जर तुमच्याकडे फाटलेल्या जुन्या नोटा असतील तर तुम्ही त्या सहज बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे-तिथे जाण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही त्या तुमच्या जवळच्या बँकेत बदलू शकता. आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार, जर एखाद्या बँकेने तुम्हाला जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर त्यांच्या विरोधात आरबीआयकडून कठोर कारवाई करण्यासह दंड सुद्धा लावला जाऊ शकतो. फाटलेल्या-जुन्या नोट्या बदलण्याच्या स्थितीत तुम्ही बँकेच्या विरोधात आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाईन पद्धतीने तक्रार करु शकता.(RBI Guidelines)
आरबीयने आपल्या नियमात असे म्हटले आहे की, फाटलेल्या-जुन्या नोटा आता बँकेद्वारे बदलता येऊ शकतात. त्यामुळे त्यासाठी नकार दिला जाऊ शकत नाही. जर तुमच्याकडे फाटलेल्या-जुन्या नोटांवर टेप लावली असेल आणि त्याचा वापर तुम्ही करु शकत नसाल तर आरबीआयने ते बदलून देण्यासाठी काही नियम बनवले आहेत. खरंतर फाटलेल्या-जुन्या काहीच कामाच्या नसतात. त्यांना कोणी घेत ही नाही. अशातच लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.
आरबीआयचे असे म्हणणे आहे की, अशा नोटा सुद्धा कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही बदलू शकता. तसेच कोणतीही बँक त्या बदलून देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. केंद्रीय बँकेच्या गाइडलाइन्सनुसार जर बँक असे करत असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते.
नोटा बदलण्यासंदर्भातील नियम
खराब झालेल्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता येऊ शकतात पण त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. नोट खराब असेल, तेवढी त्याची किंमत कमी होईल. जर व्यक्तीकडे २० पेक्षा अधिक नोटा असतील आणि त्याची एकूण किंमत ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्या देवाणघेवाण शुल्क म्हणून घेतल्या जातील. तसेच नोट एक्सेंज करतेवेळी त्यामध्ये सिक्युरिटी सिंबल जरुर पहा. अन्यथा तुमची नोट बदलून मिळणार नाही.(RBI Guidelines)
हे देखील वाचा- UPI च्या माध्यमातून चुकीच्या आयडीवर पैसे ट्रांन्सफर झाल्यास काय करावे? वाचा अधिक
बनावट नोटा बदलून देणार नाही बँका
बँक टेप लावलेले, थोडेसे फाटलेले, खराब झालेल्या आणि जळालेल्या नोटा बदलता येतात. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा की, बँक बनावट नोटा बदलू शकत नाही आणि जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. या व्यतिरिर्त बँक नोटा बदलण्यास मनाई करत असेल तर ऑनलाईन तक्रार करता येऊ शकते. तसेच बँक कर्चमाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारावर बँकेला १० हजारापर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.