Home » भारतात नाही तर ‘या’ देशात आहेत २४० मंदिरे

भारतात नाही तर ‘या’ देशात आहेत २४० मंदिरे

by Team Gajawaja
0 comment
240 temples
Share

भारतानंतर सर्वात जास्त मंदिरे (240 temples) कुठे आढळत असतील तर ती इंडोनेशिया या देशात आहेत.  इंडोनेशियामध्ये एकेकाळी हिंदू संस्कृती होती.  मात्र परकीय आक्रमणामुळे येथील हिंदू धर्मियांची संख्या कमी झाली.  परिणामी त्यांनी उभारलेली भव्य मंदिरे ओसाड झाली.  तसेच इंडोनेशियामध्य़े आलेल्या प्रलयकारी भूकंपातही या मंदिरांची हानी झाली.  काळाच्या ओघात ही मंदिरे लुप्त झाल्यासारखी होती.  मात्र त्यांचा शोध लागल्यावर इंडोनेशियन सरकाराने त्यांचा पुर्नविकास करायला सुरुवात केली आहे. यात सर्वात लक्षवेधी आहे तो, जावा येथील 240 मंदिरांचा(240 temples)  समूह.  यामधील प्रंबनन शिव मंदिर हे अतिप्राचीन असून, त्याच्याबाबत शिवभक्तांमध्ये जेवढी आस्था आहे, तेवढीच आस्था मंदिराच्या स्थापत्यशास्त्राविषयाबाबत अभ्यासूंना आहे.  हजारो वर्षापूर्वी आलेल्या नैसर्गिक वादळांमुळे आणि परकीय आक्रमकांच्या हल्ल्यामुळे ही मंदिरे काळाच्या ओघात लपली होती.  आता या मंदिरांचा जिर्णोद्धार चालू आहे.  गेली अनेक वर्ष जावामधील ही मंदिरे सरकारतर्फे नव्यानं उभारण्याचा प्रयत्न चालू आहे.  या मंदिरांना बघण्यासाठी जावामध्ये हजारो पर्टकट भेट देत आहेत.  

प्रंबनन शिव मंदिर हे इंडोनेशियातील जावा शहराजवळील योग्याकार्टा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल आणि अतीप्राचीन असे मंदिर आहे. या मंदिराला स्थानिक भाषेत रोरो जोंगग्रांग मंदिर म्हटले जाते. याशिवाय स्थानिकांमध्ये भगवान शंकराच्या या मंदिराला प्रंबनन टेंपल इंडोनेशिया असेही म्हटले जाते. हे मंदिर म्हणजे, प्राचिन काळी उभारलेला मंदिरांचा भव्य समुहच आहे.  यात जवळपास 240 मंदिरे (240 temples) होती.  हजारो वर्षापूर्वी 240 मंदिरे (240 temples) आणि त्यात भगवान शंकराचे भव्य मंदिर, उभारतांना स्थानिक राजांनी स्थापत्यकलेला मोठं महत्व दिलं होतं.  हजारो वर्षापूर्वीच्या या मंदिरांना बघण्यासाठी आता पर्यटक मोठ्या संख्येनं जावा येथे जात आहेत.  सद्यपरिस्थितीत या मंदिर समुहातील लहान मंदिरे काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमकांच्या हल्यात नष्ट झाली आहेत. 

मात्र या समुहातील तीन मोठ्या मंदिरांची दुरुस्ती करण्यात येत आहे. येथील सर्व मंदिरे ही विशिष्ट क्रमांनी बांधण्यात आली आहेत.  त्यात भगवान शंकराचे मंदिर हे सर्वात मोठे होते.  म्हणूनच या मंदिराला शिवगृह असेही म्हणण्यात येते.  भगवान शंकराच्या मंदिरापाठोपाठ भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवाची मंदिरांचा क्रम आहे.  यातील प्रत्येक देवाच्या मंदिरासमोर त्यांच्या वाहनाचेही स्वतंत्र मंदिर आहे.  भगवान शिवासमोर नंदी,  भगवान विष्णूसमोर गरुड राज आणि भगवान ब्रह्मासमोर हंसाचे मंदिर आहे.  बहुधा भगवान शंकराच्या समोर नंदीची फक्त मुर्ती असते.  मात्र या मंदिरांमध्ये नंदी आणि गरुड, हंस यांचीही स्वतंत्र मंदिरे आहेत.  त्यावरुन तत्कालीन कालात या तिघांचेही महत्त्व देवासारखेच होते, हे प्रतित होते.  या मंदिरांच्या दिशांनाही महत्त्व देण्यात आले आहे.  ही तिनही मंदिरे सूर्यास्ताच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडे आहेत.  

जावा येथील हा मंदिरांचा विशाल समुह हा, आशिया खंडातील दुसरा सर्वाधिक मंदिर समूह असल्याची माहिती आहे.  यातील भगवान शंकराचे मंदिर तर इंडोनेशियातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते.  या मंदिराची उंची 154 फूट आहे.  9व्या शतकात महाराजा पिकतन यांनी या भव्य मंदिरांची निर्मिती केली.  राजा पिकतन हे भगवान शंकराचे भक्त होते.  इंडोनेशियामध्ये वेगवेगळ्या धर्मिंयांनी राज्य केले.  9 व्या शतकात येथे हिंदू धर्मिय राजाची सत्ता आली.  महाराचा संयजचा वंशज असलेल्या राजा पिकतन याच्या सत्तेच्या काळात या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. राजा पिकतन यानं हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशानं ही विशाल मंदिरे उभारली. या मंदिरांच्या उभारणीला इसवी सन 850 मध्ये सुरूवात झाली.  स्वतः राजा पिकतन या कामकाजावर लक्ष ठेवत असे, अशी माहिती आहे.  राजाच्या पाठपुराव्यामुळेच हा  मंदिरांचा विशाल समूह अवघ्या सहा वर्षात तयार झाला.  राजा पिकतन यांच्यानंतर त्याच्याच वंशातील राजा लोकपाल आणि बालितुंग महासंभू यांनी या मंदिर समुहाच्या उभारणीत आपले योगदान दिले.  

हा मंदिराचा समुह तयार होत असताना या भागातून ओपाक नावाची नदी वाहत होती. मात्र मंदिराला आणखी जागा हवी होती, म्हणून या नदीचा प्रवाहच अन्य ठिकाणाहून वळवण्यात आला. हेच कारण या मंदिर समुहाच्या नाशास कारणीभूत ठरले असे सांगण्यात येते. काही वर्षानंतर झालेल्या मुसळधार पावसानं नदी मुळ नदीपात्रापर्यंत पसरली.  या नदीच्या पुरानं मंदिरांना आपल्या पाण्याखाली घेतल्याचे सांगण्यात येते. या पुरामुळे त्रस्त झाल्यामुळे दहाव्या शतकात इसियाना राजघराण्याने आपली राजधानी मध्य जावा येथून पूर्व जावामध्ये हलवली.  या भागात ज्वालामुखीचे प्रमाणही वाढले. परिणामी मंदिरे काळाच्या ओघात जंगलात लुप्त झाली.  या भुमिवरही अफगाण आणि मुघलांनी हल्ले केले.  त्या हल्ल्यात या मंदिरांनाही लुटण्यात आले.  मंदिरातील किंमती वस्तु आक्रमकांनी लूटून नेल्या.  मुर्तींची नासधूस केली.  त्यामुळेही या मंदिरांमध्ये भाविकांची संख्या कमी झाली आणि संपन्न मंदिरे ओसाड बनली. (240 temples)

===========

हे देखील वाचा : मंदिर एक, रहस्य अनेक

===========

1918 मध्ये डच राज्यकर्त्यांनी ही मंदिरे शोधून काढली.  त्यातील शिवमंदिराची त्यांनी पुर्नबांधणी सुरु केली.  1953 मध्ये, शिव मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले.  यानंतर, 1978 ते 1993 दरम्यान, विष्णू आणि ब्रह्मा मंदिरांचाही जिर्णोद्धार करण्यात आला. सद्यपरिस्थितीतही या मंदिरांचा विकास करण्यात येत आहे.  जावा येथे मोठ्या संख्येनं पर्यटक दरवर्षी भेट देतात.  त्यांच्या सोयीसाठी या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. 

सई बने 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.