Home » आपल्या भावाचे शिर कापल्यानंतर खुप रडला होता औरंगजेब

आपल्या भावाचे शिर कापल्यानंतर खुप रडला होता औरंगजेब

by Team Gajawaja
0 comment
Mughal History
Share

मुघलांच्या शासन काळात आपल्याच नातेवाईकांची हत्या करणे ही सर्वसामान्य बाब होती. अकबरच्या शासनकाळापासून सुरु झालेल्या या कष्टकरी परंपरेचा प्रत्येक मुघल शासकाला सामना करावा लागला होता. मुघल बादशाह शाहजहां याला सुद्धा यातना सहन कराव्या लागल्या होत्या. खरंतर आयुष्याच्या अखेरच्या ८ दिवसापर्यंत तो आपल्याच मुलाच्या कैदेत होता. (Mughal History)

पण जेव्हा शाहजहा आजारी पडला तेव्हा त्याचा उत्ताराधिकारी म्हणून दाराशिकोहलाा निवडले. जी त्याची फार मोठी चुक होती. खरंतर दाराशिकोह हुशार होता. पण गादीवर बसल्यानंतर आपले दावे मजबूत करण्यासठी त्याने अशा काही चुका केल्या त्याचा उलट परिणाम झाला. याची हत्या त्याच्याच लहान भाऊ औरंगजेब याने केली होती. परंतु असे केल्यानंतर औरंगजेब खुप रडला होता.

ही गोष्ट १९५६ रोजीची असेल, मुघल बादशाह शाहजहा जेव्हा आजारी पडला आणि असे वाटू लागले की तो पुन्हा बरा होणार नाही तेव्हा त्याने दाराशिकोह याला उत्तराधिकारी घोषित केले. दाराला असे वाटले की, त्याच्या भावाला याबद्दल कळल्यास तो फार तांडव करेल. त्यामुळेच त्याने आगरा ते गुजरात, दक्षिण आणि बंगाल येथे जाणारे सर्व रस्ते बंद केले. जेणेकरुन आगऱ्यामधील ही गोष्ट बाहेर जाऊ नये. त्यावेळी मुराद गुजरात मध्ये शाह शुजा बंगाल मध्ये आणि औरंगजेब हा दक्षिणमध्ये होता. जेव्हा जेव्हा शाहजहानने खिडकीत उभे राहून दर्शन दिले नाही तेव्हा त्याच्या मृत्यूची अफवा पसरली जी राजपुत्रांपर्यंत पोहोचली.

गुजरातमध्ये राजकुमार मुराद आणि बंगालमध्ये शाह शुजाने स्वत:ला स्वातंत्रित घोषित केले आणि आपल्या नावाची नाणी जारी केली. मात्र औरंगजेहब हा फार चालाख होता. त्याने अशीच एखादी घोषणा करत आगराच्या येथे कुच केले आणि नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर सैन्याला रोखून ठेवले. दुसऱ्या बाजूला गुजरात येथून मुरदने आगऱ्याकडे जाण्यासाठी कुच केली होती. रस्त्याच त्याची औरंगजेबाशी भेट झाली. तसेच शाह शुजा सुद्धा आगऱ्याकडे येण्यास निघाला होता. दारा शिकोहाचा पुत्र सुलेमान शिकोह त्याला रोखण्यासाठी पोहचला आणि शुजाचा पराभव झाल्याने तो बंगालमध्ये परतला.(Mughal History)

Mughal History
Mughal History

इकडे मुराद आणि औरंगजेब बहीण रोशनाराकडून आग्र्याबद्दलची सर्व माहिती मिळवत राहिले. शुजाच्या पराभवाची बातमी ऐकून दोघेही आग्र्याकडे कूच केले. दाराशिकोह स्वतः पुढे न येता महाराजा जसवंतसिंग राठौर आणि कासिम खान यांना लढाईसाठी पाठवले. औरंगजेबाने उज्जैनजवळ दोघांचाही पराभव केला आणि नंतर तो आग्र्याकडे निघाला. दाराशिकोहची ही दुसरी चूक होती, युद्धातील विजयामुळे औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढली आणि त्याला युद्धसाहित्यही मिळाले, ज्यामुळे त्याचे स्थान आणखी मजबूत झाले.

औरंगजेब आणि मुराद आग्र्याला पोहोचल्यावर दाराशिकोह युद्धासाठी सज्ज झाला. तोपर्यंत शहाजहान बरा झाला होता, त्याने रणांगणावर जाण्याचे बोलले, पण दाराशिकोहने त्याला जाऊ दिले नाही. ही त्याची तिसरी चूक होती. दाराशिकोह युद्धभूमीवर पोहोचला. 29 मे 1658 रोजी दाराने दोन्ही भावांशी जोरदार लढा दिला, तो जिंकणारच होता, तेव्हा एक चेंडू त्याच्या हाताला लागला.

आतापर्यंत दाराशिकोह हत्तीवर स्वार होता, हाताला दुखापत झाल्यावर तो हत्तीवरून खाली उतरला आणि घोड्यावर स्वार झाला. ही त्याची चौथी आणि शेवटची चूक होती. जेव्हा सैनिकांनी त्याला हत्तीवर पाहिले नाही, तेव्हा त्यांचे मनोवेग विचलित झाले. सैनिक पळून गेले आणि दाराचा पराभव झाला. 8 जून 1658 रोजी त्याने आग्रा किल्ला ताब्यात घेतला आणि शाहजहानला कैदी बनवले. यानंतर दारा इकडे तिकडे धावत राहिला. ऑगस्ट १६५९ मध्ये त्याला औरंगजेबाने पकडले.(Mughal History)

हेही वाचा- आतापर्यंत या कलाकारांनी साकारल्या आहेत हनुमानाच्या भूमिका!

दाराशिकोह तुरुंगातच राहिला. दरम्यान, औरंगजेबाच्या गुलामाने तुरुंगात त्याचा शिरच्छेद केला. दाराशिकोहचे छिन्नविछिन्न शीर पाहून औरंगजेबाला रडू कोसळले, असे म्हणतात. मात्र, आपण कमकुवत असल्याचा संदेश सुलतानात जाऊ दिला नाही. त्याने शिरच्छेद करणाऱ्या गुलामाला बक्षीस दिले. नंतर त्याचे डोकेही कापण्यात आले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.