Home » ‘या’ कारणांमुळे गरोदरपणात हाता-पायाला येते सूज; जाणून घ्या सूज कमी करण्याचे घरगुती उपाय  

‘या’ कारणांमुळे गरोदरपणात हाता-पायाला येते सूज; जाणून घ्या सूज कमी करण्याचे घरगुती उपाय  

0 comment
Pregnancy Care
Share

गर्भावस्थेचा काळ हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खुप नाजुक आणि महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात महिला आपल्या पोटात एक जीव निर्माण करत असते त्यामुळे या काळात तिच्यात मानसिक बदलांसह अनेक शारीरिक बदल ही तिच्यात होत असतात. महिला गरोदर राहिल्यानंतर आणि बाळ जन्माला येईपर्यंत तिच्या ३ महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बदल होत असतात. अशा वेळी महिलेची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती जपणे खुप महत्वाचे असते. (Pregnancy Care)


गर्भावस्थेत महिलेला सतत लघवीला येणे, चक्कर येणे, उलटी होणे, पोट साफ न होणे, चिडचिड होणे आणि त्याबरोबर महत्वाच म्हणजे महिलेच्या हातपायला सूज येणे या सर्व सामान्य आणि अधिक त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत. डॉक्टरांच्या अनुसार महिलेमध्ये एडिमा म्हणजे हाता-पायाला सूज येण्याची सुरवात ही गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर होते. आणि जस जसे गरोदरपणाचे दिवस वाढत जातात तसतशी हाता-पायाला येणारी सूज ही वाढत जाते आणि काही महिलांच्या बाबतीत ही सूज बाळाला जन्म देईपर्यंतच्या काळापर्यंत राहते.

पायाला सूज येण्याची अनेक कारण असू शकतात, जसे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात हार्मोनल बदलामुळे हाता-पायला सूज येऊ शकते. त्याबरोबर १५ आठवड्यानंतर शरीरातील जास्त प्रमाणात रक्त आणि इतर द्रवपदार्थांमुळे शरीराला सूज येते. त्याबरोबर शरीरात तयार होणाऱ्या हार्मोनल द्रवपदार्थामुळेही पायाला सूज येऊ शकते. अशी अनेक कारण गर्भावस्थेचा महिलेच्या शरीराला सूज येण्यासाठी कारणीभूत असू शकतात. या काळात थोड्याफार प्रमाणात प्रत्येक महिलेला या अडचणीचा सामना करावा लागतो.

आता आपण जाणून घेऊयात घरच्याघरी गर्भावस्थेत असलेली महिला शरीरावर खास करुन हाता-पायला आलेल्या सुजेवर काय उपाय करू शकते, ज्यामुळे महिलेला आराम मिळेल.  

– आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, किचनमध्ये असणारी हळद किती गुणकारी मानली जाते. सूज कमी करण्यासाठी ही हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये हाडांच्या आत अँटी इंफ्लेमेटरी, अँटिबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे केवळ जळजळ दूर करण्यासाठी उपयुक्त नसतात तर हळदीची पेस्ट बनवून प्रभावित भागावर लावल्यास जळजळ आणि सूज लवकर कमी होते.

========

 हे ही वाचा: महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या

========

– गरम पाणी आणि मीठाचा वापर ही सूज कमी करण्यास मदत करतात.यासाठी महिलेच्या पायला सूज आली असेल तर अर्धा बादली कोमट पाण्यात एक चमचा काळे मीठ घालावे आणि मीठ पूर्णपणे वितळले की त्यात काही मिनिटे पाय सोडून बसावे. असे दिवसातून किमान दोनदा करण्याचा प्रयत्न करावा. याने पायाची सूज कमी होण्यास मदत होईल.तसेच पायांच्या स्नायूंनाही आराम मिळतो . 

– गर्भवस्थेत असलेल्या महिलेला तिच्या जेवणाची खुप काळजी घेणे गरजेचे असते.यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिठाचे सेवन.गरोदर महिलेने तिच्या जेवणात मिठाचा वापर अतिशय कमी प्रमाणात करावा कारण मिठाचे अधिक सेवन ही शरीराला सूज येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.   

(Disclaimer: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. कोणताही उपाय करण्याच्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.