ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना ऑनलाईन वेबसाइट्सवर पेड रेटिंग्स पासून दिलासा मिळणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टंडर्ड्सने रिवॉर्ड्स देत घेण्यात आलेल्या रेटिंग्सला इंडिपेंडेंट रेटिंगपासून वेगळे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावानुसार, बीआयएसचे असे म्हणणे आहे की, या वेबसाइट्स एखाद्या प्रोडक्ट्सची एकूणच रेटिंग्समध्ये वापरण्यात आलेल्या त्या रिव्यूला सहभागी करणार नाहीत जे रिवॉर्ड्स देऊन मिळवले आहेत. (Paid Ratings)
रेटिंग्ससाठी आता वेगळी जागा दिली जाणार आहे. यावर एक खास मार्क सुद्धा लावला जाईल जेणेकरुन स्पष्टपणे कळेल की पेड रेटिंग्स आहेत. या प्रस्तावाला जर मान्यता मिळाली तर युजर्सला खुप दिलासा मिळणार आहे. कारण कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी बहुतांश युजर्स हे रिव्यू वाचतात. बीआयएसने नागरिकांच्या हितासाठीच या संबंधित १० नोव्हेंबर पर्यंत त्यांचे काय मतं आहे ते मागितले आहे.
रिवॉर्ड्स म्हणजे काय?
या प्रस्तावामध्ये रिवॉर्ड्ससंदर्भात सविस्तरपणे सांगण्यत आले आहे. त्यानुसार एखादी कंपनी एका नव्या प्रोडक्टला प्रोत्साहन देण्यासाठी काही लोकांना एका मर्यादित काळापर्यंत ते प्रोडक्ट फ्री मध्ये वापर करण्यास देते आणि त्याच्या बदल्यात रिव्यू घेतात. यालाच रिवॉर्ड असे म्हणतात. हा रिवॉर्ड कॅश, प्रोडक्ट किंवा एखादे बक्षीस सुद्धा असू शकते. प्रस्तावात यासाठी सुद्धा एक नियम तयार करण्यात आला आहे. बीआयएसने या व्यतिरिक्त आणखी एक प्रणाली तयार केली असून ज्यामुळे कळते की, कोणत्याही रिवॉर्ड शिवाय केलेला रिव्यू हा एखाद्या व्यक्तीने केला आहे. याबद्दल रिव्यूअर्सची रँडम सॅम्पलिंगच्या माध्यमातून तपासले जाणार आहे. जर जे बनावट असतील तर त्याची पुढे तपासणी केली जाईल. (Paid Ratings)
हे देखील वाचा- Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करत असाल तर व्हा सावध, अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने होतेय नागरिकांची फसवणूक
कशा पद्धतीने केली जाणार पडताळणी?
रिव्यूअर्सला एक ईमेल पाठवला जाईल. त्यामध्ये त्याची सत्यता खरी असल्याचे दाखवण्यास सांगितले जाईळ. वेबसाइटच्या सुरक्षिततेच्या एका प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांच्या डिटेल्सबद्दल कळणार आहे. एसएमएस, फोन कॉल्स, जियोलोकेशन आणि आयपी अॅड्रेस, सिंगल युज ईमेल किंवा कॅप्चा सिस्टिमच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, दिवाळी किंवा एखाद्या सणानिमित्त ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर धमाकेदार ऑफर्स दिल्या जातात. मात्र त्यावेळी सुद्धा युजर्स हे किंमत कमी असली तरीही रिव्यू पाहूनच एखादे प्रोडक्ट खरेदी करतात. या व्यतिरिक्त सेलच्या दरम्यान, नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार ही वाढले जातात. त्यामुळे एखादे प्रोडक्ट खरेदी करताना त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते खरेदी करु नका. तसेच बँकेसंदर्भात ही कोणतीही माहिती शेअर करु नये. यामुळे तुमचीच फसवणूक होईल.