जगभरात फिफा वर्ल्ड कप बद्दलच सध्या चर्चा सुरु आहे. पण तो वादाच्या भोवऱ्यात ही अडकल्याने अधिकच चर्चा केली जात आहे. अशातच कतारमधील महिलांसंबंधित नियम फार वेगळे आहेत. त्याचसोबत जगभरातील चाहत्यांना सुद्धा देशाच्या कायदे-नियमात राहण्याची सूचना दिली गेली आहे. युरोप आणि अमेरिकेतील देशांमधून आलेल्या चाहत्यांना कतारच्या नियमांनुसार रहावे लागत आहे. खासकरुन परदेशातून आलेल्या महिलांना. त्यांच्या कपड्यांवरुन कतारने गाइडलाइन्स जाहीर केल्या होत्या. याच कारणामुळे वाद सुरु आहे.(Rules for women in Qatar)
परदेशातून आलेल्या महिला चाहत्या आणि कतार मधील महिलांमध्ये फार मोठा फरक असल्याचे दिसते. कतार मधील महिला काळ्या रंगाच्या बुरख्यात किंवा विविध रंगाच्या हिजाबमध्ये दिसतात. खरंतर इस्लामिक देशात महिलांना हिजाबाशिवाय राहण्याची परवानगी नाही. त्या वेस्टर्न ड्रेस घालू शकत नाहीत. ऐवढेच नव्हे तर महिलांच्या अधिकारांसंदर्भात ही काही नियम आहेत. कतर मधील महिला स्वत: निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना पुरुषांकडून मंजूरी घ्यावी लागते.
कतारमधील महिलांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी पुरुष मंडळींची लेखी परवानगी घ्यावी लागते. हे असे करणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे परवानगी नसेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते परदेशात शिकण्यासाठी जाणे, विवाह करणे किंवा तलाक घेण्यासारखे निर्णय असो तरीही त्यांना पुरुषांना विचारुन सर्वकाही करावे लागते.
खरंतर पुरुष गार्जियन यांचा सिद्धांत कायदेशीर नाही. ही एक परिवाराची व्यवस्था आहे. शिकलेल्या परिवारातील आणि अन्य लोक सुद्धा याचे कठोरपणे पालन करत नाहीत. दरम्यान, रुढीवादी विचार ठेवणारी लोक या नियमानुसारच चालतात. मानवाधिकार संगठन ह्युमन राइट्स वॉचने वर्ष २०१९ मध्ये करतच्या महिलांच्या काही घटना प्रकाशित केल्या होत्या.(Rules for women in Qatar)
हे देखील वाचा- सौदी अरेबिया बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच इमारत बांधणार
त्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले होते की, पुरुष गार्जियनची व्यवस्था कायद्यारुपात स्पष्ट करण्यात आलेली नाही. येथे काही कायदे हे नीती आणि प्रथा मिळून बनवण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्रौढ महिलांना सुद्धा खास कामांसाठी पुरुष गार्जियनची परवानगी घ्यावी लागते. वडिल, भाऊ, गॉड फादर किंवा नवरा असे कोणीही गार्जियन असू शकतात. ह्युमन राइट्स वॉचच्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, या व्यवस्थेच्या कारणास्तव काही महिलांना शोषणाला सामोरे जावे लागते.