Home » Janmashtami : जन्माष्टमीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी करा श्रीकृष्णाच्या १०८ नावांचा जप

Janmashtami : जन्माष्टमीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी करा श्रीकृष्णाच्या १०८ नावांचा जप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Janmashtami | Top Marathi Headlines
Share

आज श्रीकृष्णाची जयंती. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जीवनकाळात समाजाला सत्याच्या मार्गावर चालण्याची आणि अन्यायाला विरोध करण्याची मोठी शिकवण दिली. खट्याळ, गोड, निरागस देव म्हणून श्रीकृष्णाची ओळख आहे. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. सर्वत्र दहीहंडी आणि जन्माष्टमीच्या पूजेची धूम पाहायला मिळत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता झाला होता. वैदिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी १५ ऑगस्ट रोजी रात्री ११:४९ वाजता सुरू होणार असून, १६ ऑगस्ट रात्री ९:३४ वाजता संपेल. (Todays Marathi Headline)

जन्माष्टमीची साग्रसंगीत पूजा झाल्यानंतर कृष्णाच्या जन्मवेळी अर्थात मध्यरात्री देवासमोर दिवे, धूप, शंख आणि घंटा वाजवून आरती करा. भगवद्गीतेचे श्लोक वाचा, कृष्णाची गाणी, पाळणा म्हणा, भजन-कीर्तन करा. ज्या महिला गरोदर आहेत, त्यांनी पुढील मंत्र म्हणा. “ॐ देवकीसुत गोविन्द वासुदेव जगत्पते। देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गताः॥” या मंत्राचा जप केल्यास गरोदर महिलांची प्रसूती सुलभ होते आणि त्यांना उत्तम संततीची प्राप्ती होते. यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचे १०८ नावांचे देखील वाचन करावे. या नावांचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. (Top Trending News)

मानसिक शांती आणि सौभाग्यासाठी जन्मशमतीच्या दिवशी ‘ओम क्रीम कृष्णाय नमः’, भक्ती आणि मोक्षासाठी ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’, वैवाहिक सुख आणि प्रेमासाठी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’, समृद्धी आणि कृपेसाठी ‘क्लीम कृष्णाय नमः’ आणि ‘ओम भगवते नमः’मंत्राचा जप करावा. तसेच श्री कृष्णम् शरणम् मम आणि श्री कृष्णाष्टकम् यांचे पठण करा. भक्तांनी जन्माष्टमीचा उपवास करावा, जो निर्जला किंवा फळ आहार खाऊन केलेला देखील असू शकतो. (Top Marathi News)

Janmashtami

श्री कृष्ण हा भगवान विष्णूचा ८ वा अवतार आहे. श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगात वासुदेव आणि देवकी यांचे आठवे अपत्य म्हणून झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला होता, परंतु यशोदा आणि नंदांनी त्यांचे पालनपोषण गोकुळात केले. श्रीकृष्णांनी त्यांच्या बाल्यकाळात अनेक चमत्कार केले. तरुणपणात कंसाचा वध केला. त्यानंतर घडलेल्या महाभारतामध्ये महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि त्याला भगवद्‌गीतेचे ज्ञान दिले. अशा या श्रीकृष्णाची १०८ नावे आपण म्हटल्याचे आपल्या मनोकामना तर पूर्ण होतातच सोबतच निरोगी उदंड जीवनाची प्राप्ती होते. श्रीकृष्णाची १०८ नावे पुढील प्रमाणे आहेत. (Social News)

==============

हे देखील वाचा : Dahihandi : जन्माष्टमीनंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाचे महत्व

Janmashtami : जन्माष्टमी विशेष : भारतातील प्रसिद्ध कृष्णमंदिरं

===============

भगवान श्रीकृष्णाची १०८ नावे
कृष्ण
कमलनाथ
वासुदेव
सनातन
वसुदेवात्मज
पुण्य
लीलामानुष विग्रह
श्रीवत्स कौस्तुभधराय
यशोदावत्सल
हरि
चतुर्भुजात्त चक्रासिगदा
सङ्खाम्बुजा युदायुजाय
देवाकीनन्दन
श्रीशाय
नन्दगोप प्रियात्मज
यमुनावेगा संहार
बलभद्र प्रियनुज
पूतना जीवित हर
शकटासुर भञ्जन
नन्दव्रज जनानन्दिन
सच्चिदानन्दविग्रह
नवनीत विलिप्ताङ्ग
नवनीतनटन
मुचुकुन्द प्रसादक
षोडशस्त्री सहस्रेश
त्रिभङ्गी
मधुराकृत
शुकवागमृताब्दीन्दवे
गोविन्द
योगीपति
वत्सवाटि चराय
अनन्त
धेनुकासुरभञ्जनाय
तृणी-कृत-तृणावर्ताय
यमलार्जुन भञ्जन
उत्तलोत्तालभेत्रे
तमाल श्यामल कृता
गोप गोपीश्वर
योगी
कोटिसूर्य समप्रभा
इलापति
परंज्योतिष
यादवेंद्र
यदूद्वहाय
वनमालिने
पीतवससे
पारिजातापहारकाय
गोवर्थनाचलोद्धर्त्रे
गोपाल
सर्वपालकाय
अजाय
निरञ्जन
कामजनक
कञ्जलोचनाय
मधुघ्ने
मथुरानाथ
द्वारकानायक
बलि
बृन्दावनान्त सञ्चारिणे
तुलसीदाम भूषनाय
स्यमन्तकमणेर्हर्त्रे
नरनारयणात्मकाय
कुब्जा कृष्णाम्बरधराय
मायिने
परमपुरुष
मुष्टिकासुर चाणूर मल्लयुद्ध विशारदाय
संसारवैरी
कंसारिर
मुरारी
नाराकान्तक
अनादि ब्रह्मचारिक
कृष्णाव्यसन कर्शक
शिशुपालशिरश्छेत्त
दुर्यॊधनकुलान्तकृत
विदुराक्रूर वरद
विश्वरूपप्रदर्शक
सत्यवाचॆ
सत्य सङ्कल्प
सत्यभामारता
जयी
सुभद्रा पूर्वज
विष्णु
भीष्ममुक्ति प्रदायक
जगद्गुरू
जगन्नाथ
वॆणुनाद विशारद
वृषभासुर विध्वंसि
बाणासुर करान्तकृत
युधिष्ठिर प्रतिष्ठात्रे
बर्हिबर्हावतंसक
पार्थसारथी
अव्यक्त
गीतामृत महोदधी
कालीयफणिमाणिक्य रञ्जित श्रीपदाम्बुज
दामोदर
यज्ञभोक्त
दानवेन्द्र विनाशक
नारायण
परब्रह्म
पन्नगाशन वाहन
जलक्रीडा समासक्त गोपीवस्त्रापहाराक
पुण्य श्लोक
तीर्थकर
वेदवेद्या
दयानिधि
सर्वभूतात्मका
सर्वग्रहरुपी
परात्पराय

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.