जगातील काही लोक अशी असतात जे दुर्दैवाने मोठ्या संधी हुकवतात. अशातच अॅप्पलचे असे एक व्यक्ती ज्यांनी आपली अब्जावधींची संपत्ती आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याची संधी गमावली. अॅप्पलचे को-फाउंडर्स राहिलेले रोनाल्ड वेन यांच्यासोबत हे झाले. वेन यांच्याजवळ अॅप्पलचे १० हजार रुपयांचे शेअर होते. ते त्यांनी कवडीमोलाच्या भावाने विक्री केले. मात्र जर त्यांनी हे शेअर विकले नसते तर आज त्यांची किंमत २० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असती. (Ronald Wayne)
मार्केट कॅपच्या दृष्टीकोनातून अॅप्पल जगातील सर्वाधिक श्रीमंत कंपन्यांपैकी एक आहे. याची मार्केट वॅल्यू जवळजवळ २.९ ट्रिलियन डॉलर आहे. सध्याच्या काळात ज्या व्यक्तीकडे कंपनीची १ टक्के जरी हिस्सेदारी असेल त्याची वॅल्यू २९ अरब डॉलर आहे. रोनाल्ड वेन यांच्याकडे सुद्धा कंपनीचे १० टक्के शेअर होते. त्यांनी हे शेअर केवळ ८०० डॉलरमध्ये विक्री केले.
३ लोकांनी मिळून उभारली होती कंपनी
स्टीव विज्नियाक, स्टीव जॉब्स आणि रोनाल्ड वेन यांची अॅप्पलची सुरुवात केली होती. वेन त्यावेळी ४२ वर्षांचे होते. तर त्यांचे सह-संस्थापक २० वर्षांचे होते. त्यांच्याकडे मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि डॉक्युमेंटेशनचे काम सोपवले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कंपनीची १० टक्के हिस्सेदारी होती. त्यांनी अॅप्पलचा पहिला लोगो सुद्धा तयार केला.
दिवाळखोर होण्याच्या भीतीने विकले शेअर
स्टीव जॉब्सने द बाइट शॉपच्या आधी करार पूर्ण करण्यासाठी १५००० डॉलरचे कर्ज घेतले होते. मात्र पैसे न दिल्याने ही कंपनी बदनाम झाली होती.अशातच वेन यांना असे वाटले की, स्टीव जॉब्स त्यांचे पैसे पुन्हा देणार नाहीत. याचा सर्व भार त्यांच्यावर येईल. कारण जॉब्स आणि वोज्नियाक यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हते. कंपनीच्या आर्थिक संकटाच्या भीतीपोटी त्यांनी करारातून आपले नाव हटवले आणि आपली हिस्सेदारी केवळ ८०० डॉलरमध्ये विक्री केली. हैराण करणारी गोष्ट अशी की, त्यांच्याकडे जे शेअर असते तर ते आज २९० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असते. (Ronald Wayne)
हेही वाचा-Success Story: वयाच्या 17 वर्षी सोडले होते घर, आज आहेत यशस्वी व्यावसायिक
मात्र वेन यांनी असे सुद्धा म्हटले होते की, त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना खंत वाटत नाही. त्यांनी म्हटले होते की, अॅप्पल त्यांच्यासाठी योग्य जागा नव्हती. मात्र जर त्यांनी तेथून सुरुवात केली असती तर पुढील २० वर्षांपर्यंत कागदपत्रांचीच तपासणी करत राहिले असते.