Home » गोष्ट युट्यूबच्या जन्माची

गोष्ट युट्यूबच्या जन्माची

by Team Gajawaja
0 comment
Share

आजकाल यूट्यूब हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन झाल आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्युबच्या माध्यमातून मनोरंजन होतं, तर दुसरीकडे अनेक लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात. आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायची असो काही बघायचं असो किंवा एखादी ट्रिप प्लॅन करायची असो आपण यूट्यूबचा वापर हा करतोच. अगदी घरातील गृहिणीपासून ते मोठं मोठ्या ठिकाणी यूट्यूब पाहिल जातच. तसच आजकाल, युट्युबर बनणं हा देखील एक व्यवसाय आहे. आपण अगदी आपल्या सामान्य नोकरीपेक्षा जास्त पैसे यू ट्यूब च्या माध्यमातून कमवू शकतो. पण युट्युब हा प्लॅटफॉर्म नेमका कधी सुरू झाला? त्यावरील पहिला व्हिडिओ नेमका कोणता होता? या सर्व गोष्टी जाणून घेऊया. (Youtube)

तर YouTube कसे सुरू झाले याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. एका गोष्टीनुसार स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम या तिघांनी सर्वात आधी १४ फेब्रुवारी २००५ मध्ये यूट्यूबची सुरुवात केली.पण खरं तर युट्युब हि सुरुवातीला विडिओ शेअर कंपनी नसून यूट्यूबची सुरुवातीची कल्पना ही डेटिंग वेबसाइट होती. YouTube.com 14 फेब्रुवारी 2005 रोजी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अस्तित्वात आले. यामागे कल्पना अशी होती की डेटिंग पार्टनर शोधणारे लोक त्यावर व्हिडिओ पोस्ट करतील. पण ही कल्पना तितकीशी चालली नाही, सुरुवातीला या लोकांनी मुलींना पैसे दिले आणि व्हिडिओ अपलोड करायला लावले. मात्र तरीही काम झाले नाही. त्यामुळे मग पुढे सर्व प्रकारचे व्हिडीओ अपलोड करण्यासाठी यूट्यूब उघडण्याचा निर्णय तिघांनीही घेतला. तर करीमच्या म्हणण्यानुसार, यूट्यूबची कल्पना सुपरबोल दरम्यान आली. (Youtube)

सुपर बाउल म्हणजे अमेरिकन फुटबॉल लीगचा अंतिम सामना. सामन्याच्या अर्ध्या वेळेत एक विशेष कार्यक्रम असतो. ज्यामध्ये स्टार्स परफॉर्म करतात. करीम इंटरनेटवर या शोचा व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण तो मिळाला नाही. यानंतर 2004 मध्ये हिंदी महासागरात त्सुनामी आली तेव्हा करीमला त्याचा कोणताही व्हिडिओ ऑनलाइन सापडला नाही. त्यामुळे त्याला व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मची कल्पना सुचली आणि त्यांनी YouTube सुरू केले. त्यांच्या लक्षात आले की फ्लिकर सारख्या नवीन वेबसाइटने डिजिटल फोटो शेअर करणे सोपे केले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक आहे. तेव्हापासून, कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी YouTube हे एक आदर्श सिनेमॅटिक व्यासपीठ बनले आहे. (International News)

YouTube वर पहिला विडिओ यूट्यूबच्याच  तीन सह-संस्थापकांपैकी एक, जावेद करीम यांनी अपलोड केला, जो सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयात काढलेला 18 सेकंदाचा होता आणि त्याचे नाव होते “मी ॲट द झू”. 24 एप्रिल 2005 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओला 240 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.आजच्या भाषेत सांगायचे तर, यूट्यूबचा पहिला व्हिडिओ व्हलॉग होता. या व्हिडिओला आतापर्यंत २९१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावेळी हा व्हिडिओ अपलोड झाला त्याच वेळी या व्हिडिओला ४.०९ कोटी लोकांनी त्यांच्या चॅनेलला सब्सक्राईब केलं आहे. तर १४ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओशिवाय या चॅनलवर दुसरा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही. त्यांनी केवळ हा एकच व्हिडिओ अपलोड केला, त्यानंतर कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. (Youtube)

Youtube

सुरुवातीला युटूबच ऑफिस कॅलिफोर्नियातील एका पिझ्झा शॉपच्या वर चालू होते. स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम या तिघांची मेहनत फळाला आली आणि जुलै 2005 पर्यंत YouTube वर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ अपलोड होऊ लागले. पुढे youtube चालू ठेवण्यासाठी फंडींगची गरज होती तेव्हा नोव्हेंबर 2005 मध्ये ‘साकोव्या कॅपिटल’ने YouTube मध्ये साडेतीन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. एप्रिल 2006 मध्ये कंपनीला आणखी एक गुंतवणूक मिळाली. ‘सकोव्ह्या आणि आर्टिस कॅपिटल मॅनेजमेंट’ ने YouTube मध्ये $8 दशलक्ष गुंतवणूक केली. कंपनीकडे आता पैसे होते. आणि अपलोड होणाऱ्या व्हिडिओंची संख्याही सातत्याने वाढत होती. (International News)

मे 2006 पर्यंत यूट्यूबवर दोन कोटींहून अधिक व्हिडिओ अपलोड झाले होते. एका वर्षात वेबसाइटला 10 कोटी व्ह्यूज मिळाले होते.त्यानंतर लाँच झाल्याच्या दोन वर्षातच, YouTube ने इतकी प्रगती केली होती की त्याचे प्रतिस्पर्धी खूप मागे राहिले होते. फेसबुक आणि इतरांसाठी व्हिडिओ प्लॅटफॉर्म तयार करणारे ग्रेग कॉस्टेलो म्हणतात, “जेव्हा मी व्हिडिओवर काम करायला सुरुवात केली तेव्हा पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला की, तुम्ही जे करत आहात ते YouTube पेक्षा वेगळे कसे आहे.” कॉस्टेलो म्हणतो, “तेव्हाच मला कळले की खेळ संपला आहे.” तेव्हा YouTube हे व्हिडिओ जगतातील सर्वात वेगाने वाढणारी वेबसाइट आणि सर्वात मोठी विडिओ शेअर कंपनी बनली होती. (Youtube)

 पुढे जून 2006 मध्ये, YouTube ने नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, NBC सोबत करार केला. अशा प्रकारे यूट्यूबवर जाहिराती सुरू झाल्या. यूट्यूबवर दाखवलेली पहिली जाहिरात प्रिझन ब्रेक या प्रसिद्ध शोची होती. या जाहिराती अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती पॅरिस हिल्टन यांच्या चॅनलवर दाखवण्यात आल्या होत्या.पण कंपनीचे सीईओ चाड हर्ले या जाहिरातींबद्दल फारसे खूश नव्हते. त्यांचा युक्तिवाद असा होता की जाहिराती सुरू झाल्यामुळे यूट्यूब यापुढे युजर फ्रेंडली राहणार नाही. पण तरीही पैशाची बाब असल्याने युट्युबवर जाहिराती येत राहिल्या. जाहिरातींमुळे YouTube ने लवकरच नफा मिळवण्यास सुरुवात केली. नफा हळूहळू वाढला, पण नंतर एक दिवस यूट्यूब विकण्याची चर्चा झाली. मात्र, नंतर या तिघांनी ते Google ला १६५ कोटींना विकलं. (International News)

पण मूळत: डेटिंग सेवा बनवण्याचा हेतू असलेला, YouTube आता जगातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. या अ‍ॅपची क्रेझ अशी आहे की दर महिन्याला २०० अब्जांहून अधिक वापरकर्ते याचा वापर करतात. इथे दररोज 1 अब्ज तासांचा व्हिडिओ पाहिला जातो आणि प्रत्येक मिनिटाला 500 तासांचा व्हिडिओ अपलोड केला जातो. आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालं आहे. आज लोक या माध्यमातून तगडी कमाई करत आहेत. आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला २४६ सब्सक्राईब्स आहेत. YouTube हे निःसंशयपणे सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. आपल्यापैकी बहुतेकांसाठी, हा आपला दैनंदिन मनोरंजनाचा स्रोत आहे आणि काहींसाठी त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. आज YouTube व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सर्वात लोकप्रिय वेबसाइट आणि Google नंतर दुसरी सर्वाधिक पाहिलेली वेबसाइट बनली आहे. असही सांगितलं जात कि युट्युबच जिथे ऑफिस होत तिथे एकदा एका बाईने अनेकांवर गोळीबार केला आणि यामागे कारण असं होत कि युट्युब ने काही कारणास्तव तीच चॅनेल डिमॉनेटाइज  केलं होत. (Youtube)

=================

हे देखील वाचा : WhatsApp वर डिलीट करण्यात आलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही ट्रिक

================

पण आता यूट्यूबचे व्यसन ही नव्या युगाची समस्या बनली आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमच्या घरातील लहान मुलं पाहिली असतील, जी व्हिडिओ चालवल्याशिवाय जेवत नाहीत. कालांतराने, YouTube एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून काम करू लागला. त्यामुळे व्यसनाधीनता, सेलिब्रिटी कल्चर, फॅन आर्मी कल्चर, विज्ञानाच्या नावाखाली अंधश्रद्धा, फेक न्यूज या सर्व समस्या या सर्व समस्यांशी निगडित आहेत. तथापि, हे देखील खरे आहे की YouTube चे अनेक फायदे आहेत. हे शिकवण्याचे आणि शिकण्याचे नवीन आणि सोपे माध्यम आहे. याशिवाय यूट्यूब लोकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ देते. जसं गाजावाजाच्या माध्यमातून आपण करत आहोत. यूट्यूबमुळे मोठी माणसं आणि लहान मुलं
मोबाईलमध्ये आणखी गुंतले. पण या यूट्यूबमुळे जगातल्या अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब मुलांना संपूर्ण जगभरात पोहचवलं आहे. स्वत:च आयुष्य बदलण्याची संधी दीली आहे. 
इनस्टा काय, फेसबूक काय किंवा यूट्यूब या सगळ्याच मध्यमांचं व्यसन लागू शकतं. या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापरं करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. नाही का? (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.