काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये आलेला तुम्बाड सिनेमा प्रत्येकालाच माहिती आहे. या सिनेमाच्या कथेत एका शापित देवतेकडून सोन्याचा खजिना मिळतो. काळानुसार हाव वाढत जातो आणि अखेर त्याची किंमत चुकती करावीच लागते. सध्या सुदान मध्ये जे काही सुरु आहे ते पाहता खरंच तुम्बांडची आठवण येते. (Sudan Crisis)
या अफ्रिकी देशाचा उल्लेख केला जातो तेव्हा समोर गरिबी दिसते. गेल्या वर्षात गरिब देशांची जी लिस्ट आली होती त्यापैकी एक असलेल्या सुदानचा ४० वा क्रमांक होता.अनुमानानुसार, जागतिक प्रति व्यक्तीचे उत्पन्न पाहता ९० टक्के लोकसंख्या ही द्रारिद्र रेषेखालीच असतील. ते सुद्धा सोन्याचे डोंगर असून ही. खरंतर अफ्रिकेत सर्वाधिक सोन्याचे भंडार सुदानकडे आहे. ईश्वराने या देशाला एक वरदान दिले होते. पण आता येथील लोकांच्या हव्यासापोटी त्याला श्राप बनण्यास वेळ लागणार नाही. आज जी सुदानची स्थिती आहे त्याला कारणाभीतून हव्यास.
१९५६ मध्ये जेव्हा सुदान इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला तेव्हा तेथे तेलाचे विशाल भंडार सापडले. त्याचसोबत सोन्याच्या खाणी सुद्धा मिळाल्या. २०११ मध्ये दक्षिण सुदान जेव्हा वेगळा देश झाला तेव्हा बहुतांश कच्च्या तेलाच्या खाणी त्यांच्या हाती लागल्या. पण असे नव्हते की, सुदान अचानक गरिब बोईल. पुढील वर्षात दार्फूर मध्ये जेबल अमीर नावाच्या ठिकाणी सोन्यची नवी खाण आढळून आली होती.

लोकांना जेव्हा याबद्दल कळले तेव्हा त्यांनी तातडीने तेथे खोदकाम करण्यासाठी पोहचले. तुम्बांड सिनेमाप्रमाणे काही लोक श्रीमंतर झाले तर अन्य काहींना श्राप मिळाला. काहींचा जर गर्दीनेच जीव घेतला. त्यानंतर कबायली नेता मूसा हलीलने बंदुकीचा धाक दाखवत त्यावर ताबा मिळवला. ८०० हून अधिक लोकांची खुलेआम हत्या झाली आणि खाण ताब्यात घेतली गेलीय मूसा ओमर अल बशीरचा समर्थक मानला जात होता. त्याने बशीर सरकारव्यतिरिक्त दुसऱ्यांना सुद्धा सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केलीय. (Sudan Crisis)
RSF ची ताकद वाढली.
२०१७ मध्ये आरएसएफने येथे आपला ताबा मिळवला. याच आधारावर मोहम्मद हमदान दगालो याची ताकद वाढली गेली. पाहता पाहता दगालोची ताकद आजूबाजूच्या देशापर्यंत पसरली गेली. दगालो याला हेमेदती असे ही म्हटले जाते. २०१९ मध्ये अल बशीर सरकार कोसळले तेव्हा सुदानचा ताबा अशा दोन व्यक्तींच्या हातात गेला जे बंदुकधारी होती. हेमेदती आणि अल बुरहान. आज जो संघर्ष सुरुय तो याच दोघांमुळेच.
हे देखील वाचा- राजस्थानमध्ये सापडली पांढ-या सोन्याची खाण
८० टक्के सोन्याची होतेय तस्करी
२०२२ मध्ये सुदानने १८ टन सोन्याचे प्रोडक्शन केले. हा एक रेकॉर्डच होता. सुदनमध्ये सोनं ऐवढं होत की, त्याचा जर कायदेशीर रुपात वापर केला असता तर तो देश आज श्रीमंत देशांपैकी एक असता. जगातील श्रीमंत देशांच्या नजरा सुद्धा सुदानवर असतात. पण येथील वाईट गोष्ट अशी की, ७०-८० टक्के सोन्याची तस्करी देशाबाहेर केली जाते.