Home » ‘या’ ठिकाणी आहे 108 खांबांचे शिवमंदिर

‘या’ ठिकाणी आहे 108 खांबांचे शिवमंदिर

by Team Gajawaja
0 comment
Shiva Temple
Share

भारतीय वास्तुशास्त्राचे महत्त्व सांगणारे एक मंदिर गुजरातच्या डुंगरपूर येथे आहे.  12 व्या शतकातील हे शिवमंदिर जवळपास 1000 वर्षापूर्वी उभारले असल्याची माहिती आहे.  या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, या मंदिरातील 108 खांब.  भगवान शंकराचे हे भव्य शिवमंदिर 1000 वर्षापूर्वी तीन मजली बांधण्यात आले होते.  एवढ्या वर्षानंतरही या मंदिराची भव्यता जराही कमी झाली नाही.  या भागात अनेक विनाशकारी भुकंप आले आहेत.  या भुकंपावरही या मंदिरानं मात केली आहे.  विशेष म्हणजे, हे मंदिर उभारण्यासाठी कुठल्याही अन्य साधनाचा वापर करण्यात आलेला नाही.  दगड एकमेकांमध्ये जोडून हे मंदिर उभे करण्यात आले आहे.   12 व्या शतकातील हे भव्य गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.  या मंदिरातील भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि मंदिराचे वास्तुशास्त्र बघण्यासाठी आजही हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात.  (Shiva temple)

गुजरातच्या डुंगरपूरच्या ईशान्येला 20 किमी अंतरावर सोम नदीच्या काठावर वसलेले देव सोमनाथ मंदिर हे शिवभक्तांसाठी वंदनीय आहे. अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. या देव सोमनाथ मंदिरात दोन स्वयंभू शिवलिंग आहेत.  याशिवाय अन्य देवी-देवतांच्या मूर्तीही आहेत.  हे मंदिर राजा अमृतपाल देव यांनी बांधले होते.  देव गाव आणि सोम नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर नदिच्या नावावरुन देव सोमनाथ मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिराचे वैशिष्ट तेथील 108 खांबांमध्ये आहे. या मंदिराची रचना गुजरातमधील सोमनाथ मंदिरासारखी असल्याने हे मंदिर सोमनाथ मंदिराची प्रतिकृती म्हणूनही ओळखले जाते.  या तीन मजली मंदिरातील  108 खांब हे कलाकृतीनी परिपूर्ण असेच आहेत.  प्रत्येक खांबांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिर पूर्णपणे दगडाचे असून या दगडी बांधकामात दगड कापून एकमेकांना घट्ट बांधले आहेत.  दगडाच्या खाच्यात हे खांब घट्ट बसवण्यात आले असून त्यावर हा सर्व तीन मजली मंदिराचा डोलारा हजार वर्षापासून भक्कमपणे उभा आहे.  या तीन मजली मंदिरात गर्भगृहसभामंडप यांचा समावेश आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत. मंदिरात काही ठिकाणी 14व्या शतकातील अस्पष्ट शिलालेख आहेत.  मंदिराच्या छतावरही सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हे भव्य तीन मजली मंदिर (Shiva temple) एका रात्रीत बांधण्यात आले होते.  मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेली दोन शिवलिंगेही भाविकांना आश्चर्यचकीत करतात.  कारण बहुतांश शिवंदिरात एकच शिवलिंग असते.  या मंदिरात मात्र दोन शिवलिंग आहेत, आणि त्यामागचा हेतू जाणण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे.   मंदिराच्या परिसरात अनेक शिलालेख आहेत.  या शिलालेखांचा अभ्यास करुन मंदिराच्या बांधणीचा हेतूही जाणण्यात येत आहे.  (Shiva temple)

मंदिर परिसरात असलेले सर्व शिलालेख हे पांढ-या संगमरवरी दगडावर कोरण्यात आले आहे.  हजारो वर्षापूर्वी अशाप्रकारचा संगमरवर या भागात मिळत होता का आणि नसेल तर तो कुठून आणला हे जाणण्याचाही आता प्रयत्न करण्यात येत आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्तीची मोठी मूर्ती आणि प्रवेशद्वारावर भगवान शिवाचे वाहन नंदीची दगडी मूर्ती स्थापित केलेली आहे.  या मुर्तीही भव्य आणि तीन मजली मंदिराला साजेशा आहेत. (Shiva temple)

या शिवमंदिराचे (Shiva temple) आणखी एक गुढ म्हणजे, या मंदिरावर असलेले तळहाताचे ठसे.  या मंदिराच्या भिंतींवर तळहातांचे ठसे आहेत.  हे ठसे सती गेलेल्या महिलांचे असल्याचे सांगण्यात येते.  मात्र शिवमंदिरात अशापद्धतीनं ठसे काढल्याची पद्धत नाही, त्यामुळे या ठशांबाबतही अभ्यास करण्यात येत आहे.  

=======

हे देखील वाचा :  न्याय देवता म्हणून ‘गोलू देवता’ प्रसिद्ध

=======

या मंदिराच्या परिसरात भगवान शंकराशिवाय अन्य देवदेवतांच्याही मुर्ती आहेत.  या मुर्तीही अत्यंत भव्य आणि कोरीव आहेत.  या मुर्ती ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत, त्यामागेही अत्यंत सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.   त्यामुळेच हे मंदिर जेव्हा उभारले तेव्हा परिसरात अत्यंत संपन्न असा समाज रहात होता, असे सांगण्यात येते.  आजही या मंदिरात (Shiva temple) महाशिवरात्रीला हजारो भाविक जमतात.  सध्या चालू असलेल्या अधिक महिन्यात आणि सुरु होणा-या श्रावण महिन्यासाठी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.