गणेशोत्सव संपला की लगेच पितृपक्षाला सुरुवात होते. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून लगेच हा पितृ पंधरवडा चालू होतो. आपल्या पूर्वजांना, मृत व्यक्तींना या काळात आठवून त्यांना जेऊ घालण्याची परंपरा आहे. पितृपंधरवड्याच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी पित्र येतात. त्यामुळे या काळात पिंडदानाच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना स्मरण करण्याचा हा काळ असतो. या काळात वडीलांना वसू समान, आजोबांना रूद्र देवतांसमान आणि पणजोबांना आदित्य देवता समान मानले जाते.
या पितृपक्षाचा शेवट सर्वपित्री अमावास्येने होते. या दिवसाला अतिशय महत्व आहे. यादिवशी पितरांना पुन्हा जेऊ घातले जातो. पितृ पंधरवड्याच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार हे श्राद्धकर्म करण्यात येते. मात्र जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर काळजीचे कारण नसते. ‘सर्वपित्री अमावस्याला’ सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते, असे हिंदू धर्मात सांगितले आहे.
यंदा सर्वपित्री अमावस्या हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल. तर २ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी संपले. अशावेळी उगवत्या सूर्याने पाहिलेल्या उदयतिथीनुसार २ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असेल.
पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण विधि करतात. हा विधी झाल्यानंतर बहुतकरून कावळ्याला सोबतच कुत्रा, गाय यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याची तृप्ती होऊन त्यांना शांती मिळते अशी मान्यता आहे.
पितरांच्या मृत्यूतिथी नुसार या काळात श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसेल, तर ‘सर्वपित्री अमावस्याला’ सर्व पितरांचे एकत्र श्राद्ध कर्म करता येते. मृत्यूनंतर जर पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म झाले नाही, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे. त्यामुळेच वर्षभरत कधी श्राद्ध करण्यास जमले नाही तर पितृपक्षात नाहीतर सर्वपित्री अमावस्येला तरी त्यांचे श्राद्ध करावे असे सांगितले जाते.
पंचांगानुसार, अमावस्या तिथीला अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला मृत व्यक्तीच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल, काही अडचण असेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतो. अमावस्या तिथीला श्राद्ध केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते. ज्या पितरांची मृत्यु तारीख माहित नाही त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते.
अमावस्या श्राद्धात जेवणात तांदळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे महत्वाचे असतात. भोजन देण्याची आणि श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असावी. ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी पिंडदान करावे. ब्राह्मणाला श्रद्धेने अन्नदान करा, त्यांना दक्षिणा द्या. नंतर घरातील सर्व सदस्यांनी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी.
सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तर्पण करताना पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले, सुगंधित पाणी अर्पण करा. तर पिंडदान करताना भाताच्या पिंडांना अंगठ्याने पाणी देऊन तीन पिठीचे पिंडदान करावे. यासोबतच या दिसव्ही गरिबांना कपडे दान करा.
शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी-देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.