बहुतांश जणांना प्रश्न पडतो की, आपण एकत्रित किती बचत खाती उघडू शकतो, जेणेकरुन इनकम टॅक्स संदर्भात समस्या येऊ नये? त्याचसोबत असा ही प्रश्न असतो की, बचत खात्यात अधिकाधिक किती रक्कम ठेवावे जेणेकरुन इनकम टॅक्सची नोटीस येणार नाही? अशा ग्राहकांना हे जाणून घेणे फार गरजेचे असते की, त्यांच्या खात्यात असलेल्या रक्कमेवर किती टॅक्स लागू शकतो आणि किती नाही.(Saving Account)
खरंतर बँकेकडून बचत खात्यावर वर्षिक व्याज दिले जाते. तरीही सर्व बँकांचे व्याज हे वेगवेगळे असते. काही ग्राहकांना हे माहिती नसते की, एका आर्थिक वर्षात आपण किती रक्कम ठेवावी किंवा किती रक्कम काढावी. जेणेकरुन तुम्ही टॅक्सच्या विभागात येणार नाहीत? बचत खात्यासंदर्भातील अशा प्रकारचे काही भ्रम हे टॅक्सपेअरच्या डोक्यात असतात. परंतु ते वेळीच दूर केले पाहिजेत.
बचत खात्यात किती रक्कम ठेवू शकतो?
सामान्यपणे बचत खात्यात तुम्ही किती पैसे जमा करु शकता आणि काढू शकता. यामध्ये पैसे जमा किंवा काढण्यावर ही मर्यादा नसते. दरम्यान, बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्यावर मात्र मर्यादा असते. पण तुम्ही चेक किंवा ऑनलाईन पद्धतीन १ रुपये ते कोटी रुपये जमा करु शकतात.
टॅक्स विभागाला द्यावे लागते उत्तर
बँक कंपन्यांना प्रत्येक वर्षाला टॅक्स डिपार्टमेंटला बँकेच्या ग्राहकांद्वारे १० लाख किंवा त्याहून अधिक रक्कम काढल्याप्रकरणी उत्तर द्यावे लागते. टॅक्स कायद्याअंतर्गत बँकेला आताच्या आर्थिक वर्षादरम्यान त्या खात्यांची माहिती द्यावी लागते. ही मर्यादा करदात्याच्या एक किंवा एकापेक्षा अधिक खाच्यात आर्थिक वर्षात दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्याच्या रुपात पाहिली जाते. (Saving Account)
ऐवढीच रोख रक्कम जमा करु शकता
करंट अकाउंटमध्ये रोख रक्कमेची सीमा ५० हजार रुपयांपर्यंतच आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला खात्यातील व्यवहारांसंदर्भात आणि इनकम टॅक्सचा नियम 114E बद्दल माहिती असावे. यामुळे त्याला एका आर्थिक वर्षात आपण किती पैसे जमा करावे किंवा काढावे जेणेकरुन आयकरच्या रडावर येणार नाही हे कळेल.
हे देखील वाचा- टेक कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना का दाखवतायत एक्झिट? भारतातील लोकांवर काय होणार परिणाम?
व्याजावर द्यावा लागतो टॅक्स
बँकेच्या बचत खात्यावर जमा झालेल्या रक्कमेवर खातेधारकाला टॅक्स द्यावा लागतो. बँक १० टक्के टीडीएस व्याज कापते. व्याजावर तर टॅक्स द्यावा लागतो. परंतु टॅक्स कपातीचा सुद्धा लाभ घेता येतो. त्यासाठी आयकर अधिनियम कलम ८० टीटीएनुसार सर्व व्यक्ती १० हजारांपर्यंत टॅक्स सुट मिळवू शकतात. जर व्याज १० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर टॅक्स द्यावा लागत नाही.
अशा प्रकारे ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या खातेधारकाला ५ हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर टॅक्स द्यावा लागत नाही. जर तुमच्या वार्षिक उत्पन्नात व्याज मिळवल्यानंतर ही तुमचे वार्षिक उत्पन्न तेवढे होत नाही तर त्यावर टॅक्स द्यावा लागत असल्यास तुम्हाला फॉर्म 15G जमा करुन बँकेद्वारे कापलेल्या टीडीएसचा रिफंड पुन्हा मिळवू शकता.