कर्नाटक सरकारचा एक निर्णय ओला-उबर सारख्या कॅब अॅग्रीगेटर्स संबंधित ऑटोरिक्षा चालकांच्या गळ्याचा फास बनला आहे. सरकारने २५ सप्टेंबरला क्षेत्रीय परिवहन प्राधिकरणांना अॅप आधारित ऑटो अॅग्रीगेटर्सला प्रत्येक राइडसाठी ५ टक्के सुविधा शुल्क आणि जीएसटी वसूल करण्याचा आदेश दिला होता. अशातच रिक्षा चालकांचे असे म्हणणे आहे की, यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांचे नुकसान होऊ शकते. ओला-उबर ड्रायव्हर्स अॅन्ड ओनर्स असोसिएशन यांनी सरकारवर हायकोर्टाच्या समोर हे प्रकरण योग्य पद्धतीने न ठेवल्याचा आरोप लावला आहे.(Ola-Uber)
रिक्षा चालकांचे असे म्हणणे आहे की, निर्धारित भाडे अधिक नाही. पण अनुमान लावणे मुश्किल आहे की, या कंपन्या लोकांकडून सुविधा शुल्क वसूल करतील. त्यांचे असे म्हणणे आहे की, ओला-उबर कंपन्या अधिकच पैसे घेतात, ज्यामुळे सरकारला हस्तक्षेप करावा लागत आहे. आम्हाला माहिती नाही नव्या आदेशाचे कसे पालन करावे.

सरकारवर आरोप
मनीकंट्रोलच्या एका रिपोर्ट्सनुसार, युजीओएचे प्रमख तनवीर पाशा यांनी कर्नाटक हायकोर्टाच्या समोर प्रकरण योग्य पद्धतीने ने ठेवल्याने कर्नाटक सरकारला दोषी ठरवले आहे. तनवीर यांनी असे म्हटले की, सरकारने कर्नाटक ऑन डिमांड ट्रांसपोर्टेशन टेक्नॉलॉजी अॅग्रीगेटर्स रुल्समध्ये संशोधन केले पाहिजे होते, कारण यामध्ये रिक्षेसाठी कोणतीही सुट नाही आहे. पाशा यांनी असे ही म्हटले की, परिवहन विभागाने जर हायकोर्टाला योग्य माहिती दिली असती तर कोर्टाने सरकारच्या नियमांमध्ये संशोधन करण्याचे निर्देशन दिले असते. परिवहन विभागाने बंगळुरुतील शहरी जिल्ह्यातील क्षेत्रीय परिवहन प्राधिकरणाला सुद्धा सोबत घेतले नाही.(Ola-Uber)
हे देखील वाचा- जामा मस्जिदमध्ये महिलांना बंदी, सोशल मीडियात तरुणींकडून टीकेची झोड
३० रुपये आहे कमीत कमी भाडे
कर्नाटक सरकारने रिक्षाचे भाडे ठरवले आहे. त्यानुसार कमीत कमी तीस रुपये भाडे आणि त्यावर प्रति किमी १५ रुपये भाडे घेऊ शकतो.एक रिक्षाचालक थिम्मप्पा यांनी असे म्हटले की, हे निर्धारित भाडे अधिक वाटत नाही. पण हा अंदाज लावणे मुश्किल आहे की, या कंपन्या लोकांकडून कसा शुल्क घेतील. तर अन्य एका रिक्षाचालकाने म्हटले आता वेळच सांगेल की प्रत्येक प्रवासासाठी दर कसा असेल.त्याचसोबत लोकांकडून किती शुल्क घेतला जाईल. ओला कॅब्सचे पब्लिकेशन रिलेशन डिपार्टमेंच्या एका मेंबर्सने जेव्हा या विषयावर संपर्क केला तेव्हा त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला.