Home » स्पेस टुरिझममुळे आता पृथ्वी बाहेर ही फिरता येणार…

स्पेस टुरिझममुळे आता पृथ्वी बाहेर ही फिरता येणार…

by Team Gajawaja
0 comment
Space Tourism
Share

स्पेस टूरीझम म्हणजेच अंतराळ पर्यटन आता फक्त काल्पनिक गोष्ट राहिलेली नसून ती वास्तवात आली आहे. अंतराळवीर बनण्याचा खडतर अभ्यास न करता आता कोणीही अंतराळ फिरण्यासाठी जाऊ शकतं. पण हे अंतराळ पर्यटन म्हणजे नेमकं काय आहे, हे पर्यटन करण्यासाठी खर्च तरी किती येतो? (Space Tourism)

Life is Either a Daring Adventure or Nothing at All. प्रसिद्ध लेखिका हेलन केलर यांचं हे वाक्य. या एका वाक्यात प्रवास आणि आयुष्य म्हणजे काय, हे स्पष्ट होतं. तसं पाहायला गेलं तर प्रवासामुळेच आफ्रिकेत जन्मलेला आदिमानव इतर खंडांमध्ये पोहोचला. प्रवासामुळेच भारताचा शोध इतर देशांना लागला. माणसं आधुनिक झाली. आयात-निर्यात वाढली, जग प्रवासामुळेच एकमेकांसोबत जोडलं गेल. काळ बदलत गेला आणि माणूस मनोरंजनासाठी आणि विविध संस्कृती explore करण्यासाठी प्रवास करू लागला. माणसाने अख्ख जग पालथं घातल्यानंतर त्याच्यातली curiosity वाढत गेली आणि मग त्याने आपला प्रवास वळवला अंतरळाकडे ! तसं विमानाचा शोध लागला 1905 साली. आणि त्याच्या अवघ्या 64 वर्षानंतर म्हणजे 1969 साली माणूस थेट चंद्रावर पोहोचला.

त्यानंतर आजपर्यंत कित्येक अंतराळवीर अंतराळात फिरून आले आहेत. पण आता अंतराळात जाण्याचं सौभाग्य फक्त अंतराळवीरांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकालाही होणार आहे, म्हणजे तो सर्वसामान्य नागरिक प्रचंड श्रीमंत असावा इतकच ! पण हा प्रवास करायचा असेल, तर खूप अभ्यास आणि संशोधन करून Astronaut व्हाव लागेल, असं जर तुम्हाला वाटतं असेल तर ते चूक आहे. कारण आता कोणीही अंतराळात प्रवास करू शकतं. त्यालाच Space Tourism म्हणतात. जस आपण फिरण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जातो तसच आता अंतराळात जाता येणार आहे. पण हे Space Tourism काय आहे ? (Space Tourism)

Space Tourism ची सुरवात २००१ साली झाली होती, जेव्हा अमेरिकन बिझनेस मेन डेनिस टीटो हे International Space Station च्या एका मिशन मध्ये सहभागी झाले होते. अंतराळाचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी जवळ जवळ १६५ कोटी रुपय खर्च केले होते. आणि त्यामुळेच ते पहिले Space Tourist ठरले. २००१ ते २००९ दरम्यान ७ धनाढ्य लोकांनी अशीच स्पेस टूर केली आणि त्यांना आलेला खर्च सुद्धा सारखाच होता. स्पेस टुरिजम या बिझनेसमध्ये होणारा आर्थिक फायदा लक्षात घेता अनेक कंपन्यांनी Space Tourism सुरू करण्याचा विचार केला. त्या म्हणजे रिचर्ड ब्रांसन यांची Virgin Galactic कंपनी. दुसरी म्हणजे जेफ बेजोस यांची ब्ल्यु ऑरिजिन ही कंपनी आणि तिसरी म्हणजे Elon Musk ह्यांची Space X कंपनी !

स्पेस टूर करण्याचे काही प्रकार आहेत, ज्यामध्ये Orbital, Suborbital आणि Lunar स्पेस टुरिजमचा समावेश होतो. Virgin Galactic ह्या कंपनीने ११ जुलै २०२१ ला पहिली Suborbital टूर केली. ज्यामध्ये कंपनीचे मालक रिचर्ड ब्रांसन, २ पायलेट्स आणि ३ crew मेंबर सहभागी होते. ही Suborbital Tour टेक ऑफ पासून लॅंडींगपर्यंत 90 मिनिटांची होती. ज्यामध्ये अंतराळातून आपल्या पृथ्वीला बघता येतं आणि 4 मिनिटांसाठी Weightlessness अनुभवता येते म्हणजेच हवेत तरंगल्याचा भन्नाट अनुभव ! ह्या एका अंतराळ प्रवासासाठी Virgin Galactic ही कंपनी सुमारे 2 कोटी रुपय आकारणार आहे. ह्या अंतराळ प्रवासासाठी 600 जणांनी Pre बूकिंग केलय, ज्यामध्ये बऱ्याच Hollywood स्टार्सचा समावेश आहे. (Space Tourism)

पण जेफ बेजोस ह्यांच्या Blue Origin ची Suborbital Tour थोडी वेगळी आहे. जिथे Weightlessness 11 मिनिटांसाठी अनुभवता येतो. आणि ह्या अंतराळ प्रवासासाठी सुरवातीला आलेला खर्च प्रत्येक व्यक्ती मागे एक ते दीड कोटी रुपये एवढा होता, जो आता 3 कोटीपर्यंत गेला आहे.

या Space टुरिजम मध्ये सगळ्यात वेगळे ठरत आहेत ते Elon Musk आणि त्यांची कंपनी SpaceX. SpaceX ह्यांची स्पेस टूर 3 दिवसांची असेल ज्यात पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा घातली जाईल. ह्या टूरसाठी ट्रायल लॉंच 16 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला होता आणि हे मिशन यशस्वी रित्या पूर्ण झालं ! ह्या ऐतिहासिक मिशनच नाव Inspiration 4 होतं. लवकरच हा अंतराळ प्रवास सर्वांसाठी खुला होणार आहे. SpaceX चं ह्या पेक्षा मोठं मिशन लोकांना मंगळावर घेऊन जाण्याचं आहे आणि Elon Musk ह्यांच्या मते तेही लवकरच पूर्ण होईल. (Space Tourism)

====================

हे देखील वाचा : ट्रॅव्हल करण्याचे जबरदस्त फायदे, ऐकून व्हाल हैराण

====================

नुकतेच भारताचे पहिले स्पेस टुरिस्ट गोपी थोटाकुरा यांनी जेफ बेजोस यांच्या ब्लु ओरिजिन एनएस-25 या मिशनमधून अंतराळाचा प्रवास अनुभवला. Space Tourism मुळे होणार सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ह्या रॉकेट्स लॉंचमुळे होणार प्रदूषण ! आता Space Flights ची संख्या कमी आहे. पण भविष्यात ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे प्रदूषणदेखील वाढू शकतो. त्यामुळे या उद्योगपतींनी यावरदेखील काहीतरी तोडगा काढायलाच हवा. आणि त्याची पूर्ण जबाबदारी या तिन्ही कंपन्यांनीच घ्यायला हवी. सध्या तरी एका मध्यमवर्गीय व्यक्तीला ही Space Tour परवडण्यासारखी नाही आहे पण भविष्यात कदाचित सर्वसामान्य माणूसही ही स्पेस टूर करू शकेलं, एवढं नक्की !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.