Small cap fund investment- प्रत्येकाला उत्तम आयुष्य जगायचे असते म्हणून तो त्याला मिळणाऱ्या पगारातून काही पैसे हे सेविंग्ससाठी बाजूला काढून ठेवतो. मात्र सध्या सेविंग्स करण्याचे सुद्धा बरेचशे ऑप्शन आपल्याला मिळतात. तर काही जण शेअर मार्केटमध्ये ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही थोडी रिस्कच आहे पण त्यामधून मिळणारा नफा सुद्धा तितकाच मोठा आहे. अशातच तुम्ही सुद्धा अशा काही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्या संदर्भातील नियम आणि अटी जाणून घ्या. त्यानंतरच गुंतवणूक करण्याचा विचार करा. अशातच तुम्ही स्मॉल कॅप फंड मध्ये गुंतवणूक करणार असाल तर पुढील काही चुका करणे जरुर टाळा. जेणेकरुन तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
स्मॉल कॅप फंड हा मुख्य पोर्टफोलिओचा भाग करणे म्हणजे कोर पोर्टफोलियोला स्थिरता देते. कारण यामध्ये लार्ज-कॅप इंडेक्स आणि अन्य फंड्स सुद्धा असतात जे स्मॉल-कॅपच्या तुलनेत कमी जोखमीचे असतात. स्मॉल-कॅप म्युचअल फंड एसआयपी कोणत्या ही मुख्य पोर्टफोलियोचे हिस्सा असू नयेत. कारण जर स्मॉल-कॅप फंडमध्ये घट झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणूकीवर होऊ शकतो.
तर म्युचअल फंड एसआयपी सुरु करण्यासाठी कोणत्याही काळाची किंवा वेळेची गरज नसते. कारण एसआपीमध्ये तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक कराल तेवढेच तुम्हाला दीर्घ काळानंतर उत्तम रिटर्न्स मिळतील. त्यामुळे गुंतवणूक करताना जेव्हा मार्केट डाउन असेल तो स्थिर होण्याची वाट पाहण्याची काहीही गरज नाही.
हे देखील वाचा- घरात कधीच ठेवू नका ‘या’ गोष्टी अन्यथा आर्थिक संकटाला बळी पडाल
शेअर मार्केट जेव्हा थंडावतो तेव्हा प्रभावित झालेल्या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करु नका. पण अशा स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करा जे अधिक मजबूत आणि मंदी असेल तरीही अधिक खाली पडणार नाहीत. कारण त्यामध्ये वाढ होण्याची अधिक शक्यता असते. मात्र वन टाइम इन्वेस्टर्सला अशा स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
गुंतवणूक करताना आपण ही काही गोष्टी लक्षात घेतो जेणेकरुन उत्तम रिटर्न्स मिळतील. अशातच एसआयपी मधील लहानसा सुद्धा नफा तुमच्या म्युचअल फंडच्या मेच्यॉरिटीतील रक्कमेत वाढ करतो. त्यामुळे बाजार कोणत्याही स्थितीत असो गुंतवणूकदाराला नेहमीच सल्ला दिला जातो की, काही मर्यादित काळानंतर आपल्या एसआयपीमध्ये हळूहळू वाढ करावी.(Small cap fund investment)
आणखी महत्वाचे म्हणजे काही लोक बाजार वाढला की गुंतवणूक करतात पण मंदी असेल तेव्हा गुंतवणूक करत नाहीत. कारण लोकांना रिस्क घ्यायची नसते म्हणून ते असे करतात. पण बाजार पडल्यानंतर अधिक युनिट्स तुम्ही विकत घेऊ शकता. तर बाजार जेव्हा वाढलेला असेल आणि अशावेळी तुम्ही पैसे टाकलात तर तुम्हाला कमी युनिट्स खरेदी करता येतील.
तर वरील काही गोष्टी लक्षात घेता स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करताना या चुका करु नका. त्याचसोबत तुम्हाला गुंतवणूकी संदर्भात कळेल नसेल तर या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा जाणकर लोकांकडून प्रथम त्या बद्दल समजून घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा.