देशात आजही असा एक रेल्वेमार्ग आहे ज्यावर इंग्रजांचे शासन आहे. त्यासाठी ब्रिटेन मधील एक खासगी कंपनी सेंट्रल प्रोविंसेंस रेल्वेला आज ही करोडो रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते. याची देखभाल आणि संरक्षणाची जबाबदारी या ब्रिटिश कंपनीवर आहे. परंतु ही कंपनी रॉयल्टी घेतल्यानंतर ही या रेल्वेमार्गाची खास देखरेख करत नाहीयं. याच कारणास्तव तो रेल्वे मार्गाचा ट्रॅक अस्थावस्थ झाल्यासारखा दिसतो.(Private Railway Line)
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला. परंतु स्वातंत्र्यासह देशातील सर्व संपत्तीसह रेल्वे ही भारताची झाली. भारतीय रेल्वेचे १९५२ मध्ये राष्ट्रीयकरण सुद्धा झाले होते. परंतु देशात एक रेल्वे ट्रॅक असा आहे जो भारतीय सरकारच्या आधीन नसून एक ब्रिटिश कंपनीअंतर्गत आहे. या रेल्वे ट्रॅकसाठी आज ही ब्रिटेनच्या क्लिक निक्सन अॅन्ड कंपनीचे भारतीय युनिट सेंट्रल प्रोविंसेस रेल्वे कंपनीला प्रत्येक वर्षाला कोटी रुपयांची रॉयल्टीचे पेमेंट ही केले जाते.
शकुंतला रेल्वे ट्रॅकवर अचलपुर ते यवतमाळ दरम्यान, १७ स्थानक येतात. पाच डब्ब्यांची ही ट्रेन ७० वर्षांपासून वाफेच्या इंजिनवर चालवली जाते. त्यानंतर १९९४ मध्ये वाफेच्या इंजिनऐवजी डिझेल इंजिन वापरले जाऊ लागले. त्याचसोबत बोगींची संख्या ही वाढून ७ करण्यात आली आहे. शकुंतला एक्सप्रेस १९० किमीचा हा प्रवास ६ ते ७ तासांमध्ये होतो. दरम्यान, ही ट्रेन सध्या बंद आहे.
ट्रॅकवर आज ही इंग्रजांच्या काळापासून सिग्नल आणि दुसऱ्या हाताने चालवली जाणारी उपकरण दिसतात. या ट्रेनच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक लोक आपला प्रवास करतात. इंग्रजांनी शकुंतला रेल्वे ट्रॅकला अमरावतीच्या कपास ढोकर मुंबई स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी तयार करण्यात आला होता. सेंट्रल प्रोविंसेस रेल्वे कंपनीने १९०३ मध्ये कपासला यवतमाळ पासून मुंबई पर्यंत जाण्यासाठी शकुंतला रेल्वे ट्रॅक करण्याचे काम सुरु केले होते. (Private Railway Line)
हे देखील वाचा- लिथियमच्या साठा ठरणार भारतासाठी गेमचेंजर
शकुंतला रेल्वे ट्रॅकवर ७ डब्ब्यांची चालणारी जेडीएम सीरिजच्या डिझेल लोकांच्या इंजिनची गतिसीमा २० किमी प्रति तास ठेवण्यात आली होती. सेंट्रल रेल्वेच्या १५० कर्मचारी या रुटवर ट्रेन चालवण्यासाठी काम करत होते. शकुंतला एक्सप्रेसचे परिचालन बंद झाल्यानंकर स्थानिक लोक याचा पुन्हा वापर करण्यास सुरुवात करण्याची मागणी करत आहे. भारत सरकारने काही वेळेस तो खरेदी करण्याचा ही प्रयत्न करत आहे. मात्र याचा कोणताही फायदा होत नाही आहे.