झारखंड मधील जमशेदपूर शहरात असेएक मस्जिद उभारले जात आहे जे केवळ महिलांना समर्पित असणार आहे. त्याची देखरेख सुद्धा महिलाच करणार आहेत. मात्र या मस्जिदमध्ये पुरुषांच्या प्रवेशावर बंदी असणार आहे. मस्जिदचे पूर्ण बांधकाम डिसेंबर पर्यंत पू्र्ण होण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर त्याचा विरोध केला जात आहे. काही लोक याला इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत. तर काही लोक आणखी काही तर्क देत यासाठी विरोध करतायत. (Namaz rules for women)
याच वादाच्या स्थितीत आपण समजून घेऊयात नक्की याचा विरोध कोणत्या आधारावर केला जातोय आणि इस्लाम धर्मात महिलांना मस्जिदीत नमाज पठणाचा अधिकार आहे की नाही?
नमाज पठणावर बंदी नाही
मुस्लिम महिलांच्या हितासाठी काम करणारी शहनाज असे म्हणते की, इस्लाम धर्मात महिलांना नमाज पठणासाठी संपूर्ण जगभरात बंदी नाही. मस्जिदीत सु्द्धा महिलांना नमाज पठणाचे स्वातंत्र्य आहे. कुठेतरी कोणते इमाम साहेब आपल्या जाहीलियतचे प्रदर्शन करत भले महिलांवर बंदी घालतात. मात्र इस्लाम धर्मात कोणत्याही प्रकारची बंदी नाही. यासाठी काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. त्यानुसार नमाम पठणासाठी सर्वात पुढील रांगेतील सर्व इमाम उभे राहतील. त्यांच्या मागे ती लोक जी पहिल्यांदा येऊन वाट पाहत होती. त्यांच्या मागे वयस्कर आणि नंतर तरुण, नंतर मुलं आणि अखेरीस महिला. मुस्लिम महिलांच्या अधिकारांसाठी काम करणारी शहनाज असे म्हणते की, यामागील उद्देश हा सुरक्षिततेचा आहे. महिला सर्वात मागे नमाज अदा करणार तर स्वाभाविकच आहे की त्या पहिल्या मस्जिद मधून बाहेर पडतील.
तर इंडोनेशिया, मलेशिया सारख्या देशात तर आधुनिक व्यवस्था आहे. येथील महिलांना आपल्या कामाच्या ठिकाहून मस्जिदीत येतात. वजू केल्यानंतर मस्जिदमध्ये नमाज पठणासाठीचे उपलब्ध असलेले वस्र घालून नमाद अदा करतात. त्यानंतर आपल्या मूळ वस्र घालून निघून जातात. या देशांमध्ये तरुण-तरुणींनी बुरखा घातलाच पाहिजे अशी काही अट नाही. त्यांना हवे ते कपडे घालू शकतात. (Namaz rules for women)
2003-2004 च्या दरम्यान लखनौ मधील गोलगंज मस्जिदीत त्यांच्यामुळेच महिलांना एक वेगळी जागा दिली गेली आणि त्यानंतर अनेक मस्जिदीत महिलांना नमाज अदा करण्याची परवानगी मिळाली. त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जाते.असे देश-विदेशात होतेच. महिलांसाठी एक वेगळा मजला किंवा एक वेगळी जागा दिली जाते तेथे त्या नमान अदा करु शकतात.
तर जमशेदपूर मध्ये बांधकाम सुरु असलेल्या मस्जिदीवर शहनाज असे म्हणते की, यामध्ये काहीही समस्या नसावी की, महिलांसाठी मस्जिद का बांधली जातेय. खरंतर समस्या यामुळे निर्माण होतेय की, तेथे पुरुषांना परवानगी नाही. ती म्हणते इस्लाम हा कुरआनच्या नियमानुसार चालतो. कुरआनमध्ये महिलांना अधिकार आहे की, मुफ्ती (न्यायाधीश), काजीची भुमिका अदा करणे. पण इमाम त्या इमाम होऊ शकत नाहीत. (Namaz rules for women)
हेही वाचा- महाराणा कुंभाचे नीलकंठ महादेव मंदिर
मुफ्तीकडे लोक तेव्हाच जातात जेव्हा इस्लाम धर्मातील नियम समजून घेण्यास समस्या येत असेल. काजीकडे लोक तेव्हा जातात जेव्हा शरीयत संदर्भातील एखादे प्रकरण असेल. ही दोन्ही काम महिला अत्यंत व्यवस्थितीत करु शकतात. मात्र इमाम त्या होऊ शकत नाही. ती अशी म्हणते की, कुरआनमध्ये पुरुषांना महिलांपेक्षा उच्च स्थान दिले गेले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. इमामसाठी तेव्हा समस्या येते जेव्हा महिला आपल्या पीरियड्समध्ये असतात. तेव्हा त्या मस्जिदीत प्रवेश करु शकत नाहीत. महिला निकाहाचे पठण सुद्धा करु शकत नाहीत. कुरआनमध्ये यावर सुद्धा बंदी घालण्यात आल्याचे लिहिले आहे.