पेंन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकर (PFRDA) द्वारे संचालित नॅशनल पेंन्शन सिस्टिम (NPS) हा स्वैच्छिक सेवानिवृत्ती प्लॅन आहे. यामध्ये खातेधारकाला बाजारावर आधारित रिटर्न्स मिळतात आणि निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी एक फंड जमा होतो. या अंतर्गत रिटायरमेंट बेनिफिट्स व्यतिरिकक्त खातेधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास नॉमिनीला डेथ बेनिफिट्स मिळतात. यामध्ये एनपीएस ग्राहकाच्या मृत्यूनंतर १०० टक्के एनपीएस कॉपर्सचे पेमेंट नॉमिनी किंवा कायदेशीर असलेल्या उत्तराधिकाऱ्याला केले जाते. (Nps Corpus Withdrawal)
एनपीएस ग्राहकाच्या नॉमिनि किंवा उत्तराधिकाऱ्याला पेंन्शन मिळण्यासाठी एक एन्युटी सुद्धा खरेदी करु शकतात. दरम्यान, जर एनपीएस खातेधारक जीवंत आहे तर त्याने एन्युटी घेणे आवश्यक आहे. जर सब्सक्राइबरने eNPS पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यास तर त्याच्या मृत्यूनंतर विड्रॉल फॉर्म एनपीएस ट्रस्टकडे जमा केला जातो. पुन्हा एकदा एनपीएस ट्रस्ट कागदपत्रांचे वेरिफिकेशन करुन त्याला मान्यता देत पुढील कार्यवाही करते.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
नॉमिनी किंवा उत्ताराधिकाऱ्याला मृत्यू प्रमाण पत्र, कायदेशीर उत्तराधिकारी प्रमाणपत्र, केवायसी कागदपत्र आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागते. ही सर्व कागदपत्र डेथ विड्रॉल फॉर्मसह लावण्यात येतात. या फॉर्ममध्ये महत्वाच्या कागदपत्रांची माहिती असते. हा फॉर्म प्रोटियन सीआरएची वेबसाइट www.npscra.nsdl.co.in वरुन अगदी सहज डाउनलोड करु शकता येते.
कुठे जमा कराल?
नॉमिनी किंवा उत्तराधिकाऱ्याला पॉइंट ऑफ प्रेजेंस (POP) जवळ कागदपत्र जमा करावी लागतात. कागदपत्र मिळाल्यानंतर पीओपी फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रांचे वेरिफिकेशन होते. त्यानंतर शिल्लक अर्जाला प्रोटियन सीआरएवर पुढे पाठवला जातो. त्यानंतर जी रक्कम आहे ती दावेदार व्यक्तीच्या खात्यात पाठवली जाते. जर त्यांनी एन्युटीची निवड केली असेल तर त्याची माहिती त्यांच्या द्वारे निवडण्यात आलेल्या एन्युटी सर्विस प्रोवाइडर सोबत ही शेयर केली जाते. (Nps Corpus Withdrawal)
हे देखील वाचा- आता प्राण्यांना सुद्धा मिळणार ओळखपत्र…
तर नुकत्याच एनपीएस मधून पैसे काढण्याच्या नियमांत ही बदल करण्यात आली आहे. त्यानुसार नॅशनल पेंशन सिस्टिम सब्सक्राइबर्सला मेच्युरिटीपूर्वी किंवा तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काही रक्कम काढण्याची परवानगी दिली जते. दरम्यान, ही रक्कम एकूण जमा रक्कमेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसली पाहिजे. एनपीएस मधून मॅच्युरिटीपूर्वी काही रक्कम मुलांच्या शिक्षण, मुलांचे लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम, गंभीर आजारासाठी काढता येऊ शकते. त्याचसोबत एनपीएससी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला टेन्योर दरम्यान केवळ तीन वेळाच थोडी रक्कम काढता येते.