Home » थंडाव्यात मेथीच्या लाडवाची गोडी….

थंडाव्यात मेथीच्या लाडवाची गोडी….

by Team Gajawaja
0 comment
Benefites Of Fenugreek
Share

ऑक्टोबर महिना संपला आहे आणि नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे.  सोबतच थंडीचीही चाहूल लागली आहे.  काही दिवसांपूर्वी जाणवणारा उष्मा  आता दूर पळाला असून थंड वारे वाहू लागले आहेत.  त्यासोबतच आता लवकरच थंडीचा कडाका वाढणार अशी जाणीव झाली आहे.  या थंडीच्या मोसमात प्रत्येकाला आपली तब्बेत चांगली रहावी असे वाटत असते.  या दिवसांत सर्दी-ताप यांच्यासोबत सांधेदुखी, हातापायांना होणा-या वेदनांही वाढतात.  यामुळेच थंडीच्या मोसमात विविध पोषकतत्तवे असलेला आहार महत्त्वाचा ठरतो.   या दिवसात मेथीचे  लाडू खाल्ले जातात.  थंडीचे लाडू म्हणूनही काही ठिकाणी मेथीच्या लाडवांचा उल्लेख आहे. मेथीचे आणि थंडीचे नेमके नाते काय आहे, हे जाणून घ्यायला हवे. अगदी छोटेसे असे हे मेथीचे दाणे चवीला कडू म्हणून  आहारात वर्ज केले जातात. मात्र हेच छोटेसे मेथीचे दाणे आरोग्यासाठी वरदान आहेत. त्यांच्या नियमीत सेवनाने  अनेक रोगांवर मात करता येते.   थंडीत तर मेथीचे दाणे खाल्यानं शरीराला आवश्यक उर्जा मिळते.  त्यामुळेच या थंडीमध्ये कडवट असले तरी मेथीचे लाडू खाल्ले जातात.  या लाडवात मेथीसोबत गुळ आणि डिंकाचाही वापर केला जातो.  एकूण चवीला कडवट असली तरी इवलीशी मेथी आणि थंडीचा मौसम यांचे अतुट नाते आहे. (Benefites Of Fenugreek) 

थंडीच्या दिवसात खाण्यापिण्याची चंगळ असते.  या दिवसात अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात आणि जिभेची चव भागवली जाते.  पण यातील चवीचा भाग बाजुला ठेवला तर एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, ती म्हणजे थंडीमध्ये होणारे अनेक आजार.  यामध्ये सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी हे प्रमुख आहे.  अनेकांची जुनी सांधेदुखी या थंडीच्या दिवसात पुन्हा डोकं वर काढते.  या सर्वांना दूर सारण्यासाठी एक छोटासा उपाय फायदेशीर ठरतो.  आपल्या स्वयंपाकघरात असणारे छोटेसे मेथीचे दाणे (Benefites Of Fenugreek) या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरतात.  थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात.  याच काळात मेथीचे लाडू पौष्टिक म्हणून खाल्ले जातात.  चवीला थोड्याश्या कडवट असणा-या या लाडवांचा फायदा पाहिला तर त्यांची कडवट चवही गोड वाटेल असाच आहे.

गव्हाचे पिठ किंवा उडदाच्या डाळीचे पिठ, साखर, तूप आणि भरपूर सुकामेवा, सुकं खोबरं यांचा वापर करुन मेथीचे लाडू (Benefites Of Fenugreek) तयार केले जातात.  काहीजणं यात सुक्यामेव्यासोबत डिंकाचाही वापर करतात. थंडीच्या दिवसात होणारे सांध्याचे विकार, स्नायूंच्या वेदना यावर मेथी उपयुक्त ठरते.  तर कायम होणा-या कफाची तक्रारही मेथीच्या सेवनानं दूर होते.  लहान मुलांसाठीही हे मेथीचे लाडू फायदेशीर ठरतात.  यात डिंकाचाही वापर असेल तर हाडांसाठीही चांगले होतात. थंडीत केसांमध्ये कोंडा  होतो.  त्वचा कोरडी होते.  ही समस्याही मेथीच्या सेवनानं तूर होते.  केसांसाठी तर मेथी वरदान आहे.  त्यामुळे थंडीत हा मेथीचा लाडू खाल्ला तर केसातील कोंडा दूर होतोच शिवाय केसांची मुळेही मजबूत होण्यासाठी मदत होते. 

=========

हे देखील वाचा : तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? : जाणुन घ्या फायदे

=========

थंडीमध्ये मेथीची भाजीही तेवढीच फायदेशीर ठरते.  या सिझनमध्ये बाजारात अगदी छोट्यापानांची मेथीची भाजी उपलब्ध होते.  या भाजीचा जेवढा वापर जेवणात केला जातो, तेवढाच त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो.  मेथीचे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आयुर्वेदामध्येही मेथीचा समावेश नेहमीच्या आहारात करावा असा आग्रह असतो.  मेथीच्या छोट्याशा दाण्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि प्रथिने आहेत.  मेथीच्या नियमीत सेवनानं मधुमेहावर नियंत्रित ठेवण्यास मदत होते, असे सांगितले जाते.  तसेच मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यानं पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.  महिलांना मासिकपाळीच्या वेळी होणा-या वेदना दूर करण्यासाठीही मेथीचे दाणे उपयोगी पडतात.  मेथीचे लाडू अशावेळी खाल्ले तर वेदना कमी होतात. (Benefites Of Fenugreek)

थंडीच्या दिवसात रोज एक मेथीचा लाडू खाल्ला तर अशा अनेक शारीरिक तक्रारी दूर करता येतात.  ह्दयविकारमध्येही मेथी उपकारक आहे. शरीरातील कोलोस्ट्रॉलचे प्रमाणही संतुलीत ठेवण्याचे काम या मेथीमुळे होते.  थंडीच्या दिवसात शरीरातील पचन संस्थांचे कार्य मंदावते.  अशावेळी पचनासंदर्भात तक्रारी जाणवू लागतात.  या सर्वांसाठी मेथी रोज खाणे गरजेचे आहे.  मेथीची चव कडवट असते.  त्यामुळे नुसती मेथी खाण्यास अनेकांना आवडत नाही.  त्यासाठी या मेथीचे गुळ, तूप आणि सुकामेवा घालून लाडू केल्यास त्याची चव वाढते आणि सोबतच त्याचे गुणधर्मही वाढतात.   त्यामुळे थंडीची चाहूल लागल्यावर आता हे मेथीचे लाडूच आपल्यासाठी एका रक्षकाचे काम करणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.