Home » NATO म्हणजे काय?

NATO म्हणजे काय?

by Team Gajawaja
0 comment
NATO
Share

भारताला नॅटोसोबत जोडले जाण्यासाठी ऑफर मिळत आहे. अमेरिकन राजदूत ज्युलियन स्मिथ यांनी असे म्हटले आहे की, भारतासाठी नॅटोचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. अशातच नॅटो म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते याच बद्दल जाणून घेऊयात.(NATO)

जगातील सर्वाधिक मोठी सैन्य संघटना नॅटो
नाटो जगातील सर्वाधिक मोठे सैन्य गठबंधन संघटना आहे. नाटोची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर ४ एप्रिल १९४९ मध्ये करण्यात आली होती. महायुद्धात जगातील बहुतांश देशांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले. अशातच सर्व देश चिंतेत होते की, अशी घटना पुन्हा कधीच होऊ नये. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी युद्ध संपवल्यानंतर नाटोची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये बहुतांश देशांनी आपल्या सैन्य बलाचा समावेश केला.

नॅटोचा पूर्ण अर्थ
नॅटो त्यावेळी अधिकच चर्चेत आला, जेव्हा रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धाबद्दलच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. नॅटो संघटनेअंतर्गत एक देश दुसऱ्या देशासाठी आपले सैन्य पाठवते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग दिले जाते. मुख्य रुपात नॅटोचा उद्देश हा जगात शांती कायम ठेवणे असा आहे. नॅटोचा पूर्ण अर्थ North Atlantic Treaty Organization असा आहे. याला अटलांटिक अलायन्स नावाने सुद्धा ओखळले जाते.

हल्ला झाल्यानंतर एकमेकांची मदत करणे
वर्ष १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्ध समाप्त होण्यसह अमेरिका आणि सोवियत संघ एक महाशक्तीच्या आधारावर वरती आला. यामुळे युरोपाला धोका बसणार अशी शक्यता अधिक वाढली. या समस्येला गांभीर्याने घेत फ्रांस, ब्रिटेन, नेदरलँन्ड, बेल्जियम सारख्या देशांनी करार केला. त्याअंतर्गत जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर दुसरा देश त्या देशासाछी आपले सैन्य पाठवून त्यांची मदत करेल. त्याचसोबत त्याला आर्थिक आणि सामाजिक रुपात मदत ही करेल.(NATO)

हे देखील वाचा- पुतिन यांनी जेव्हा केजीबीला अंतानंतर पुन्हा स्थापित केले…पुस्तकातून हनी ट्रॅप संबंधित मोठे खुलासे

NATO मध्ये सहभागी असलेले देश
अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या चार्टरच्या कलम १५ अंतर्गत उत्तर अटलांटिक करार प्रस्ताव सादर केला. यावर जगातील १२ विविध देशांनी स्वाक्षरी केली. करारत अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटेन, नेदरलँन्ड, नॉर्वे, पोर्तुगाल, बेल्जियम, आइसलँन्ड, लक्जमबर्ग, फ्रांन्स, कॅनडा आणि इटली सारख्या देशांचा समावेश होता. त्यानंतर शीत युद्धापूर्वी स्पेन, पश्चिम जर्मनी, तुर्की आणि युनान यांनी याचे सदस्यत्व घेतले. शीत युद्ध संपल्यानंतर हंगेरी, पोलंड आणि चेक या प्रजासत्ताक राज्यांनी सुद्धा नाटोत एन्ट्री केली. या व्यतिरिक्त २००४ मध्ये ७ आणखी देशांनी याचे सदस्यत्व घेतले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.