Home » स्वप्नील जोशीने खरेदी केली कोट्यवधी किंमतीची आलिशान गाडी

स्वप्नील जोशीने खरेदी केली कोट्यवधी किंमतीची आलिशान गाडी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Swapnil Joshi
Share

कलाकार असो किंवा सामान्य माणसं प्रत्येकाचे एक स्वप्न असते आणि ते म्हणजे एखादी महागडी गाडी आपल्या दारात उभी असावी. मात्र सगळ्यांचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. ज्यांचे हे स्वप्न पूर्ण होते ते खरंच नशीबवान असतात. सध्या असाच नशीबवान ठरला आहे मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी.

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाने वाहवा मिळवणारा स्वप्नील जोशी सध्या खूपच खुश आहे. त्याने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली असून, सध्या त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वप्नीलने नवी लग्झरी कार खरेदी केल्याचे सांगितले आहे. स्वप्नीलने नवी कोरी डिफेंडर ही लग्झरी कार खरेदी केली आहे. सध्या त्याच्यावर इंडस्ट्रीमधील आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वप्नीलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ” लँड रोव्हर रेंज रोव्हर
डिफेंडर
डिअर जिंदगी! आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी खूपच खास आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासातील हा सर्वात मोठा अभिमानास्पद क्षण आहे. माझ्या बाबांच्या हातात नव्या डिफेंडर गाडीच्या चाव्या पाहून खरंच मन भरून आले. आपण आयुष्यात खरंच खूप पुढे आलो आहे… मी हे सगळं मिळवू शकेन की, नाही? याबाबत अनेकांच्या मनात आधी शंका होती. पण, हे सगळं माझ्या कुटुंबीयाच्या साथीने शक्य झाले आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आई-बाबांनी मला आत्मविश्वास दिला.

ही डिफेंडर फक्त कार नाहीये. हे मी आजपर्यंत केलेल्या माझ्या कामाचे प्रतीक आहे. माझ्या आई – वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. आयुष्यात काहीच कठीण नाही. तुम्ही फक्त प्रयत्न केले पाहिजेत हे ही गाडी कायम दर्शवेल. तुमचे पॅशन, इच्छाशक्ती आणि जवळच्या लोकांच्या साथीने तुम्ही कोणतीही गोष्टी ‘डिफेंड’र करू शकता.

डिअर जिंदगी, ही फक्त एक सुरुवात आहे. या प्रवासात आणखी अनेक चढउतार पाहायचे आहेत. आयुष्यात आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत. आता येणारा प्रत्येक दिवस मला काही ना काही नवीन शिकवून माझ्या एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. This is our moment to shine Congratulations dear Zindagi !!!!!”

स्वप्नील जोशीच्या या पोस्टनंतर त्याचे सर्वच अभिनंदन करताना दिसत आहे. स्वप्नीलने खरेदी केलेल्या लँड रोव्हर रेंज रोव्हर डिफेंडर या गाडीची किंमत जवळपास दीड कोटी ते अडीच कोटी रुपये असावी असे सांगण्यात येत आहे. याआधी देखील त्याने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. आता त्याच्या कलेक्शनमध्ये ही डिफेंडर गाडी देखील जोडली गेली आहे.

स्वप्नील जोशींच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याच्यासाठी २०२४ हे वर्ष चांगले गेले आहे. यावर्षी त्याने ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि अमाप यश मिळवले. शिवाय त्याने अनेक आगामी सिनेमांची घोषणाही केली आहेत. यावर्षी तो ‘नवरा माझा नवसाचा २’ या सुपरहिट चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच स्वप्नील ‘जिलबी’ आणि सुशीला- सुजीत चित्रपटात झळकणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.