Monsoon travel tips- जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये कामाला थोडा आराम देऊन लोक आपल्या मित्रपरिवारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. बहुतांश वेळा आपल्याजवळच असलेल्या ठिकाणी जाऊन पावसाळ्याचा आनंद लुटण्याचा विचार करत पिकनिकचे डेस्टिनेशन ठरवतात. मात्र दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यात राहणारी लोक तर या महिन्यांमध्ये पहाटांवर जाणे अधिक पसंद करतात. कारण तेथून त्यांना हिल्स स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. पण जून आणि जुलै महिन्यात ऐवढा दमदार पाऊस असतो की, लोकांना हवामान खात्याकडून कधीकधी ऑरेंज आणि रेड अलर्ट ही दिला जातो. अशातच तुम्ही काही हिल्स स्टेशनला भेट देण्यापूर्वी पावसाची स्थिती पहा.
मान्सूमध्ये तुम्ही पहाडांवर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी कधीकधी भूस्खलनाचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा पहाडांच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर पुढील काही ठिकाणांना भेट देणे जून आणि जूलै महिन्यात टाळा.
-कलिम्पोंग
कलिम्पोंग पश्चिम बंगाल मधील सर्वाधिक सुंदर हिल्स स्टेशन आहे. जुलै महिन्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. पावसाळ्यातील येथील नजारा हा नयनरम्य जरी असला तरीही बागडोगरा येथून कलिम्पोंगला जातेवेळी अशी काही ठिकाण येताता जेथे भूस्खलन होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी जुलै महिन्यात जाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. भूस्खलन झाल्यास तुम्हाला काही तास तेथेच थांबून रहावे लागेल. या ठिकाणी भेट देण्यासाठी डिसेंबर महिना हा उत्तम आहे. यादरम्यान गर्दी ही कमी असते आणि वातावरण ही थंड असते.
-आसाम
जुलै महिन्यात अत्याधिक पाऊस पडतो त्यामुळे आसाम मध्ये प्रत्येक वर्षी पुरस्थिती निर्माण होते. पाऊस आणि पुराची स्थिती निर्माण होण्याच्या भीतीमुळेच पर्यटकांना आसाम मध्ये येण्यास बंदी घातली जाते. येथे फिरायला जायचा उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट. या दरम्यान आसाममध्ये पाऊस थांबतो आणि त्याचसोबत तुम्हाला काजीरंगा नॅशनल पार्कची सफर ही करायला मिळते.
हे देखील वाचा- अमेरिकेच्या ‘या’ शहरात अनेकदा पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या विचित्र कारण
-हिमाचल प्रदेश
पहाडांच्या ठिकाणी मान्सूमध्ये भूस्खलन होतेच. तरीही लोक मान्सूनमध्ये अशा ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करतात. पहाडांच्या ठिकाणी जर भूस्खलन झाल्यास तुम्हाला कोणाच्या ही मदतशिवाय तेथेच थांबून रहावे लागेल. त्यामुळेच मान्सूमध्ये खासकरुन जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशात जाणे टाळा.
-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क
येथे जुलै ते ऑगस्ट दरम्यान खुप पाऊस पडतो. त्यामुळे सफारी आणि रिवर राफ्टिंग सारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद तुम्हाला घेता येत नाही. दरम्यान ज्या लोकांना या अॅक्टिव्हिटी करायचा नसतील पण मान्सूमध्ये हॉटेलच्या खिडकीतून सुंदर नजारा पहायचा असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता.(Monsoon travel tips)
-ऋषिकेश
दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या राज्यातील लोकांची पहिली पसंद ही ऋषिकेश आहे. कारण हे ठिकाण अत्यंत त्या लोकांना जवळ आहेच. पण मान्सूनमध्ये या ठिकाणी जाण्याची चूक करु नका. ऋषिकेश मध्ये बहुतांश लोक ही वॉटर स्पोर्ट्साठी येणे पसंद करतात. पण मान्सूनमध्ये या अॅक्टिव्हिटी पूर्णपणे बंद केल्या जाता. कारण पावसाळ्यात येथे गंगा नदीच्या पाण्याची पातळी अधिक वाढली जाते.
-रणथंबोर
जुलै महिन्यापर्यंत रणथंबोर येथे मान्सून दाखल होतो. त्यामुळे जुलै महिन्यात रणथंबोर नॅशनल पार्क बंद केले जाते. या दरम्यान, भुस्खलन ही होते. रणथंबोर येथे जाण्याचा उत्तम काळ हा डिसेंबर ते जानेवारी आहे. या वेळी तुम्ही रणथंबोर नॅशनल पार्कला भेट देऊ शकता.