लग्नाचा खरा अर्थ काय होतो? भारतात लग्न म्हणजे एकमेकांसोबत आयुष्य जगणं-मरण्याची शपथ घेतली जाते. तसेच संपूर्ण आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतात. या व्यतिरिक्त पार्टनर एकमेकांची काळजी घेणे, प्रेम, भावना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणे. पण जगातील विविध देशांमध्ये लग्नाचे महत्व ही वेगळे आहे. बहुतांश देशांत लग्नाचा अर्थ असा होतो की, संस्कृति, सामाजिक व्यवस्था, परंपरा आणि प्रथेनुसार बदलला जातो. अशातच आता जापानमध्ये विकेंड मॅरेजचा ट्रेंन्ड सुरु झाला आहे. (Separation Marriage)
सेपरेशन मॅरेज असे कोणालाही म्हटले तर काय वेडेपणा आहे असेच म्हणेल. याचा विविध प्रकारे ही अर्थ काढला जाऊ शकतो. पण नक्की सेपरेशन मॅरेज म्हणजे काय हेच आपण जाणून घेऊयात.
सेपरेशन मॅरेज म्हणजे असे नाही की, लग्नाआधीच वेगळे होण्याचा निर्णय घेणे. पण यामध्ये विवाहित कपल एकमेकांसोबत राहत नाहीत. जापानमध्ये वाढत असलेल्या सेपरेशन मॅरेज किंवा विकेंड मॅरेजमुळे कपल एकाच घरात राहून एकमेकांसोबत एकच रुम शेअर करत नाहीत. अथवा काही कपल्स दुसरीकडे राहतात. ऐवढेच नव्हे तर काही कपल्स शहर किंवा एका सोसायटी राहून सुद्धा दररोज भेटत नाहीत. यामध्ये कपल्स भावनिक जोडलेले नसतात असे नसते. त्यांचे नाते विवाहित नवरा-बायकोसारखे असते.
सेपरेशन मॅरेजमध्ये विवाहित कपल्सला आपले आयुष्य स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार असो. यामध्ये दोघांमध्ये विश्वास ही असतो. अशा रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्यांचे मानणे आहे की, बहुतांश कपल्स लाइफस्टाइल ही वेगळी असते. याचा आणखी एक फायदा असा होतो की, वेगवेगळे राहिल्याने झोप पूर्ण होतेच पण सवयींमध्ये सद्धा सुधारणा होत राहते. यामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत होतेच. खरंतर जपानमध्ये पुरेशी झोप फिजिकल आणि मानसिक हेल्थसाठी फार गरजेचे असल्याचे मानले जाते. (Separation Marriage)
सेपरेशन मॅरेजमध्ये मुलांची काळजी मात्र आईलाच घ्यावी लागते. तर लग्नानंतर नवरा स्वत: चे कपडे स्वत: धुणे, जेवण बनवणे अशी काही घरातील कामे त्यालाच करावी लागतात. महिलेला नवरा असला तरीही स्वत: ला ही कमाई करावे लागते.
हेही वाचा- तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल तर ‘या’ टीप्स येतील कामी
जपानी संस्कृतीत शरीराशी बाह्य संपर्क कमी करण्याची परंपरा खूप सामान्य आहे आणि जपानमध्ये पती-पत्नीने रात्री स्वतंत्रपणे झोपणे अगदी सामान्य आहे. असं असणंही सक्तीचं नाही. पती-पत्नीला एकत्र झोपायचे असेल तर ते झोपू शकतात.