हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन,दिल के खुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है… हा शेर गालिब (Mirza Ghalib) यांचा आहे. त्यांचे मूळ नाव मिर्जा असदुल्लाह बेग खान असे होते. गालिब यांनी आपल्या शेरो-शायरीत प्रेमाचे सौंदर्य वेळोवेळी खुलवले. जर त्यांनी म्हटले प्रेमाची सुरुवातच गालिब यांच्यापासून होते तर ते काही चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या शेरो-शायरीत जीवंत एकाखा प्रेमवीर मिळतो. गालिब यांचा जन्म २२५ वर्षांपूर्वी आगरा मधील कलमा मंदिरातील एका संपन्न घरात झाला होता. २७ डिसेंबर १७९७ मध्ये जन्मलेल्या गालिब यांचे वडील उज्बेकिस्तान येथून भारतात आले. उर्दू, पर्शियन आणि तुर्की अशा तीन भाषांवर गालिब यांची पकड होती. असे म्हटले जाते की, त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षात लिहण्यास सुरुवात केली होती. त्यांना हिंदी आणि अरेबिक भाषेची जाण होती.
गालिब यांचे शेर हे एखाद्याचे आयुष्य प्रेमाने भारावुन टाकते तसे मात्र त्यांचे खासगी आयुष्य नव्हते. अशातच त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण आज जाणून घेऊयात.
महागड्या आणि इंग्रजी दारुचे शौकिन
संपन्न परिवारात जन्मलेले गालिब यांचे लग्न दिल्लीतील अगदी श्रीमंत घराण्यातील एका मुलीशी झाले. मात्र ते खासगी आयुष्यात आनंदीत नव्हते. त्यांना ७ मुलं होती पण एकही मुलं २ वर्षापेक्षा अधिक काळ जीवंत राहिले नाही. इस्लाम धर्मात दारुला हराम मानले जाते. मात्र गालिब हे त्याला मानत नव्हते. त्यांनी आयुष्यभर दारु पिण्याचा शौक होता. पैशांची किती ही तंगी असतो, भले त्यासाठी शेकडो मील दूर जावे लागले तरीही चालेल पण त्यांना महागडी आणि इंग्रजी दारु पिणे आवडायचे.
जेव्हा दारु मिळाली तेव्हा नमाज सोडून आले
एक दिवस असा ही नव्हता की त्यांना दारु मिळालीच नाही. अशातच एकदा ते नमाज पठणासाठी मस्जिदीत गेले. तेथे त्यांना त्यांचा शागिर्द भेटला आणि त्याच्याकडून त्यांनी दारुची बाटली घेतली व मस्जिदमधून ते बाहेर पडले. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारले, नमाज पठणाशिवाय तुम्ही निघालात? त्या व्यक्तीला उत्तर देत गालिब यांनी म्हटले की, ज्या गोष्टीची दुआ मागण्यासाठी आलो होतो ती अशीच मिळाली आहे.(Mirza Ghalib)
हे देखील वाचा- वयाच्या अवघ्या १० व्या वर्षात गायन करणाऱ्या भूपेन हजारिका यांच्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल
जुगाराच्या लतने तुरुंगात पाठवले
फक्त दारुच नव्हे तर त्यांना जुगार खेळण्याची सुद्धा त्यांना वाईट सवय लागली होती. त्यासाठी त्यांना ६ महिन्याचा तुरुंगवास ही झाला. ते मुघलांच्या काळातील कवि होते. त्यांच्या काळात दिल्लीत बादशाह बहादुर शाह जफर यांचे शासन होते. काही वेळेस बादशाहने गालिब यांना तुरुंगातून सोडावे यासाठी सिफारिश ही केली होती. मात्र एका काळानंतर इंग्रजांचा वाढते वर्चस्व पाहता बादशाहची शान ही कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली गोती. तर १७ फेब्रुवारी १८६९ मध्ये एका उर्दू वृत्तपत्रात त्यांच्या मृत्यूची बातमी छापून आली. त्यांचा मृत्यू १५ फेब्रुवारीला झाला होता. या बातमीमुळे शेरो-शायरीच्या क्षेत्रातील लोकांमध्ये शोक परसला होता.