एकेकाळी जगावर राज्य करणा-या ब्रिटनची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे. ब्रिटनमधील पोलीस यंत्रणा आणि कायदा व्यवस्था ही अतिशय कमकुवत झाली असून त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्थलांतरितांनी घेतला आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचे मोठे प्रमाण असून या पाकिस्तानी तरुणांनी ब्रिटनमध्ये ग्रूमिंग गॅंग तयार केली आहे. ही ग्रूमिंग गॅंग ब्रिटनमधील मुलींना टारगेट करते. वय वर्ष 10 ते 20 दरम्यानच्या या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून या गॅंगचे सदस्य त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. या ग्रूमिंग गॅंगच्या जाळ्यात आत्तापर्यंत 1400 हून अधिक मुली आल्या असून त्या सर्व अल्पवयीन आहेत. धक्कादायक म्हणजे, या सर्व प्रकरणाची माहिती ब्रिटनमधील सरकारला आहे, मात्र दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हायला नको, म्हणून ब्रिटनमधील पोलीसांनी या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर एका 11 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्यावरही आरोपींना शिक्षा झालेली नाही. (Pakistan)
या सर्व प्रकरणामुळे ब्रिटनमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ग्रूमिंग गॅंग स्कॅंडलने अनेक अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्धवस्त केले असतांना ब्रिटनमधील पाकिस्तानी युवक गो-या महिलांचा वापर करा. अशा स्वरुपाचे अश्लिल मेसेज जाहीरपणे देत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटीश नागरिकांनी स्टरमर सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे. नुकतेच ब्रिटनच्या संसदेतही स्थलांतरिकांकडून ब्रिटीश महिलांवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी जाहीर करण्यात आली. या सर्वांत ब्रिटनमधील सरकार काय भूमिका घेणार असा सवाल विचारण्यात येत आहे. एक्सचे सीईओ एलॉन मस्क, हॅरी पॉटर लेखिका जेके रोलिंग आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रज यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी या बाल लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिटन सरकारला जाब विचारत कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रोफेसर ॲलेक्सिस जे यांच्या अहवालात रॉदरहॅममध्ये 1,400 हून अधिक मुलांवर अत्याचार झाल्याची माहिती पुढे आली आणि ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली. (International News)
ब्रिटनमध्ये ग्रूमिंग गॅंग नावाची पाकिस्तानी तरुणांची गॅंग असून ही गॅंग ब्रिटीश तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैगिंक शोषण करते. यात लहान मुलींच्या शोषणाचा आकडा भयावह आहे. ही ग्रूमिंग गॅंग ब्रिटनमधील तरुणींचे आयुष्य नष्ट करत असतांना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. ब्रिटन सरकार या गॅंगला संरक्षण का देत आहे, असा प्रश्न येथील सर्वसामान्य विचारत आहेत. याला आता ब्रिटनमधील मान्यवरांनीही साथ द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी या बाबत एक्सवर सविस्तर पोस्ट टाकून थेट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांना जाब विचारला आहे. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये ग्रूमिंग गॅंगनी शोषण केलेल्या मुलींची आकडेवारी जाहीर केल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. या गॅंगमध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्यांचा समावेश आहे. याच गॅंगनं 11 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचेही आता उघड झाले आहे. (Pakistan)
या गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही, केवळ जातीय तेढ न भडकवण्याच्या नावाखाली अशा गुन्ह्यांकडे डोळेझाक करणारे अधिकारीही शिक्षेसाठी पात्र असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. तसेच या घटनांमधील गुन्हागारांना कायद्याचे संरक्षण मिळाल्यानं भविष्यात अशाच स्वरुपाच्या घटना उघडपणे झाल्यास नवल वाटायला नको, असेही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या पोस्टनंतर हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग आणि लिझ ट्रज यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती पुढे आल्या असून ब्रिटनमधील ढासळत्या सुरक्षा यंत्रणेवर त्यांनी टिका केली आहे. जेव्हा या लैंगिक अत्याच्याराच्या घटना पुढे आल्या तेव्हा आत्ताचे पंतप्रधान स्टारमर हे क्राउन प्रोसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) चे प्रमुख होते. अल्पवयीन मुलींवर अन्याय होत असताना गुन्हेगारांना संरक्षण मिळत होते. सीपीएसचे प्रमुख स्टारमरच याला जबाबदार आहेत, असा आरोपही आता करण्यात येत आहे. ब्रिटनमधील रॉदरहॅम, यॉर्कशायर या शहरात मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. (International News)
========
हे देखील वाचा : Crime Story : नरभक्षक राजा कोलंदर लोकांना मारून मेंदुच बनवायचा सूप
TAX : स्तनांपासून दाढीपर्यंत जगात लागू केलेले विचित्र TAX!
======
या सर्व घटना ग्रूमिंग गॅंगच्याच माध्यमातून होत असल्याची ओरड आता ब्रिटनमधील समाजमाध्यामांवर होत आहे. याशिवाय ही टोळी मुलींना अमिष दाखवून मानवी तस्करीही करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणात तपास करणारे अधिकारी वर्णद्वेषाच्या आरोपांच्या भीतीने गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवाय पिडितांना आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही दबाव टाकण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि यातून उद्धवस्त झालेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी स्टारमर सरकार बदलावे अशी मागणीही ब्रिटनमध्ये जोर पकडू लागली आहे. शिवाय ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचे नियम बदलावे आणि जे स्थलांतरित या देशात रहात आहेत, त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवावे अशी मागणीही करण्यात येत आहे. (Pakistan)
सई बने