प्रेग्नेंसी संबंधित अशा काही गोष्टी असतात ज्या बहुतांश कपल्सला माहिती नसतात. याच कारणास्तव त्यांना शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र जर तुम्ही प्रेग्नेंसीचा प्लॅन करत असाल तर त्या संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या, कारण या प्लॅनिंगवेळी तुम्हाला त्याचा आधार मिळत काही गोष्टी स्पष्ट होतील. अशातच तुम्ही प्रेग्नेंसीचा प्लॅन करत असाल तर गाइनोकॉलिजस्टला एकदा तरी जाऊन भेटा. तुमचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडा आणि ते काय सल्ला देतात ते पहा. मात्र तुम्ही नक्की कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हे आपण येथे जाणून घेऊयात. (Pregnancy Planning)
-प्रेग्नेंसी प्लॅन पूर्वी कोणती तपासणी केली जाते?
प्रेग्नेंसीचा प्लॅन करत असाल तर डॉक्टर काही महत्वाचे चेकअप करु शकतात. जसे की महिलेचे वजन. कारण प्रेग्नेंसीवेळी महिलेचे वजन हे अधिक नसावे. महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स १८.५ ते २२.९ दरम्यान असावे. या व्यतिरिक्त थायरॉइड, बीपी आणि ब्लड शुगर सारखी सुद्धा तपासणी केली जते. या व्यतिरिक्त सिफलिस, एचआयवी, हेपेटाइटिस बी सारख्या एसटीडी आजारांसाठी ही डॉक्टर तपास करतात.
-प्रेग्नेंट होण्यासाठी योग्य वय काय?
प्रेग्नेंसीसाठी महिलांचेच नव्हे तर पुरुषांचे वय ही यावेळी लक्षात घेतले जाते. कारण टेस्टोस्टेरोनचा स्तर ४० वर्षानंतर कमी होऊ लागतो. याचा अर्थ असा की, वयाच्या चाळीशीनंतर प्रेग्नेंसी प्लॅन करणे मुश्किल होऊ शकते. महिलांसाठी २०-३५ हा वयोगट प्रेग्नेंसासाठी योग्य मानले जाते. परंतु वयाच्या पस्तीशीनंतर प्रेग्नेंसीचा प्लॅन करणे जोखमिचे असू शकते.
-प्रेग्नेंसीसाठी शरिराला कसे तयार कराल?
हेल्दी डाएटचे सेवन करा. त्याचसोबत संतुलित आहार घ्या आणि अनहेल्दी कार्ब्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करु नका. आपल्या डाएटमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फाइबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, विटामिन सी सारख्या गोष्टींचा समावेश करा. शरिरासाठी व्यायाम हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे दररोज कमीत कमी ४० मिनिटे तरी व्यायाम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिडचे सेवन करा. दारु, धुम्रपान अशा गोष्टींपासून दूर रहा. तणावमुक्त रहा आणि भरपूर झोप घ्या.
-कंसीव करण्यास समस्या का येते?
प्रेग्नेंसी प्लॅन करण्यासाठी काही महिलांना समस्या येऊ शकते. त्यामागे काही कारणं असू शकता. ज्या महिलांना पीसीओएस असते त्यांना कंसीव करणे फार मुश्किल होते. एग काउंट कमी असल्याने ही कंसीवची समस्या उद्भवू शकते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल तरीही कंसीव होण्यास समस्या येते. कॅन्सरच्या उपचारादरम्यान ही कंसीव करण्यास समस्या येते. अनुवांशिक स्थितीमुळे ही समस्या उद्भवू शकते.(Pregnancy Planning)
हे देखील वाचा- महिलांमध्ये Egg Freezing चा ट्रेंन्ड का वाढतोय?
-प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काय कराल?
प्रेग्नेंसीची टेस्ट पॉझिटिव्ह येणे म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात. आजकालच्या महिला प्रेग्नेंसी किटच्या माध्यमातून याची चाचणी करतात. जर त्यामध्ये तुम्हाला साकारात्मक परिणाम दिसला तर डॉक्टरांची भेट घ्या. डॉक्टर प्रेग्नेंट आहात का हे पुन्हा तपासून पाहण्यासाठी अल्ट्रासाउंडचा वापर करतील. जर याचा सुद्धा परिणाम पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला अन्य काही महत्वाच्या चाचण्या करण्यास सांगितल्या जाऊ शकतात.