कंगाल झालेल्या पाकिस्तानातील पहिली महिला आंतराळवीर आता स्वखर्चाने आंतराळात जाणार आहे. नामिरा सलीम असे महिले नाव असून ती आपल्या खर्चाने अमेरिकेतील प्रायव्हेट स्पेस एजेंसी वर्जिनि गॅलेक्टिकसह आंतराळात जाणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, या मिशनमध्ये नामिरा सलीम व्यतिरिक्त पाकिस्तान अथवा त्यांच्या स्पेस एजेंसीचे कोणतेही योगदान नसणार आहे. (Pakistani Astronaut)
नामिरा सलीमने सोशल मीडियात ही माहिती शेअर केली आहे. नामिरा वर्जिन गॅलेस्टिकच्या ज्या स्पेस फ्लाइटने आंतराळात जाणार आहे. ते ५ ऑक्टोंबरला लॉन्च होऊ शकते. यामध्ये नामिरा व्यक्तिरिक्त दोन आंतराळवीर सुद्धा असतील. त्यामध्ये युएसमधील रॉन रोसाने आणि युके मधील ट्रेवर बीट्टी यांचा समावेश आहे. हे अरबपति रिचर्ड ब्रॅनसनची कंपनी वर्जिन गॅलेक्टिकची पाचवी आणि एकूण नववे उड्डाण असणार आहे.
कोण आहे नामिरा सलीम
नामिरा सलीचा जन्म पाकिस्तानातील कराचीत झाला होता. तिने आपले शिक्षण कोलंबिया आणि हॉफस्ट्रा युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे. तिचा संपूर्ण परिवार फ्रांन्समध्ये राहतो. नामिरा सलीम पाकिस्तानातील अधिकृत आंतराळवीर आहे. २००६ मध्ये पाकिस्तान सरकारने तिला हा पुरस्कार दिला होता. २००७ मध्ये नामिराने पाकिस्तान टुरिज्मसाठी ब्रँन्ड अॅम्बेसेडरची भुमिका साकारली होती. नामिरा सलीमच्या वेबसाइटनुसार २००७ मध्ये तिने अमेरिकेतील नास्टर सेंटरमध्ये सब ऑर्बिटल स्पेस फ्लाइटचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.
नामिरा वर्जिन गॅलेक्टिकसची संस्थापक आंतराळवीर आहे. नामिरा त्या १०० आंतराळवीरांपैकी एक आहे जिने गॅलेक्टिकच्या स्थापनेवेळीच तिकिट बुक केले होते. यासाठी निमिराने २-२.५ लाख डॉलरचे पेमेंट केले होते. नामिरा दुबईतील स्पेस ट्रस्टची संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहे.
नामिरा सलीम पहिली अशी पाकिस्तानी आहे जी नॉर्थ पोल आणि साउथ पोलवर पोहचली आहे. तिने नॉर्थ पोलाचा प्रवास एप्रिल २००७ मध्ये केला होता. तर साउथ पोलवर जानेवारी २००८ मध्ये पोहचली होती. खास गोष्ट अशी की, नामिरा पाकिस्तानच नव्हे तर एशियातील अशी पहिली स्कायडाव्हर आहे जिने २००८ मध्ये माउंट एवरेस्टच्या वर स्कायडाइव्ह केले आहे. (Pakistani Astronaut)
आंतराळ यात्रा सर्वसामान्यपणे स्पेस क्राफ्ट हे रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केले जातात. मात्र वर्जिन गॅलेक्टिकसाठी एअरक्राफ्टचा वापर केला जातो. १५ हजार फूट उंचीवर जाऊन स्पेसक्राफ्ट वेगळे होते आणि आंतराळात ९० हजार किमी पर्यंतचा प्रवास करतो. त्यानंतर परत येतो आणि प्लेन प्रमाणे एअर स्ट्रिप किंवा रनवेवर उतरते.
हेही वाचा- 300 रुपयांची नोकरी ते Jet Airways च्या मालकाचा प्रवास- नरेश गोयल