अमेरिकेत गर्भपाताचा संविधानिक अधिकार संपुष्टात आणल्यानंतर आता घटस्फोटावरुन वाद सुरु झाला आहे. अमेरिकेत नो-फॉल्ट डिवोर्सची (No Fault Divorce ) सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याला महिलांच्या अधिकारांशी जोडले जात आहे. अमेरिकेत याची काही प्रकरणे समोर आल्यानंतर याची अधिकच चर्चा होऊ लागली आहे. अमेरिकेतील एका गटाचे असे मानणे आहे की, घटस्फोटासंबंधित या कायद्यात बदल केला पाहिजे. काही दक्षिणपंथ्यांनी नो-फॉल्ट डिवोर्सवरुन प्रश्न उपस्थितीत केले आहेत. दुसऱ्या गटाने असे म्हटले आहे की, महिलांच्या अधिकार यामुळे सुरक्षित राहत आहेत. अशातच नो फॉल्ट-डिवोर्स म्हणजे नक्की काय याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
कॉर्नल लॉ स्कूलच्या वेबसाइटनुसार, हा एक घटस्फोटाचा प्रकार आहे. सर्वसामान्यपणे घटस्फोटावेळी एखाद्या व्यक्तीमुळे लग्न मोडण्यासाठी जबाबदार ठरवले जाते. यामागे काही कारणांचा उल्लेख ही केला जातो. जसे की, मारहाण, लैंगिक शोषण. पण नो-फॉल्ट डिवोर्स मध्ये असे होत नाही. तसेच यामध्ये तुम्ही यासाठी जबाबदार नाहीत हे खरं करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज ही भासत नाही.
नो-फॉल्ट डिवोर्सवेळी कपल्सला केवळ हेच सांगावे लागते की, आम्ही वेगळे होत आहोत. अमेरिकेत अशा प्रकारच्या घटस्फोटाला मान्यता मिळालेली आहे. २०१० मध्ये अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये तो लागू करण्यात आला होता.
यामध्ये किती झाला बदल?
या कायद्याच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की, हा घटस्फोट महिलांना एक ऑप्शन देतो. जेव्हापासून हा कायदा तयार केलाय तेव्हापासून घरगुती हिंसाचारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या आकडेवारीत घट झाली आहे. या फिल्डमध्ये सर्च करणाऱ्या संशोधकांनी असे म्हटल आहे की, याचे कारण असे नव्हे की आता पुरुषांनी महिलांचा छळ केल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल. तर अशा लोकांना ते अगदी सहज सोडू शकतात. स्पष्ट बोलायचे झाल्यास तर या घटस्फोटाच्या कारणास्तव महिलांच्या अधिकारात वाढ झाली आहे. तसेच त्या स्वत:ला अधिक सुरक्षित मानत आहेत. घरगुती हिंसाचारासारख्या घटना कमी झाल्या आहेत.
हे देखील वाचा- पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?
का होतोय विरोध?
अमेरिकेतील दक्षिणपंथींयांच्या एका समूहाचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या घटस्फोटामुळे लग्नाचे महत्व कमी होईल. तर दुसरा गट असे म्हणतोय की, लग्न करणे आणि नंतर नो-फॉल्ट डिवोर्स घेण्याचा प्रकार हा महिलांनी मनमानी करण्याचे माध्यम होईल. या गटाचे असे मानणे आहे की, या घटस्फोटाच्या माध्यमातून महिला जेव्हा पाहिजे तेव्हा घटस्फोट घेऊ शकतात. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळेल. परंतु काही महिला याचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळेच या कायद्यात बदल केला पाहिजे.(No Fault Divorce )