हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात 22 मार्च 2023 पासून होत आहे. यावेळी चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला हिंदु धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवसापासून नऊ दिवस चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव साजरा करण्यात येतो. 22 मार्च रोजी सुरु झालेला चैत्र नवरात्रौत्सव 30 मार्चपर्यंत साजरा होईल, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी घरात कलशाची स्थापना करुन चैत्र नवरात्रीची(Chaitra Navratri) पुजा करण्यात येईल.
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र नवरात्रीची (Chaitra Navratri) सुरुवात दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून होते. नवरात्रीचा हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा विधीपूर्वक केली जातेच शिवाय देवीसाठी 9 दिवसांचा उपवासही पाळण्यात येतो. यावर्षी साज-या होणाऱ्या या चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण यावर्षी या नऊ दिवसात मोठा शुभ योग होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप शुभ असणार आहे. त्यामुळे नवीन हिंदू नववर्ष आणि नवरात्रीमध्ये काही लोकांना चांगले परिणाम मिळतील, असे मान्यवर ज्योतिषाचार्यांनी सांगितले आहे. चैत्र नवरात्री चैत्र (Chaitra Navratri) प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि नवमी तिथीपर्यंत चालते. यावर्षी चैत्र नवरात्र 22 ते 30 मार्च दरम्यान साजरी होत आहे. 22 मार्च रोजी घटस्थापना होणार असून 30 मार्च रोजी रामनवमीला हे घट उठवले जाणार आहेत. या चैत्र नवरात्रीला सकाळपासूनच कलश स्थापन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाईल. दुस-या दिवशी देवीची ब्रह्मचारिणीच्या रुपात पूजा केली जाईल. तिस-या दिवशी चंद्रघंटाची पूजा करण्यात येईल. चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पुजा करण्यात येईल. पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजा करण्यात येईल. सहाव्या दिवशी माँ कात्यायनीची पूजा करण्यात येईल. तर सातव्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा होईल. आठव्या दिवशी महागौरीची पुजा होईल. 30 मार्च रोजी नववा दिवस असून यावेळी माँ सिद्धिदात्रीची पूजा होईल.
चैत्र महिन्यातील ही नवरात्रीची (Chaitra Navratri) पुजा शुभ मानली जाते. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. घरातील वातावरण मंगलमय होते, अशी धारणा आहे. चैत्र नवरात्रीच्या उत्सवात, काही भाविक नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये माता दुर्गा भक्तांसोबत असते. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दरवाजावर मात लक्ष्मीचे शुभ पादचिन्ह, स्वस्तिक आणि ओम यांची चिन्हे लावण्यात येतात. तसेच दारात रांगोळी काढण्यात येते आणि दरवाज्यावर विविध सुगंधी फुलांची तोरणे लावून देवीचे स्वागत करण्यात येते. या नऊ दिवसात कलश स्थापनेलाही खूप महत्त्व आहे. घराच्या ईशान्य दिशेच्या कोप-यात देवीच्या नावाने कलश ठेऊन त्याची पूजा करण्यात येते. नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करून त्यांना अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथींना मुलींची पूजा केल्याने माता दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी धारणा आहे. काही भाविक नवरात्रीच्या दिवसात अखंड दिवा लावतात. नवरात्रोत्सवात या अखंड ज्योतीला विशेष महत्त्व आहे. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसात कांदा आणि लसूण खाणेही टाळले जाते. नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे देवीच्या या उत्सवाचे पावित्र्य ठेवण्यासाठी काही भाविक उपवास ठेवत नसले तरी ते मांसाहार टाळतात.
=======
हे देखील वाचा : गुढी पाडवा का साजरा केला जातो?
=======
नवरात्रीचे (Chaitra Navratri) हे नऊ दिवस भाविक उपवास करतात. अशावेळी फक्त फळांचा आधार घेऊनही काही भाविक रहातात. अशांनी ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा फळांचा आहारात समावेश करावा. कलिंगड, पपया, अननस अशा फळांचा आहारात समावेश असावा. तसेच शहाळ्याचे पाणी नित्य घेतल्यास उपवासाचा त्रास जाणवणार नाही.
सई बने