Home » छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार !

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार !

by Team Gajawaja
0 comment
Narendra Modi Visit Poland
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड या देशाच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधान मोदी पोलंडचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा या भेटीचा उद्देश आहे. पोलंड हा मध्य आणि पूर्व युरोपमधील भारताचा सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार आहे. पंतप्रधान मोदींचे पोलंडची राजधानी वॉर्सा या शहरात जंगी स्वागत झाले. त्यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक उपस्थित होते. त्यातही महाराष्ट्रातून पोलंडमध्ये गेलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. पंतप्रधान मोदी या नागरिकांना संबोधन करतांना मराठीतून सुरुवात केली. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्म आचरणाला सर्वाधिक महत्त्व असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगताच सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणा देण्यात आला. (Narendra Modi Visit Poland)

छत्रपतींच्या नावाचा महिमा आजही पोलंडमध्ये गायला जातो, त्यामागे आहे, दुस-या महायुद्धातील एक प्रसंग. दुस-या महायुद्धात पोलंडची परिस्थिती बिकट झाली होती. शत्रू राष्ट्र आपल्यावर आक्रमण करुन सर्वाचाच बळी घेईल, या भीतीनं पोलंडच्या नागरिकांनी महिला आणि मुलांना बोटींच्या माध्यमातून अन्य देशात पाठवले. मात्र या महिलांना कुठल्याही देशानं सहारा दिला नाही. पण भारतातील राजांनी या महिला आणि मुलांना आपल्या राज्यात सामावून घेतले. फक्त सामावून घेतलेच नाही तर त्यांना आवश्यक अशा सोयी सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. या राजांमध्ये जामनगरच्या राजांसोबत कोल्हापूरच्या भोसले राजघराण्याचाही समावेश आहे. त्यामुळेच पोलंडमध्ये आजही या दोन राजांची देवाप्रमाणे पुजा केली जाते. त्यांचे भव्य स्मारक पोलंडमध्ये आहे. पंतप्रधान मोदी पोलंडच्या दौ-यावर असतांना त्यांनी प्रथम या राजांच्या स्मारकाला भेट देत त्यांना अभिवादन केले.
दुस-या महायुद्धात संकटात सापडलेल्या पोलंडसाठी भारतानं मदतीचा हात दिला होता. (Narendra Modi Visit Poland)

पोलंडमधील महिला आणि मुलांना जामनगरमध्ये जसा सहारा मिळाला, तसाच आधार महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्येही मिळाला. आजही पोलंडमध्ये महाराष्ट्रातील युवकांची संख्या अधिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा इथे रोज जयजयकार होतो. पंतप्रधान मोदी यांनाही त्याचा प्रत्यय आला. वॉर्सा येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तीन स्मारकांवर जाऊन आदरांजली वाहिली. त्यात नवानगर येथील जाम साहेबांचे स्मारक, गुड महाराजा स्क्वेअर याचा समावेश होता. तसेच मॉन्टे कॅसिनो मेमोरिअल आणि कोल्हापूर मेमोरियललाही त्यांनी भेट दिली. गुजरातमधील नवानगर आणि आत्ताचे जामनगर येथील महाराज जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांनी पोलंडच्या १००० अनाथ मुलांना वडिलांप्रमाणे वाढवले ​​होते. त्यांच्या उदारपणाच्या अनेक कथा पोलंडमध्ये सांगितल्या जातात. त्यासोबत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या कथाही आदरानं पोलंडमध्ये सांगितल्या जातात. त्याच स्मृतीत वॉर्सा येथे कोल्हापूर मेमोरिअल आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापुरातील वळीवडे नावाच्या लहान गावात पोलिश निर्वासितांसाठी आश्रयस्थान झाले होते. १९४२ ते १९४८ दरम्यान सोव्हिएत दडपशाहीतून पळून आलेल्या सुमारे ६००० पोलिश नागरिकांना भारतानं सहारा दिला होता. (Narendra Modi Visit Poland)

=========

हे देखील वाचा : हमासचा म्होरक्या मारला गेला !

=========

त्यापैकी १००० पोलीश नागरिक जामनगरमध्ये तर बाकीचे सर्व पोलीश नागरिक कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या आश्रयाला आले होते. या नागरिकांसाठी वालीवडे येथे पोलिश निर्वासित वस्ती विकसित करण्यात आली. वलिवडे गावात तेव्हा पोलीश नागरिकांसाठी एक चर्च, एक कम्युनिटी सेंटर, अनेक शाळा, एक महाविद्यालय, एक पोस्ट ऑफिस, एक थिएटर आदी सोयी तयार करण्यात आल्या होत्या. या नागरिकांमध्ये अनेक वृद्धांचाही समावेश होता. यापैकी अनेकांचा मृत्यू कोल्हापूरात झाला. त्यांचे दफनही वालिवडे गावात केले. पोलिश निर्वासितांनी हे ठिकाण सोडल्यानंतरही विविध स्मारकांच्या माध्यमातून त्याचे जतन करण्यात आले. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं दिलेला हा आसरा आजही पोलंडमधील पिढी लक्षात ठेऊन आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांना देवाची उपमा दिली जाते. भारतातील नागरिक जेव्हा नोकरी-व्यवसायासाठी पोलंडमध्ये जातात, तेव्हा त्यांना या देशातील नागरिक आपलेच भाऊबंद म्हणून सामावून घेतात. छ्त्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथे मोठ्या उत्सहात साजरी होते. पंतप्रधान मोदी पोलंडमध्ये दौ-यावर असतांना त्यांनीही पोलंडमधील स्मारकांना भेट देऊन महारांजांना नमन केले. (Narendra Modi Visit Poland)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.