Home » नऊवारी साडीचा असा आहे इतिहास

नऊवारी साडीचा असा आहे इतिहास

by Team Gajawaja
0 comment
nauvari saree
Share

इतिहासाची पाने राणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई सारख्या पराक्रमी विरांगणांच्या शौर्य गाथांनी भरलेली आहेत. परंतु यांच्यामध्ये एक सामान्य गोष्ट अशी दिसते की, त्यांची वेशभूषा म्हणजेच नऊवारी साडी. नऊवारी साडी नेसून युद्धाच्या मैदानात फ्री मुवमेंटसाठी मोकळीक होती. ही साडी महाराष्ट्राची शान आहेच. पण त्याला शक्ती, साहस आणि समानतेच्या प्रतीकाच्या रुपात पाहिले जाते. याला अखंड वस्र असे ही म्हटले जाते. कारण याच्यासोबत अन्य वस्र परिधान करण्याची भासत नाही. जुन्या काळात नऊवारी साडी ट्राउजरसाठी नेसली जायची. मात्र काळानुसार त्यात बदल होताना दिसून आला. नऊवारीला काष्टी साडी, सकाच्चा आणि लुगडीच्या नावाने ही ओळखले जाते. (Nauvari saree)

असा आहे इतिहास
महाराष्ट्राची ओळख बनललेल्या नऊवारी साडीचा इतिहास फार जुना आहे. सुरुवातीच्या काळात ही साडी धोती प्रमाणे नेसली जायची. तसेच ती पुरुष आणि महिला सुद्धा नेसायच्या. राजा-महाराजांच्या काळात युद्धाच्या मैदानात जायचे असेल किंवा शस्र कला शिकायची असेल तेव्हा महिलांनी आरामदायी कपडे घालण्याची गरज होती. पुरुषांच्या धोतीवरुन प्रेरणा घेत नऊवारी साडी नेसण्याची सुरुवात झाली.

याची खासियत होती की, ती नेसून सहजपणे अस्र-शस्रचा वापर केला जात होता. तर युद्धाच्या वेळी ही आपली युद्ध कौशल्य याच्या माध्यमातून दाखवले जात होती. साडीचे हे एकमेव रुप आहे, ज्याला मिलिट्री युनिफॉर्म मानले जाते. हिंदी सिनेमांमध्ये नऊवारी साडी नेसल्याचे दिसून आले.

इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास नऊवारी साडी ही कॉटनची बनवली जायची. मात्र काळानुसार ती फ्रॅबिकमध्ये ती तयार केली जाऊ लागली. कॉटनसह विविध प्रकारच्या सिल्कपासून ती तयार केली जाऊ लागली. सुती नऊवारी ही दैनंदिन कामे करताना फार उपयोगी यायची. तर पूजा-पाठ आणि अन्य विशेष कार्यक्रमांवेळी सिल्क पासून तयार करण्यात आलेली नऊवारी साडी नेसली जाते. यामध्ये लहान-लहान बुट्टी आणि सोनेरी रंगाच्या जरीची विशेष बॉर्डर केलेली दिसते. (Nauvari Saree)

नेसण्याची पद्धत वेगवेगळी
नऊवारी साडी नेसण्याच्या पाच सर्वाधिक लोकप्रिय पद्धती आहेत. त्यामध्ये ब्राम्हणी स्टाइल, पारंपरिक मराठी साडी, पेशवाई साडी, कोळी आणि शेतकऱ्यांची साडी आणि कंटेम्प्ररी मराठी साडी. पण मूळ स्टाइल ही काष्टी. यामध्ये साडीची बॉर्डर मागच्या बाजूला खोचली जाते. काष्टी साडी ही खरंतर कॉटनची बनवण्यात आलेली असते.

हे देखील वाचा- महिलांनी नारळ फोडणे अशुभ मानले जाते?

नऊवारी साडीचा जागतिक रेकॉर्ड
नऊवारी साडी नेसून सर्वाधिक वेगाने धावण्याचा जागतिक रेकॉर्ड मुंबईतील क्रांती साळवी यांच्या नावावर आहे. त्यांनी जर्मनीतील बर्लिन मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि फास्टेस रन इन अ साडीचा जागतिक रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये दाखल केला. त्यांच्याआधी ६१ वर्षीय लता कारे यांनी बारामती मधील मॅराथॉन मध्ये तीन किमी नऊवारी साडी नेसत धावल्या आणि जिंकल्या. यामुळे बहुतांश महिलांना प्रेरणा मिळाली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.