Sovereign Gold Bond Scheme- केंद्र सरकारकडून गोल्ड मोनेटाइजेशन स्किम अंतर्गत सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ देण्यासाठी २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत जी लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्यांना त्याचा नक्कीच फायदा होता. सॉवरेन गोल्ड योजनेअंतर्गत भारतीय रिजर्व बँक गोल्ड बॉन्डची किंमत ठरवते. वर्ष २०२२-२३ साठी या योजनेची पहिली सीरिज जून महिन्यात आली होती. त्यानंतर दुसरी सीरिजची सुरुवात २२ ऑगस्ट पासून सुरु झाली. या मध्ये २६ ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येईल असे सांगण्यात आले. मात्र सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत स्वस्तात खरंच सोने खरेदी करता येते का? या संबंधित अधिक माहिती आपण आज जाणून घेऊयात.
योजनेत कशा प्रकारे करता येते गुंतवणूक?
कोणत्याही सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत एक ग्रॅम सोने खरेदी करुन गुंतवणूकीची सुरुवात करु शकतात. तर कोणत्याही एक आर्थिक वर्षादरम्यान या योजनेत अधिकाधिक ४ किलो सोने खरेदी केले जाऊ शकते. एचयूएफ आणि ट्रस्टसाठी ही सीमा २० किलो आहे.
योजनेअंतर्गत बॉन्डची खरेदी कशी करता येते?
गोल्ड बॉन्डची खरेदी व्यायसायिक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पॉस्ट ऑफिस आणि अन्य मान्यता प्राप्त एक्सचेंज जसे नॅशनल स्टॉक ऑफ इंडिया लिमिटेड किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व्यतिरिक्त एजंट्सच्या मदतीने खरेदी करता येऊ शकते.(Sovereign Gold Bond Scheme)
ऑनलाईन पेमेंटवर मिळते सूट
या गोल्ड बॉन्डच्या दुसऱ्या सीरिज अंतर्गत याची किंमत ५१९७ रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आली आहे. जी यापूर्वीची पहिली सीरिज अंतर्गत १०६ रुपये अधिक आहे. आरबीआयनुसार या योजनेत कोणताही गुंतवणूकदाराने ऑनलाईन पद्धतीने पैसे भरल्यास त्याला ५० रुपये प्रति ग्रॅम अशी सूट मिळते. अशा प्रकारच्या लोकांना केवळ ५१४७ रुपये प्रति ग्रॅम दराने गोल्ड मिळते. यामध्ये ८ वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. परंतु पाचव्या वर्षानंतर सुद्धा त्याची विक्री करता येते. नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट आणि कॅशच्या माध्यमातून गोल्ड बॉन्डच्या खरेदीचे पेमेंट करता येऊ शकते.
हे देखील वाचा- अंतर्गत स्वस्तात सोने खरेदी करण्याची मिळते संधी
सॉवरेन गोल्ड बॉन्डवर कर्ज घेता येऊ शकते?
सॉवरेन गोल्ड बॉन्डवर आरबीआयच्या FAQ च्या मते, SGB ला कोलॅटरलच्या आधारावर वापर करत बँका, आर्थिक संस्था आणि NBFCs कडून कर्ज घेता येते. दरम्यान, कोणत्याही व्यक्तिला गोल्ड बॉन्डवर कर्ज द्यायचे की नाही हा निर्णय बँका किंवा आर्थिक संस्था यांच्यावर अवलंबून असतो. अधिकाराच्या नावावर या प्रकरणी दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्याचसोबत सॉवरेन गोल्ड बॉन्डवर लोन टू वॅल्यू रेशियो, कोणत्याही साधारण गोल्ड कर्जावर लागू लोन टू वॅल्यू रेश्यो समान असेल. ही लोन टू वॅल्यू रेश्यो वेळोवेळी आरबीआयद्वारे प्रिसक्राइब केले जाते.