मुलांचे मन अत्यंत नाजूक असते. ते एखाद्या गोष्टीवरुन लगेच आनंदित ही होतात तर कधी दु: खी. अशातच पालकांमध्ये दररोज भांडण होत असतील आणि तुम्हाला वाटत असेल याबद्दल मुलाला काही कळत नसेल तर असा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. मुलं ही निरागस असतात आणि त्यांना सर्वकाही कळतं असते. घरात लहान-मोठे वाद होत राहतात. स्थिती अशावेळी कंट्रोल करणे मुश्किल होते जेव्हा मुलांसमोर पालक एकमेकांशी भांडू लागतात. सुरुवातीला मुलांवर भले याचा परिणाम होणार नाही. पण घरातील वातावरण बिघडले जाईल ऐवढे नक्की. याचाच परिणाम मुलांच्या मानसिकतेवर ही होतो. अशातच पुढील काही लक्षणे जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. (Parenting Tips)
-असुरक्षित वाटणे
मुलांसमोर लहान वाद होणे सामान्य आहे. परंतु जर त्याला हिंसक वळण लागले तर मुलं स्वत:ला घरात असुरक्षित मानू लागतात. अशातच त्यांना असे वाटते की, घर असून ही तेथे थांबू नये. पालकांना एकमेकांशी भांडताना ते सहन करून शकत नाहीत.त्यांच्या भावनांवर आणि मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो.
-आत्मविश्वास कमी होणे
मुलांमध्ये लहानपणापासूनच आत्मविश्वास नेहमी वाढलेला असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु पालकांच्या सततच्या भांडणामुळे त्यांचा आत्मविश्वास लहानपणातच ढासळला जातो. अशातच ते भविष्यात एखाद्या स्थितीत ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत.
-लक्ष केंद्रित न होणे
मुलांमध्ये पालकांच्या भांडणामुळे एकाग्रतेची कमतरता निर्माण होते. ते शांत ठिकाणी बसून सुद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशातच पालकांनी आपल्या मुलांमध्ये अशी काही लक्षणे दिसली तर वेळीच त्याकडे लक्ष द्यावे. कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
-आई-वडिलांना गमावण्याची भीती
पालक एकमेकांना सोडून जाणे किंवा घरातून निघून जाण्याबद्दल बोलतात तेव्हा याचा मुलांवर फार मोठा परिणाम होतो. त्यांना नेमके कळत नाही नक्की चुक कोणाची आहे. याच भीतीने ते तुम्हाला गमावून बसतील म्हणून काहीही रिअॅक्ट करत नाही. या व्यतिरिक्त मुलांना सुद्धा सतत भांडणाची सवय ही लागू शकते. त्यामुळे पालकांनी या गोष्टीबद्दल सतर्क राहिले पाहिजे. (Parenting Tips)
-वारंवार खोटं बोलणे
जर मुलं लहानपणापासून पालकांशी खोट बोलत असेल तर यामागे काही कारणे असू शकतात. काही वेळेस मुलं पालकांमुळे खोटं बोलतात. जेणेकरुन त्यांच्या भांडणापासून आपण सुरक्षित रहावे असे त्यांना वाटते. जर तुम्ही मुलांच्या खोटं बोलण्याच्या सवयीला कंटाळले असाल तर वेळीच मुलांना शिस्त लावण्याची गरज आहे.
हेही वाचा- रागावर ताबा मिळवण्यासाठी ‘या’ टीप्स करा फॉलो