Sri lanka new president- ४८ वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेच्या संसदने पहिल्यांदाच प्रत्यक्षात आपला राष्ट्रपती निवडला आहे. बुधवारी १३४ मतांसह रानिल विक्रमसिंघे यांना श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. गोटाबाय राजपक्ष्यांच्या राजीनाम्यानंतर ते कार्यकारी राष्ट्रपतीची भुमिका निभावणार आहेत. आता हे पाहणे फार महत्वाचे असणार आहे की, स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल का. कार्यवाहक राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि सत्ताधारी एसएलपीचे खासदार डलास अलाहाप्पेरुमा यांच्यामध्ये जोरदार टक्कर होण्याची अपेक्षा केली जात होती. पण अलाहाप्पेरुमा यांना राजपक्षे यांच्या परिवारातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. विरोधी पक्षातील सर्वाधिक मोठा नेता सजिथ प्रेमदासा यांनी टक्कर देण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, अलाहाप्पेरुमा हे मैदानात उतरल्यानंतर समीकरण बदलतील अशी चर्चा होती. पण विक्रमसिंघे यांचा विजय झाला.
विक्रमसिंघे यांनी यापूर्वी सुद्धा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची कमान सांभाळली आहे. आता देश संकटाचा सामना करत असताना त्यांना या पदाची कमान सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यासाठी देशातील नागरिकांची असंतोषता आणि दुसऱ्या बाजूला देशाची अर्थव्यवस्था ही सुरळीत करणे हे मोठे आव्हानात्मक आहे.
हे देखील वाचा- श्रीलंकेतील आर्थिक अराजकतेची कारणं आणि सद्यस्थिती…
कोण आहेत रानिल विक्रमसिंघे
युनाइटेड नॅशनल पार्टीचे राजकीय नेते रानिल विक्रमसिंघे हे पेशाने वकिल आहेत. तसेच उत्तम राजकीय नेते सुद्धा आहेत. गेल्या ४५ वर्षांपासून संसदेत ते आहेत आणि श्रीलंकेच्या राजकरणातील प्रत्येक पैलू ते उत्तमपण समजून घेतात. आतापर्यंत ४ वेळा त्यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या रुपात काम केले आहे. २०२२ मध्ये ते पुन्हा एकदा आर्थिक संकटादरम्यान पाचव्या वेळेस पीएम झाले होते. परंतु काही महिन्यांमध्येच त्यांनी पदाचा राजीमाना दिला होता.पहिल्यांदाचा विक्रमसिंघे तत्कालीन राष्ट्रपती रणसिंघे प्रेमदास यांच्या हत्येनंतर १९९३ मध्ये पंतप्रधान झाले होते. विक्रमसिंघे यांच्या राजकरणातील प्रवासाबद्दल असे बोलले जाते की, ते दूरदर्शी आहेत. तसेच त्यांनी ठरवलेली लक्ष्य सुद्धा ते पूर्ण करतात.(Sri lanka new president)
दरम्यान, गोटाबाय राजपक्षे यांनी गेल्याच आठवड्यात राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर विक्रमसिंघे यांना नवे राष्ट्रपती म्हणून निवडले गले. परंतु देश आर्थिक संकटात असताना राजपक्षे हे देश सोडून पळाने नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या घरावर हल्लाबोल ही केला होता. तर राजपक्षे सिंगापूरमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी देश सोडून मालदीव येथे पळ काढला होता. तर देश सोडल्यानंतरच गोटाबाय राजपक्षेंनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.