Home » राज ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी !

राज ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी !

by Team Gajawaja
0 comment
Raj Thackeray vs Amol Mitkari
Share

अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यातील पुरावरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर मिटकरींनी राज ठाकरेंना “सुपारीबाज” म्हटलं होतं, यामुळे हा वाद सुरू झाला. तोडफोडीनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांना छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि काही वेळानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पुर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.  (Raj Thackeray vs Amol Mitkari)

लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक एकटं लढण्याचं जाहीर केलं. आणि त्याचं वेळी राज ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाण साधत एक वक्तव्य केलं, “लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशाला पाहिजेत?” नंतर पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला, पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा अजित पवारांच्या जुन्या विधानाला घेऊन अजित पवार यांच्यावर टीका केली. “अजित पवार पुण्यात नसताना धरणं भरलं कसं”,असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर पलटवार करत अमोल मिटकरी म्हणाले “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही””.

राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हणं मनसे कार्यकर्त्यांना सहन झाली नाही, त्यामुळेच मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी आकोल्यातील शासकीय विश्राम गृहाच्या बाहेर असलेल्या अमोल मिटकारींच्या गाडीची तोडफोड केली. या तोडफोडी नंतर अमोल मिटकरींनी पोलिस स्थानक काठलं आणि तिथे मनसे कार्यकर्त्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं, जोपर्यंत गुन्हा दाखल होतं नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहीलं अशी भूमिका मिटकरींनी घेतली. पोलिसांनी तात्काळ सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. गाडीची तोडफोड करणाऱ्या राड्यामध्ये सहभागी असलेला तरुण मनसे पदाधिकारी जय मालोकार यांना त्या घटनेनंतर अस्वस्थ वाटू लागलं. तोडफोडीनंतर सुद्धा त्यांच्या छातीत दुखत होतं, त्याला तात्काळ हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. थोड्या वेळानंतर त्याच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी जाहीर केलं. (Raj Thackeray vs Amol Mitkari)

=================

हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंचं सिम्पथी कार्ड कि पवारांचं बेरजेचं राजकारण

================

तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही अटक केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जय मालोकार याच्या मृत्यूवरून ही अमोल मिटकरीं यांनी राज ठाकरेंवर निशाण साधला. कष्टाळू माय बापचं लेकरू गेलं माझी त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे त्यांनी मुंबई सोडून इथं यावं, सर्व सामन्य कार्यकर्त्याचा जीव जाईपर्यंत तुमचं राजकारण असेलं तर हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे अशी टीका त्यांनी केली. (Raj Thackeray vs Amol Mitkari)

शिवाय माझ्यावर झालेल्या भेकडं हल्ल्याचे मुख्य मास्टरमाइंड राज ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी केला आहे. या आधी सुद्धा राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती, आणि अमोल मिटकरींनी ही राज ठाकरेंवर टीका केल्या आहेत. पण आताच हे टीकासत्र जरा जास्त चिघळलयं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.