आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की, खोट बोलू नये. असे करणे चुकीचे असते तरीही लोक सर्रास ही गोष्ट करतात.काही लोक विचापूर्वक खोटं बोलण्यासाठी काही कारणांचा आधार घेतात. मात्र तुम्ही कधी तुमच्या पार्टनरला किंवा मित्रांपरिवारात खोटं बोलताना पकडले आहे का? अशातच तुम्ही तुमच्या पार्टनरला सुद्धा उगाचच खोटं बोलताना पकडले असेल तर त्याच्याशी कसे वागावे याबद्दलच आम्ही सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अशा पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीशी म्हणजेच पॅथोलॉजिकल लायर (Pathological Liar) सोबत डील करत आहात.
खरंतर याला मायथोमेनिया आणि स्यूडोलोगिया फँटेसीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. पॅथोलॉजिकल लाइ, म्हणजेच खोटं बोलणे ही एक कम्पलसिव हॅबिट आहे. काही लोक कोणत्याही कारणासाठी खोटं बोलतात. याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा अँन्टीसोश पर्सनालिटी डिसऑर्डरचे परिणाम बोलू शकतो. जर तुम्ही एका खोट बोलणाऱ्या व्यक्तीशी डील करत आहात तर तुम्हाला हळू-हळू त्याच्या सवयीचा कंटाळा आणि राग ही येईल. त्यामुळे काही टीप्स वापरुन तुम्ही त्या पद्धतीने वागू शकता.
-आत्मचिंतन करा
सर्वात प्रथम स्वत:लाच विचारा की आपण ज्या नात्यात आहोत ते खरंच नाते दीर्घकाळ चालेल का? समोरचा व्यक्ती वारंवार खोट बोलतोय आणि आपल्याला ते कळतेय तरीही आपण त्याच्या सोबत का राहतोय याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.
-राग नियंत्रणात ठेवा
खरं आहे की, वारंवार खोटं बोलण्याने डोकं फिरतं किंवा राग येतो. मात्र त्यावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागाच्या भरात आपण काहीही बोलतो, करतो त्यावरुन वाद अधिक वाढतो पण तोडगा निघत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास शिका. तुम्ही एखादी गोष्ट विचारा त्याचे उत्तर खरं देण्यास सांगा तेव्हा समोरचा व्यक्ती त्याचे उत्तर हे खोटेच देईल असे वाटत राहिल.
-खोटं बोलण्याच्या सवयीमागील कारण जाणून घ्या
तुमचा पार्टनर तुमच्याशी वारंवार खोटं का बोलत आहे या मागील कारण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. काही वेळेस मानसिक त्रास किंवा अन्य काही कारणामुळे तो खोट ही बोलत असेल. पण जेव्हा तो मी नाही तर तुच खोटं बोलतेय असे बोलत असेल तर समजून जा त्याची ही सवय कधीच जाणार नाही.(Pathological Liar)
-आरोप लावू नका
खोटं बोलत असाल तर दुसऱ्यावर आरोप लावू नका. कारण तुम्हाला माहिती असते की, आपण खोटं बोलतोय पण तरीही खोटं बोलणे हे त्या परिस्थितीवर तोगडा काढणे नव्हे.
हे देखील वाचा- आपल्या मृत्यूसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करतात ‘या’ देशातील लोक
-प्रोत्साहन देऊ नका
समोरचा व्यक्ती कोणत्या स्तरापर्यंत खोटं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारा आणि खोटं बोलण्यास त्यांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका. त्यांची ही सवय सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुम्ही त्यांची सवय बदलण्यास सांगा आणि तो पर्यंत बोलणार नाही असे ही स्पष्ट करा.