Home » शापित होप हायमंडचे रहस्य

शापित होप हायमंडचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Hope Hymond
Share

भारतातील आंध्र प्रदेशातील गोलकोंडा या हिऱ्यांच्या खाणीतून अनेक अनमोल हिरे मिळाले आहेत.  गोलकोंडा खाणीतून मिळालेल्या हि-यांनी भारतातच नाही तर जगात सर्वोच्च हिरे, हे स्थान मिळवलं आहे.  गोलकोंडा हिऱ्यांमध्ये कोहीनूर, नासाक डायमंड, निळा होप डायमंड, आयडॉल आय, गुलाबी दर्या-इ-नूर, पांढरा रीजेंट डायमंड, ड्रेस्डेन ग्रीन डायमंड आणि रंगहीन ऑर्लोव्ह डायमंड यांचा समावेश आहे.  या सर्वच हि-यांमागे एक कथा आहे.  यातील बहुतांश हिरे आता भारतात नाही. ब्रिटीश राजवटीत ब्रिटीशांनी हे अनमोल हिरे भारतातून नेले. (Hope Hymond)

आज ब्रिटनमधील अनेक संग्रहालयात हे हिरे बघायला मिळतात. त्यांची किंमतही सर्वोच्च आहे.  हे हिरे घेण्यासाठी जगभरातील श्रीमंत संधीची वाट बघत आहेत.  मात्र यातील एका हि-याला शापित असा शिक्का बसला आहे. आत्तापर्यंत हा हिरा ज्यांच्याकडे होता, त्या व्यक्तिचा खून झाला आहे, किंवा त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या हि-याला रक्तपिपासू हिरा असेही म्हटले जाते. हा हिरा आता अमेरिकेच्या एका संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.  हा हिरा म्हणजे, निळ्या रंगाचा होप डायमंड. गोलकोंडा खाणीतून निघालेला हा होप डायमंड आता जरी अमेरिकेतील संग्राहलयात असला तरी त्याचा इतिहास बघितल्यावर त्याला शापित हिरा का म्हटले जाते, हे समजून जाते.  

निळ्या रंगाचा होप डायमंड हा आतापर्यंतच्या सर्वात कुप्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक मानला जातो.  या निळ्या हि-याभोवती सर्वाधिक गुढकथा गुंफण्यात आल्या आहेत.  टायटानिक चित्रपट आठवतो का ?  त्याच्यातही नायिका शेवटी जो हिरा समुद्राला अर्पण करते, तो निळ्याच रंगाचा असतो. तशाच कथा या होप डायमंडभोवती आहेत. होप डायमंडला अनेक नावांनी ओळखले जाते.  हा हिरा अनेक वर्ष फ्रान्सच्या राजघराण्यात होता. त्यामुळे त्याला द किंग्ज ज्वेल या नावानंही ओळखलं जातं.  शिवाय द ब्लू ऑफ फ्रान्स, ट्रॅव्हलर ब्लू असेही या हि-याचे नाव आहे.  चमकदार निळ्या रंग्याच्या या हि-याचे वजन ४५.५२ कॅरेट आहे. (Hope Hymond)  

हा हिरा कुठल्या खाणीतून निघाला यापासून यासंबंधातील वाद सुरु होतो.  गोलकोंडा येथील खाणीतून होप डायमंड निघाला असा दावा असला तरी आंध्र प्रदेशातील वजराकरूर किंबरलाइट फील्डमधून हा हिरा निघाल्याचाही दावा आहे.  त्यानंतर हि-याच्याबाबतील गुढ कथा सुरु होतात, त्या थेट १७ व्या शतकापासून.  १७व्या शतकातील फ्रेंच व्यापारी जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर यांनी एका हिंदू देवतेच्या मुर्तीतून या हि-याची चोरी केल्याची कथा सांगितली जाते.  देवीच्या डोळ्यात हा हिरा बसवला होता, तेव्हा त्याचे मुळ वजन ११५.१६ कॅरेट होते.  हा हिरा चोरल्याचे लक्षात आल्यावर मुर्तीची पुजा करणा-या पुजा-यांनी टॅव्हर्नियरला शाप दिला. 

हि-याची चोरी केल्यावर काही दिवसांनींच टॅव्हर्नियरला तीव्र ताप आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  होप डायमंड १६७३ मध्ये ६९ कॅरेट वजनाचा झाल्याचा उल्लेख आहे.  टॅव्हर्नियरने त्याची विक्री किंग लुई चौदावा याला केल्यावर त्याचे वजन कमी करण्यात आले.  ही हिरा राजानं आपल्या मुकुटात धारण केला.  मात्र त्यानंतर किंग लुई चौदावा यांना गँग्रीन झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.  १७०० मध्ये सोळावा लुई आणि मेरी अँटोइनेट यांच्याकडे होप डायमंडची मालकी गेली.  मात्र त्यानंतर फ्रान्समध्ये राजकीय क्रांती झाली आणि सोळाव्या लुईला गिलोटिनवर चढवण्यात आले.  तेव्हा होप डायमंड त्याच्या पत्नीकडे गेला.  पण नऊ महिन्यांनंतर त्याच्या पत्नीलाही असाच मृत्यू आला. (Hope Hymond)

त्यानंतर राजकुमारी डी लॅम्बले हिच्याकडे होम डायमंडचा वारसा आला, आणि तिचाही लवकरच मृत्यू झाला.  फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी होप डायमंड पुन्हा चोरीला गेला.  तसेच त्याचा आकार कमी करण्यात आला.   विल्हेल्म फॉल्सने होप डायमंडला ४५ कॅरेटचे केले.  मात्र त्याचे घराणेही संपून गेले.  त्याच्या वडिलांची हत्या झाली आणि त्याचाही नंतर मृत्यू झाला.  १८३९ मध्ये, हा हिरा हेन्री फिलिप होप नावाच्या रत्न संग्राहकाने विकत घेतला.  त्याचेच नाव या हि-याला पडले.  त्याच्याही घरावर अनेक संकंट आली.  

================

हे देखील वाचा : “आरोपांचा काही फरक…” बऱ्याच वर्षांनी लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली प्रतिक्रिया

================

प्रचंड श्रीमंत असलेल्या एव्हलिन वॉल्श मॅक्लीन हिने १९१२ मध्ये पियरे कार्टियरकडून होप डायमंड खरेदी केला.  तिने आपल्या कुत्र्याच्या कॉलरमध्ये हिरा बसवल्याच्या कथा आहेत.  त्यानंतर तिची सासू मरण पावली आणि त्याचा मुलगा वयाच्या नऊव्या वर्षी मरण पावला. तिचा नवरा तिला सोडून गेला आणि या धक्यानं  मनोरुग्णालयात तिचा मृत्यू झाला. एव्हलिनची मुलगीही ड्रग्जच्या अतिसेवनाने मरण पावली.  या कुटुंबावर कर्जाचा प्रचंड डोंगर झाला.  त्यामुळे एव्हलिनच्या मुलानं होप डायमंड १९४९  मध्ये एका प्रसिद्ध ज्वेलरला विकला. १९५८  मध्ये त्या ज्वेलर्सने स्मिथसोनियन संस्थेला हा हिरा दान केला.  पण हा हिरा साध्या पोस्टानं पाठवण्यात आला.  आणि दुदैर्व म्हणजे, ज्या पोस्टमनंनं तो आणला त्याचाही अपघात झाला त्याच दिवशी त्याच्या घराला आग लागली.  (Hope Hymond)

सध्या हा हिरा वॉशिंग्टन, डी.सी. येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये ठेवलेला आहे.  होप डायमंडची किंमत आता $२५० दशलक्ष आहे.  भारतीय चलनात त्याची किंमत 20,86,41,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.  या कुप्रसिद्ध हि-याला बघण्यासाठी हजारो प्रेक्षक या संग्रहालयाला भेट देतात.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.