एपिलेप्सी, म्हणजेच मिरगीचा आजार असलेल्या रुग्णांसाठी लंडनमधून एक आशादायक बातमी आली आहे. येथील एका शाळकरी मुलाच्या मेंदूमध्ये चक्क एपिलेप्सीच्या झटक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्र बसवण्यात आलं. यामुळे या मुलाच्या मेंदुला विद्युत सिग्नल पाठवले जातात. त्यातून या मुलाला एपिलेप्सीमुळे येणारे झटक्यांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे जगभरातील एपिलेप्सीच्या रुग्णांना आशेचा किरण दिसला आहे.
दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील एक शाळकरी मुलगा एपिलेप्सी आजारानं वयाच्या तिस-या वर्षापासून ग्रस्त होता. एपिलेप्सीच्या झटक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या कवटीत न्यूरोस्टिम्युलेटर नावाचे उपकरण लावण्यात आले. अशा पद्धतीचे उपकरण बसवणारा जगातील तो पहिला व्यक्ती बनला आहे. हे उपकरण मेंदूला खोल विद्युत सिग्नल पाठवते.(Epilepsy Patients)
यामुळे एपिलेप्सींच्या झटक्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. या न्यूरोस्टिम्युलेटर नावाच्या उपकरणआनं १२ वर्षाच्या नॉनसन आणि त्याच्या कुटुंबियांचेही जीवन बदलले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, किंग्स कॉलेज हॉस्पिटल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगातून या चाचण्या करण्यात आल्या. त्या यशस्वी ठरल्यानं जगभरातील एपिलेप्सीच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. नॉलसनवर ऑक्टोबरमध्ये लंडनमधील ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. आता हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्याचे त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले आहे.
हे उपकरण बसवण्यापूर्वी, नॉलसनला दररोज दोन डझनाहून अधिक झटके एपिलेप्सीचे येत असत. परंतु हे उपकरण लावल्यानंतर एपिलेप्सीचे झटके ८० टक्के कमी झाले आहेतच शिवाय त्यांची तीव्रताही कमी झाली आहे. एपिलेप्सी हा मेंदूचा एक आजार आहे. ज्यामध्ये पेशी नीट संकेत देत नाहीत, त्यामुळे शरीराला झटके बसतात. अशा रुग्णांसाठी नॉलसनवर झालेला प्रयोग आशादायक ठरला आहे. नॉलसनच्या आईनं हे उपकरण एक जादुचं असल्याचे वर्णन केले आहे. हे उपकरण नॉलसनला लावल्यापासून त्याच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगितले आहे. एपिलेप्सीच्या रुग्णाच्या कवटीत असे उपकरण बसवण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. तसेच, न्यूरोस्टिम्युलेटर उपकरणाची चाचणी घेणारा नॉलसन हा जगातील पहिला रुग्ण ठरला आहे. (Epilepsy Patients)
ऑक्टोबर 2023 मध्ये लंडनमधील ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये एक प्रयोग म्हणून नॉलसन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आळी. त्याला त्याच्या आईवडीलांची परवानगी होती. नॉलसनला लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम आहे. या सिंड्रोममुळे, त्याच्यावर एपिलेप्सीचा उपचार करणे खूप कठीण झाले होते. वयाच्या तिस-या वर्षापासून या आजारानं नॉनसल त्रस्त आहे. तेव्हापासून त्याला दररोज दोन डझनहून अधिक झटके येत आहेत. शस्त्रक्रियेच्या आधी नॉलसनचे जीवन हे कष्टाचे होते. एपिलेप्सीने त्यांचे संपूर्ण बालपण हिरावून घेतल्याचे त्याची आई सांगते. नॉलसनला झटके आल्यावर जमिनीवर पडणे, हिंसकपणे ओरडणे आणि बेशुद्ध होऊन पडणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. ब-याचवेळा त्याचा श्वासही थांबायचा. (Epilepsy Patients)
==============
हे देखील वाचा : केरळातील या ठिकाणांना आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या
==============
अशावेळी त्याला इंजेक्शनचे डोस द्यावे लागत असत. एपिलेप्सीच्या रुग्णांना जेव्हा झटके येतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये विद्युत क्रियांचा असामान्य स्फोट सुरू होतो. आता नॉलसनच्या डोक्यात लावलेल्या न्यूरोस्टिम्युलेटर उपकरणामुळे विजेच्या सतत स्पंदनांचे उत्सर्जन होते आणि असामान्य सिग्नल अवरोधित करण्याचे महत्त्वाचे काम करण्यात येते. त्यामुळे या एपिलेप्सीच्या झटक्यांनाही ते रोखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालरोग न्यूरोसर्जन मार्टिन टिस्डॉल यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन झाले आहे. ३.५ सेमी चौरस आणि ०.६ सेमी जाडीच्या या उपकरणामुळे आता नॉलसनचे आयुष्य बदलून गेले आहे. (Epilepsy Patients)
एपिलेप्सी हा एक दीर्घकालीन आजार आहे. ज्यामध्ये खराब झालेल्या मेंदूच्या पेशींद्वारे तयार केलेल्या असामान्य विद्युत सिग्नलमुळे वारंवार शरीराला झटके बसतात. त्यामुळे मनुष्याचे त्याच्या स्नायुंवरील नियंत्रण कमी होते. एपिलेप्सीला सीझर डिसऑर्डर असेही म्हणतात. नॉलसनवर जो प्रयोग झाला तसाच प्रयोग अमेरिकेतही सुरु आहे. कारण अमेरिकेत सुमारे ३.४ दशलक्ष नागरिक एपिलेप्सी ग्रस्त आहेत. अमेरिकेत दरवर्षी अपस्माराची १५०००० नवीन प्रकरणे आढळतात. जगभरात अंदाजे ६५ दशलक्ष लोक एपिलेप्सीने ग्रस्त आहेत. या सर्वांना नॉलसनवरील उपचार मार्गदर्शक ठरणार आहेत.
सई बने