Home » Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व

Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व

by Team Gajawaja
0 comment
Rishi Panchami 2025
Share

Rishi Panchami 2025 : आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवामागे काहीतरी आध्यात्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व असते. त्यापैकी ऋषीपंचमी हा एक महत्त्वाचा धार्मिक दिवस मानला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा दिवस साजरा केला जातो. विशेषतः स्त्रियांकरिता या दिवसाला खूप मोठे महत्त्व आहे. कारण या दिवशी सप्तऋषींचे पूजन करून स्त्रिया आपले पापक्षालन आणि शुद्धीकरण करण्यासाठी व्रत करतात. येत्या 28 ऑगस्टला ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. अशातच ऋषीपंचमीचे महत्व आणि कथा पुढे जाणून घेऊया.

पौराणिक कथेनुसार, एका ब्राह्मणाच्या घरी आई व मुलगी राहत होत्या. एकदा आईला मासिक पाळी आली असताना तिने अशुद्धतेच्या काळात घरकाम केले व पतीस जेवण घालून दिले. त्यामुळे ती अशुद्ध राहिली आणि तिच्याकडून पाप घडले. मृत्यूनंतर ती आई कीटक योनीत गेली, म्हणजे तिला पुढच्या जन्मात कीटकाचे रूप मिळाले. तिच्या मुलीने जेव्हा ऋषींच्या सांगण्यावरून ऋषीपंचमीचे व्रत केले तेव्हा आईचा उद्धार झाला. या कथेतून ऋषीपंचमीचे महत्त्व स्पष्ट होते.

ऋषीपंचमी हा दिवस सप्तऋषींच्या स्मरणार्थ मानला जातो. सप्तऋषी म्हणजे – कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ. या सप्तऋषींनी धर्म, संस्कृती, वेद-शास्त्रांचे जतन व संवर्धन करून समाजाला योग्य दिशा दाखवली. त्यामुळे या दिवशी स्त्रिया या ऋषींचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतात.

Rishi Panchami 2025

Rishi Panchami 2025

या व्रताचे धार्मिक महत्त्व असे आहे की, हे व्रत स्त्रियांना अशुद्धतेमुळे किंवा नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती देणारे आहे. स्त्रिया उपवास करतात, स्नान करून शरीर-मन शुद्ध करतात आणि नंतर सप्तऋषींचे पूजन करतात. यात विशेषतः अरणीचे (कुठल्याही प्रकारच्या पाने-फुले-धान्य) पूजन केले जाते. महिलांनी या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, तेलकट पदार्थ टाळून फक्त फळाहार व उपवास करणे योग्य मानले जाते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ऋषीपंचमीचा महत्त्व आहे. वर्षाच्या या काळात पावसाळा संपत असतो आणि हवामान बदलते. पावसाळ्यात अनेक कीटक, जीवाणू, जंतू यांचा प्रादुर्भाव वाढतो. स्त्रियांनी उपवास करून शरीराला विश्रांती देणे, स्वच्छता राखणे आणि पचनास सोपे अन्न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे या व्रताला धार्मिकतेसोबतच आरोग्यदायी महत्त्व आहे.(Rishi Panchami 2025)

=========

हे देखील वाचा :

Bail Pola : बैलपोळा- बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

Amavasya : पिठोरी अमावस्येचे मुहूर्त आणि माहिती

Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’

===========

या व्रतामागील मुख्य संदेश म्हणजे शुद्धता, कृतज्ञता आणि आत्मशुद्धी. आपल्या ऋषींनी दिलेल्या ज्ञानामुळे आजही समाज संस्कारशील व आध्यात्मिक आहे. त्या ऋषींना स्मरून कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.अशा प्रकारे, ऋषीपंचमी हा दिवस फक्त उपवास किंवा पूजा करण्यापुरता मर्यादित नसून, तो आत्मशुद्धी, संस्कार आणि अध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे आजही अनेक कुटुंबांत स्त्रिया श्रद्धेने आणि निष्ठेने ऋषीपंचमी साजरी करतात.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.