केरळात एक वादग्रस्त राहिलेला हत्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका स्थानिक मंदिराने त्याने वार्षिक उत्सावात भाग घेण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक बोली लावली होती. ५७ वर्षीय या हत्तीसाठी लोकांच्या मनात भीती, आनंद आणि करुणा सर्वकाही आहे. या हत्तीचे नाव थेचिकोट्टुकावु रामचंद्रन असे आहे. भारतातील हा सर्वाधिक मोठ्या बांध्याचा हत्ती सांगतिले जाते. हा हत्ती १०.५३ फूट लांब आणि राजशाहे थाट असलेला आहे. अन्य हत्तींपेक्षा तो अधिक आकर्षक ही दिसतो. (Thechikottukavu Ramachandran Elephant)
त्रिशूर जिल्ह्याने थेचिक्कोट्टुकावु मंदिर ट्र्स्टचे मालकी हक्क असलेले असे शेकडो हत्ती आहेत. ज्यांना मंदिराच्या उत्सवांमध्ये पट्टे दिले जातात. रामचंद्रन सुद्धा त्यापैकीच एक आहे. फेसबुकवर हत्तीच्या फॉलोअर्सची संख्या ही खुप अधिक आहे. हा हत्ती हिंसा प्रदर्शनासाठी सुद्धा कुख्यात आहे.
टीकाकरणाऱ्यांनी असा आरोप लावला आहे की, गेल्या चार दशकांमध्ये कमीत कमी १३ लोक आणि दोन हत्तींना त्याने ठार केले आहे. दरम्यान, थेचिकोट्टुकावु मंदिराच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, रामचंद्रन या मृतांचे प्रत्यक्ष कारण नाही. पण त्यापैकी बहुतांश जणांचे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले. कार्यक्रमात खुप आवाज आणि अन्य काही कारणांममुळे खुप गदारोळ झाला होता.
रामचंद्रन आपल्या डाव्या डोळ्याने आंधळा आहे आणि पशु अधिकार कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, त्याला सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी जबरदस्ती करु नये. पीपल फॉर अॅनिमल्स संगघनेच्या श्रीदेवी एस. कार्था अशा म्हणतात की, तो हत्ती सर्वाधिक लांब आणि सर्वात सुंदर आहे. त्याला जवळून पाहिल्यानंतर आपण त्याच्या मोहात पडतो. मात्र त्याचे भव्य रुप एक अभिशाप बनले आहे.
गेल्याच आठवड्यात ३५ मंदिरांच्या समित्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी त्यांच्या बोलीसाठी एका लिलावात ही भाग घेतला होता. त्रिशूर मध्ये श्री विश्वनाथन मंदिराने ६७५,००० रुपयांची रेकॉर्ड ब्रेक बोली लावली. थेचिक्कोट्टुकावू ट्रस्टचे अध्यक्ष बिनॉय पीबी यांनी असे सांगितले की, जेव्हा रामचंद्रन असतो तेव्हा अधिक लोक मंदिरात येतात. त्यामुळेच त्याची ऐवढी मागणी आहे. (Thechikottukavu Ramachandran Elephant)
हे देखील वाचा- सोन्याची जीभ आणि हृदय असलेल्या Mummy च्या रहस्यमय गोष्टी
२०१९ मध्ये मंदिराच्या अधिकाऱ्यांना तेव्हा समस्या आली होती जेव्हा त्रिशूर मधील प्रसिद्ध गुरुवायुर मंदिराजवळ एका गर्दीच्या परिसरात रामचंद्रन जवळ फटाके फोडल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासनाने तेव्हा त्याला प्रसिद्ध त्रिशूर पूरम मंदिरातील उत्सावात सहभागी करण्यास बंदी घातली होती.