लहान मुलं ही खोडकर, मस्तीखोर तर कधी शांत असतात. पण काही मुलं ही नेहमीच शांत-शांत राहतात. एखादी गोष्ट करताना ते लाजतात. यामुळे त्यांना मित्र बनवणे सुद्धा कठीण जाते.अशातच पालकांना कळत नाही लाजाळू मुलाची काळजी कशी घ्यायची. खरंतर लाजाळू असणे हा चुकीचा स्वभाव नाही. सर्व मुलं ही वेगळी असतात. काही मुलं दुसऱ्यांच्या तुनलेत अधिक लाजाळू असतात. अशा मुलांना आपल्या मर्जीने आणि क्षमतेने काही गोष्टी करणे आवडते. त्यांना माहिती असते काय करावे आणि काय करू नये. त्यामुळे लाजाळू मुलांना कसं हँन्डल करायचं याच बद्दलच्या टिप्स आपण जाणून घेऊयात. (Shy child care)
एखाद्या गोष्टीसाठी जबरदस्ती करू नये
जर मुलाल एकटे राहणे आवडत नसेल तर त्याला दुसऱ्यांसमोर काहीतरी बोल असे बोलणे चुकीचे आहे. त्याचसोबत तो कोणाला ओळखतच नसेल तर त्यावेळी ही त्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेशरराइज करू नये. यामुळे तो घाबरू शकते. तसेच तो दुसऱ्यांसोबत कंम्फर्टेबल होत नसेल तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये.
एखादा टॅग लावू नका
जर मुलं घाबरत असेल तर त्याला एखादा टॅग लावू नका. जसे की, तो लाजाळू आहे, तो कोणाशी बोलत नाही, कोणासमोर यायला लाजतो असे. असे केल्याने मुलाच्या मनात स्वत: बद्दलच्या निगेटिव्ह फिलिंग्स येऊ शकतात.तो असा विचार करू शकतो की, आपल्यामुळे काही गोष्टी बिघडल्या जात आहेत.असे झाल्यास तो कधीच कोणाशी खुलेपणाने बोलू शकणार नाही. त्याऐवजी पालकांनी तो जसा आहे तसा त्याला स्विकारावे.
बोलण्यासाठी जबरदस्ती नको
पालक नेहमीच आपल्यासोबत त्यांना घेऊन जाताना दुसऱ्यांशी कसे वागावे याबद्दलच्या काही गोष्टी सांगतात. पण जर मुलं लाजाळू असेल आणि पाहुण्यांसमोर बोलण्यास लाजत असेल तर त्यावेळी त्याच्यावर ओरडू नये. अथवा बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्याला आत्मविश्वासू बनवायचे असेल तर पालकांनी त्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्याच्याशी प्रेमाने वागले तरच तो दुसऱ्यांसोबत कंम्फर्टेबल होईल. (Shy child care)
भावना समजून घ्या
पालकांनी मुलं लाजाळू आहे म्हणून राग करू नये. सर्व व्यक्ती एकसारख्या नसतात हे पालकांनी आधी समजून घेतले पाहिजे. मुलाच्या भावना समजून घेतले पाहिजे.जर त्याला मित्रांसोबत खेळण्यास जात नसेल, लाजत असेल तर त्याला सपोर्ट करत काही वेळ द्यावा. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा त्याला मित्रांसोबत जरूर पाठवावे.
मुलांमधील भीती काढा
पालकांनी मुलांना विविध अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलाला वाटत असलेली भीती काढण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे. जेणेकरुन मुलाच्या स्वभावात कालांतरताने बदल होईल.
हेही वाचा- आजच्या काळात मुलांमध्ये वाढतोय ऐकटेपणा