स्टीफन विलियम हॉकिंग (Stephen Hawking) यांना कोण ओळखत नाही. त्यांनी आयुष्याची ५३ वर्ष जरी व्हीलचेअरवर घालवली असली तरीही ते आज अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवून दिले की, कोणताही व्यक्ती जरी शरिराने विकलांग असेल पण डोक्याने नाही. बालपणीत ते एकदा पायऱ्यांवरुन खाली पडले. तेव्हा ते २१ वर्षाचे होते. प्रकृती बिघडत चालली होती. जेव्हा वडिलांनी त्यांना रुग्णालयात नेले तेव्हा त्यांना कळले की, हॉकिंग यांना एमियोट्रोफिक लेटरल स्कलेरोसिस नावाचा गंभीर आजार झाला आहे. ही गोष्ट १९६३ मधील आहे. त्यांच्या शरिरातील अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले होते. डॉक्टरांनी ही घरातील मंडळींना ते २ वर्ष जगतील असे सांगितले होते. यामुळे त्यांना धक्का बसला पण त्यांनी स्वत:ला सावरत म्हटले की, मी वयाची ५० वर्ष जीवंत राहणार. ते जवळजवळ ७६ वर्ष आयुष्य जगले. एक उत्तम वैज्ञनिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
८ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेले ब्रिटिश भौतिक वैज्ञानिक स्टीफन विलियम हॉकिंग यांनी जगाला दाखवून दिले होते की, एक व्यक्ती काहीही करु शकतो. ते असे म्हणायचे की, त्यांच्या शारीरिक क्षमतांमुळे त्यांना ब्रम्हांडासंदर्भात करण्यात आलेल्या रिसर्चवर विचार करण्याचे काम मिळाले. त्यांच्या अभ्यासाने सिद्ध केले होते की, जगात कोणीही अपंग नाही.
हॉकिंग नेहमीच म्हणायचे की, आपला मेंदू हा एक कंप्युटर प्रमाणे आहे. त्याचे विविध पार्ट्स जेव्हा फेल होतात तेव्हा ते काम करणे बंद करतात. आपल्या ७५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जवळजवळ ५३ वर्ष ही व्हीलचेअरवर काढली. त्यांच्या व्हीलचेअरने त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात त्यांना फार मदत केली. ती अशा खास पद्धतीने तयार करण्यात आली होती की, तिला त्यांचे बोलणे समजायचे आणि ती त्यांच्या वतीने लोकांशी बोलायची. ऐवढेच नव्हे तर स्टीफन यांना जे वाटायचे ते सुद्धा ती लिहायची. Intel कंपनीने त्यांच्यासाठी कंप्युटिंग सिस्टिम लावण्यात आलेली व्हीलचेअर तयार केली होती.
बालपणापासूनच स्टीफन (Stephen Hawking) यांना स्पेस साइंटिस्ट बनायचे होते. २० वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी कॅब्रिज मध्ये कॉस्मोलॉजी विषय निवडला आणि त्यावर पीएचडी पूर्ण केली. गंभीर शारीरिक नि:शक्ततेव्यक्तिरिक्त स्टीफन यांनी आंतराळातील काही रहस्य ही उघडकीस आणली.
हे देखील वाचा- तंत्रज्ञानाच्या क्रांतीने बदलणारे “बिल गेट्स”
जगाला ब्लॅक होल आणि बिग बँग सिद्धांत दिले. मोटर न्यूरोन रोगासह आयुष्य जगत १४ मार्च २०१८ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आयुष्याने हजारो-करोडो लोकांना आयुष्य जगण्याची एक नवी उमेद दिली आहे.