Stretching before sleep- दिवसभर उत्साहित राहण्यासाठी आपल्याला पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. दररोज ७-८ तास झोपल्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतेच. पण त्याचसोबत शरिरातील काही क्रिया सुद्धा सुरळीत सुरु होण्यास मदत होते. अशातच तुम्हाला हृदयासंबंधित आजार दूर राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यानंतर वाढत्या वयासह येणारे आजार ही दूर होतात. मात्र सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे काम अधिक आणि झोप कमी असे झाले आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात झोप न झाल्याने चिडचिड होते. त्याचसोबत संपूर्ण दिवसभर उत्साहाऐवजी आळस वाटतो. अशातच रात्री झोपण्यापूर्वी पुढील अशा काही स्ट्रेचिंग करा जेणेकरु तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल.
-बियर हग
ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्ही उभे किंवा बसू ही शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे दोन्ही हात प्रथम समोर करुन ते तुमच्याच शरिराला आपण जसे भेटल्यानंतर गळा भेट घेतो तसे करायचे आहे. येथे फक्त तुम्हीच तुम्हाला हग करणार आहात. हे आसन तुम्ही बसून किंवा उभे राहून सुद्धा करु शकता.
-हेड स्ट्रेचिंग
कोणत्याही एक्सरसाइजशिवाय तुम्ही तुमच्या हिशोबाने बसा किंवा उभे रहा. आता तुम्हाला तुमची मान एकदा डाब्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला, वर-खाली असे १-२ मिनिटे करायचे आहे. परंतु असे करताना ती हळूवार करा अगदीच जलद गतीने केल्यास तुमची मान लचकेलच पण चक्कर आल्या सारखे ही वाटेल. खरंतर वर्टिगो असलेल्यांनी हे आसन करताना फार काळजी घ्यावी.
हे देखील वाचा- उंची वाढवण्यासाठी ‘ही’ योगासन ठरतील फायदेशीर
-पश्चिमोत्तानासन
ही एक उत्तम आसन असून यामध्ये तुमच्या शरिराचा भाग व्यवस्थितीत स्ट्रेच होतो. बसून तुमचे दोन्ही पाय पुढे सरळ करा आणि आता दीर्घ श्वास घेत हात वरती करा. आता हळूहळू श्वास सोडत आपले हात, शरिर हळूहळू पायांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.
-बद्धकोणासन
बद्धकोणासन यालाच बटरफ्लाय पोझ असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला तुमचे पाय एकमेकांना बसून जोडायचे आहेत. जेणेकरुन तुमच्या पायाचा आकार हा फुलपाखरांच्या पंखांसारखा दिसेल आहे. तुमच्या दोन्ही हातांनी पायांची बोट पकडा आणि हळूहळू दोन्ही मांड्या वर खाली करण्याचा प्रयत्न करा.(Stretching before sleep)
-बालासन
लहान मुलांसारखी अगदी शांत झोप हवी असेल तर बालासन नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरेल. यामध्ये तुम्हाला लहान मुल जेव्हा त्याच्या पायावर आणि छातीच्या भागावर झोपतो त्या प्रमाणे बसून हे आसन करायचे आहे. काही सेकंद याच आसनामध्ये रहा आणि हळूहळू वर या.