Shoulder Workout Tips : आजच्या काळात बहुतांशजण आपण परफेक्ट शेपमध्ये दिसण्यासाठी जिममध्ये जातात. खरंतर, वर्कआउट करताना शरिराच्या प्रत्येक अंगाकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. हेच कारण आहे की, आठवड्यातून एकदातरी काहीजण शोल्डर वर्कआउट करतात. ज्यावेळी तुम्ही शोल्डर वर्कआउट करता त्यावेळी स्ट्रेन्थ आणि स्टेबिलिटीवर लक्ष द्यावे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
योग्य पद्धतीने वार्मअप
ज्यावेळी तुम्ही वर्कआउट करता तेव्हा मसल्सवर ताण पडला जातो. यावेळी वार्मअप जरुर करा. शोल्डर वर्कआउटआधी तुम्ही डायनेमिक स्ट्रेचिंग जसे की, आर्म सर्कल, शोल्डर श्रग आणि आर्म स्विंग्स. याशिवाय वर्कआउटआधी अधिक वजन उचलण्याआधी हलक्या वजनांनी सुरुवात करा.
खांद्याच्या मसल्सवरही लक्ष द्या
वर्कआउट करत असल्यास फ्रंट, साइड आणि रियर अशा तिन्ही मसल्सवर काम करा. फ्रंट मसल्ससाठी फ्रंट रेज आणि ओव्हरहेड प्रेस सारख्या एक्सरसाइज करू शकता.
व्यायाम करताना योग्य पोश्चरकडे लक्ष द्या
शोल्डर वर्कआउट करताना आपल्या शरिराच्या योग्य पोश्चरकडे देखील लक्ष द्यावे. सुरुवातीलाच जड वजन उचलण्यापासून दूर रहावे. याशिवाय स्टेबिलिटी कायम ठेवण्यासाठी कोर टाइट करुन ठेवा. वर्कआउट दरम्यान तुम्ही ज्या मसल्सवर काम करत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. (Shoulder Workout Tips)
वेगवेगळ्या इक्विपमेंटचा वापर करा
शोल्डर वर्कआउट करताना केवळ डम्बलचाच वापर करू नये. जिममध्ये शोल्डर वर्कआउट करू शकताय. यासाठी वेगवेगळ्या इक्विपमेंटचा वापर करू शकता. यावेळीही देखील पहिल्यांदाच शोल्डर वर्कआउट करत असल्यास ट्रेनरची मदत घ्या.