आरबीआय अशा काही निवडक देशांच्या लिस्टमध्ये सहभागी झाली आहे ज्यांच्याकडे डिजिटल करेंसीचा वापर केला जातो. म्हणजेच आता भारतात आपला डिजिटल रुपया असणार आहे. डिजिटल रुपयाच्या पायलट प्रोजेक्टची सुरुवात झाली असून याचा वापर सध्या शासकीय सिक्युरिटीच्या देवाणघेवाणसाठी केला जात आहे. सध्या होलसेल सेगमेंट मध्येच डिजिटल रुपयात देवाणघेवाण होणार आहे. रिटेलर्ससाठी पायलट प्रोजेक्टची सुरुवात एका महिन्यात सुरु होणार आहे. होलसेल सेगमेंटमध्ये आता देशातील ९ बँकांची निवड करण्यात आली असून त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. (RBI Digital Currency)
डिजिटल करेंसीचा सर्वाधिक मोठा फायदा असा की, दुसऱ्या देशांमध्ये देवाणघेवाण करण्यासह एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रांजेक्शन करणे अगदी सोप्पे होणार आहे. हे काम अगदी वेगाने होणार आहे. डिजिटल करेंसीला समजून घेण्यासाठी डिजिटल ट्रांजेक्शन आणि डिजिटल रुपयामधील फरक समजून घेणे फार महत्वाचे आहे. डिजिटल ट्रांजेक्शन म्हणजे आपण एखाद्याला आपले रुपये-पैसे डिजिटलच्या माध्यमातून देतो. यालाच डिजिटल ट्रांजेक्शन असे म्हटले जाते.
डिजिटल करेंसीमध्ये तुमचे रुपया हा पूर्णपणे डिजिटल होणार. यामध्ये तुमचा रुपया डिजिटल नव्हे तर त्याला पाठवण्याची पद्धत ही डिजिटल असणार आहे. डिजिटल करेंसीमध्ये असे होणार नाही कारण तुम्ही डिजिटल ट्रांजेक्शन करताना एखाद्याला डिजिटल रुपयाच देणार. भारताचा डिजिटल रुपया कसा असणार याबद्दल अद्याप ठरवण्यात आलेले नाही. सध्या मोठ्या प्रमाणातील व्यवहारांसाठी डिजिटल रुपयांचा वापर केला जात असून त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या कामासाठी ९ बँकांची निवड करण्यात आली असून जे डिजिटल रुपयाच्या माध्यमातून एकमेकांना पैसे ट्रांसफर करतात किंवा त्याची देवाणघेवाण करतात.
डिजिटल रुपया म्हणजे काय?
नावावरुन कळते की, तुमच्या बँक नोटचेच डिजिटल स्वरुप असणार आहे. डिजिटल रुपयाच्या नावानेच सेंट्रल बँक डिजिटल करेंसी किंवा सीबीडीसी आहे. ही करेंसी नोटचा डिजिटल फॉर्म असून जी आरबीआयकडून जारी केली जाणार आहे. बँक नोट सुद्धा आरबीआयकडून जारी केल्या जातात. त्याचप्रमाणे नोटच्या बदल्यात आरबीआय डिजिटल रुपया जारी करणार आहे. जसे की आपण नोट देतो त्याचप्रमाणे डिजिटल रुपया सुद्धा देणार. मात्र देण्याचे माध्यम हे पूर्णपणे वेगळे असणार आहे. डिजिटल रुपये हे बँकेच्या नोटेप्रमाणे हातात नव्हे तर डिजिटल पद्धतीने दिले जाणार आहे. जसे मोबाईलवरुन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून. (RBI Digital Currency)
हे देखील वाचा- देशातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकच युनिफॉर्मबद्दलचा पीएम मोदींनी का मांडला विचार?
कसे होणार ट्रांजेक्शन
जसे आपण एखाद्या दुकानदाराला पेटीएम, गुगल पे आहे का असे विचारतो त्याच पद्धतीने आपण नोटच्या बदल्यात आपण आपल्या खात्यातून डिजिटल रुपया देऊ शकतो. आपण कोणासोबत ही नोटच्या बदल्यात डिजिटल रुपयाची देवाणघेवाण करु शकतो. डिजिटल रुपया आल्यानंतर बँक नोट बंद होणार नाही तर लोकांना देवाणघेवाणीसाठी एक अतिरिक्त साधन मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक अंतर असे असणार आहे की, आपण खात्यात रुपया जमा करतो किंवा रुपयाच्या बदल्यात डिजिटल ट्रांजेक्शनच्या माध्यमातून रक्कम जमा करतो. डिजिटल करेंसीच्या रुपात रुपयाच्या बदल्यात डिजिटल रुपयाच जमा होणार जो पूर्णपणे डिजिटल असणार आहे.