई प्रांतात आहे. युरेशियातील सर्वात मोठी नदी, यांगत्सेवर हे अवाढव्य धरण उभारण्यात आले आहे. (International News)

जवळपासच्या तीन खोऱ्यांतून पाणी येऊन या धरणाला मिळते. इथेच पाण्यावर टर्बाइन फिरवून वीज निर्मिती केली जाते. या धरणाचे काम 2006 मध्ये पूर्ण झाले. 2012 पर्यंत धरणावर बसवलेला पॉवर प्लांट पूर्ण झाला आणि पूर्णपणे कार्यान्वितही झाला. धरणातून निर्माण होणा-या प्रत्येक मुख्य वॉटर टर्बाइनची क्षमता 700 मेगावॅट आहे. धरणाच्या 32 मुख्य टर्बाइनची क्षमता दोन लहान जनरेटर सह एकत्रित केल्याने, थ्री गॉर्जेस धरणाची एकूण विद्युत निर्मिती क्षमता 22,500 मेगावॅट आहे. चीनचा मानबिंदू असलेल्या या धरणाच्या शक्तीचा अंदाज नासाला 2005 मध्ये आला. (Three Gorges Dam)

त्यामागे 2004 मध्ये आलेला अत्यंत शक्तिशाली भूकंप होता. 2002 मध्ये आलेल्या भुकंपासोबत हिंद महासागरात आलेल्या विनाशकारी त्सुनामीमुळे पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम झाल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांना आढळून आले. तेव्हा नासानं याबाबत अभ्यास सुरु केला. त्यासंदर्भात नासानं अहवाल प्रसिद्ध केला. यात टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूकंप झाल्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणावर देखील परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट करण्यात आले होते. नासाच्या शास्त्रज्ञांना आढळले की, 2004 च्या भूकंपाने पृथ्वीचे वस्तुमान वितरण बदलले आणि दिवसाची लांबी 2.68 मायक्रोसेकंदांनी कमी केली. हा अहवाल धक्कादायक होता. त्यातूनच चीनमध्ये उभारलेल्या थ्री गॉर्जेस धरणातील पाण्याच्या साठ्याचा अंदाज शास्त्रज्ञांना आला. 2005 मध्ये नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. बेंजामिन फोंग चाओ यांनी सांगितले की, थ्री गॉर्जेस धरणात 40 घन किमी पाणी साठू शकते. (International News)

या पाण्याच्या वजनामुळे पृथ्वीवरील दिवस 0.06 सेकंदांनी वाढवू शकतो. या बदलामुळे पृथ्वीच्या ध्रुवाची स्थिती दोन सेंटीमीटरने बदलू शकते. धक्कादायक म्हणजे, याचा मानवी जीवनावर परिणाम होत असून हवामान बदलही मोठ्या प्रमाणात होत आहेत. आधीच वाढत्या तापमानामुळे, ध्रुवीय बर्फाच्या वितळण्यामुळे, उष्णकटिबंधीय समुद्रांच्या विस्तारामुळे, ध्रुवांपेक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तावर जास्त वस्तुमान जमा झाले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होत आहे. या सर्वात थ्री गॉर्जेस धरणातील पाणी साठ्याचाही परिणाम झाला आहे. थ्री गॉर्जेस धरणातून 22,500 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येते. हे जगातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र आहे. सन यात-सेन यांनी 1919 मध्ये यांगत्झी नदीवर मोठ्या धरणाची कल्पना केली. (Three Gorges Dam)

======

हे देखील वाचा : लंडनमध्ये आला होता बिअरचा महापुर !

======

पण प्रत्यक्ष धरणाचे डिझाईन 1944 मध्ये अभियंता जॉन एल. सॅव्हेज यांनी केले. मुख्य म्हणजे, हे धरण अमेरिकेच्या सहकार्यांतूनच उभे राहिले आहे. सुमारे 54 चिनी अभियंते धरण बांधणीच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. आता हे अवाढव्य धरण चीनची शान असले तरी या धरण भागातील जनतेसाठी सर्वात धोकादायक ठरत आहे. कारण या सर्व भागात भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय या भागात येणा-या भुकंपाची संख्याही वाढली आहे. एकूण चीनमधील थ्री गॉर्जेस धरण चीनमधील जनतेसाठीही डोकेदुखी ठरले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.