द्वारका पीठ शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद (Swami Swaroopanand) सरस्वती यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. रविवारी त्यांनी नरसिंगपुर येथील आश्रमात वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्वामी स्वरुपानंद दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाचे कारण कार्डियेक अरेस्ट असल्याचे सांगितले गेले आहे. स्वामी स्वरुपानंद यांनी ३० ऑग्सट रोजी आपला ९९ वा वाढदिवस साजरा केला होता. तर ते द्वारका-शारदा पीठ (गुजरात) आणि ज्योतिष पीठ (उत्तराखंड) चे शंकराचार्य होते. असे सांगितले जात आहे की, ते जवळजवळ एका वर्षापासून आजारी होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी सुद्धा काही खास कार्यक्रम ठेवण्यात आलेला नव्हता.
द्वारका पीठाचे स्वामी सदानंद महाराजांनी न्यूज एजेंसीला सांगितले की, मध्य प्रदेशातील नरसिंहपूरातील आश्रमात त्यांनी रविवारी ३.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. आश्रमच्या मते त्यांना कार्डियेक अरेस्ट आला होता. त्यांना नरसिंहपूरातील गोटेगावामधील ज्योतेश्वर स्थिती परमहंसी गंगा आश्रमातच भू समाधी दिली जाणार आहे.
भू समाधी का?
हिंदू मान्यतांनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा देह जाळला जातो. असे अशा कारणास्तव केले जाते की, दीर्घकाळापर्यंत आत्मा शरिरासोबत राहते आणि आत्मा मृत्युनंतर सुद्धा शरिर सोडण्यास तयार होत नाही. असे मानले जाते की, जो पर्यंत अंत्यसंस्कार केले जात नाहीत तो पर्यंत आत्मा आसपासच फिरत असते.
मात्र साधु-संतांमध्ये अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यांना भू समाधी दिली जाते. यामागे अशी मान्यता आहे की, संन्यास घेण्यापूर्वी ते पिंडदान करतात त्यामुळे त्यांची आत्मा शरिरापासून दूर होते. म्हणून त्यांचा देह जाळला जात नाही.
अशाप्रकारे जर ५ वर्षाखाली मुलाचा मृत्यू झाल्यास त्याला जाळण्याऐवजी पुरले जाते. कारण असे मानले जाते की, त्याचा आत्मा इतका वेळ नाही राहिला जोपर्यंत त्याला त्याची ओढ लागली होती.
साधू-संतांना जल किंवा भू-समाधी दिली जाते. मात्र सध्या भू-समाधीच दिली जाते. या प्रक्रियेत साधू किंवा संतांना बसलेल्या अवस्थेत जमिनीत पुरले जाते. असे मानले जाते की, ही परंपरा १२०० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. आदिगुरु शंकराचार्य यांनी सुद्धा भू समाधी घेतली होती आणि केदारनाथमध्ये सुद्धा आजही त्यांची समाधी आहे.
भू समाधिची प्रक्रियेत काय केले जाते?
संन्यासी हे परोपकाराची भावना ठेवतात. त्यांच्या शरिराचा वापर परोपकारासाठी केला जातो. समाधीनंतर जीव शरिरामधून पोट भरते. भू समाधीची प्रक्रिया ७ टप्प्यांमध्ये होते.
-शरिराला गंगाजलने स्नान घातले जाते
-शरिराराला आसानावर बसवले जाते
-त्यानंतर शरिराला विभूती लावली जाते
-वस्र घातले जातात. चंदन, माळा आणि फूल दिली जातात
-सहाव्या टप्प्यात शरिराला झाकले जाते
-अखेर समाधीच्यावरती गाईचे शेण लेपले जाते.
कशी दिली जाते भू समाधी?
स्वामी स्वरुपानंद (Swami Swaroopanand) सरस्वती यांचे पार्थिव शरिराला शैव, नाथ, दशनामी, अघोर आणि शाक्त परंपरेनुसार भू समाधी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. सांधू-संतांना आणि संन्यासांना सुद्धा भू समाधी दिली जाते. भू समाधी पद्मासन किंवा सिद्ध आसान मुद्रेत बसून भुमीत दफन केले जाते. खरंतर ही समाधी संतांच्या गुरुंच्या समाधीजवळ किंवा त्यांच्या मठात दिली जाते. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना भू समाधी त्यांच्या आश्रमातच दिली गेली.
भू समाधीनंतर काय?
समाधीच्या १६ दिवसानंतर सोरठी असते. या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रथम स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा उत्तराधिकारी निवडला जाणार. स्वामी अविमुक्तेश्वरानंदर आणि स्वामी सदानंद सरस्वती त्यांचे उत्तराधिकारी असतील असे बोलले जात आहे. दरम्यान, स्वामी स्वरुपानंद यांनी त्याची घोषणा केलेली नव्हती. त्यांनी जर एखादे मृत्यूपत्र लिहिले असेल आणि त्यात उत्तराधिकारी कोण होणार असेल हे असेल तर त्याला तो मान दिला जाईल.
हे देखील वाचा- शाही परिवारात एका युगाचा अंत, महाराणी एलिजाबेथ यांच्याबद्दल काही खास गोष्टी
कोण होते स्वामी स्वरुपानंद?
स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म १९२४ मध्ये मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला होता. त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय होते. वयाच्या ९व्या वर्षात त्यांनी आध्यात्म्यासाठी घर सोडले होते. स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. त्यासाठी त्यांना दोन वेळा तुरुंगवास ह झाला होता. एकदा ९ महिन्यांसाठी आणि दुसऱ्यांचा ६ महिन्यांसाठी. तर १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्यांची उपाधी मिळाली होती. त्यांना द्वारका पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.