जेव्हा आपण एखाद्या इमारतीच्या किंवा मॉलच्या लिफ्टमध्ये जातो तेव्हा बहुतांश वेळा लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो. मात्र आरसा हा नेहमीच दरवाज्या समोरील भिंतीवरच का लावला जातो. याबद्दल कधी तुम्ही विचार केला आहे का की, लिफ्टमध्ये आरसा का लावण्यात आलेला असतो? लिफ्टमध्ये आरशाचा काय उपयोग आणि त्यामागे काय कारण आहे. अशाच काही प्रश्नांची आपण आज उत्तरे जाणून घेणार आहोत.(Mirror in Lift)
लिफ्टमध्ये तुम्ही कधी ना कधी आरसाचा वापर केला असेल ना? जेव्हा लिफ्टमध्ये तुम्ही ऐकटे असता तेव्हा लिफ्टच्या आजूबाजूला तुम्ही पाहता. यापूर्वी जेव्हा लिफ्टमध्ये आरसा नव्हता तेव्हा लिफ्टचा वापर करणारे लोक म्हणायचे की, लिफ्ट अधिक वेगाने वर-खाली जायची. काहींना तर लिफ्टमध्ये चक्कर यायची तर अन्य काही व्हायचे. लोक विविध तक्रारी यायच्या. मात्र वास्तवात जेव्हा लिफ्ट आपल्याच स्पीडने चालते. लिफ्टची स्पीड आधीपासूनच जशी होती तशीच आज आहे.

आज काही ठिकाणी लिफ्टमध्ये आरश्यांऐवजी काचा लावल्या जाता. त्यामुळे बाहेरचे सुद्धा दिसून येते. त्यावेळी लोक बाहेरच्या बाजूला पाहत असल्याने त्यांना कळत नाही की, लिफ्ट किती वेगाने चालत आहे. जेव्हा लिफ्टमध्ये आरसा नव्हता तेव्हा लिफ्टच्या भिंती लोक पहायचे.त्यावेळी त्यांचे लक्ष फक्त लिफ्ट किती वेगाने चालत आहे त्याकडे असायचे. परंतु आता आरसा लावल्याने लोक स्वत:ला आरश्यामध्ये पाहत असल्याने त्यांना कोणत्याही दुसऱ्या समस्येचा सामना करावा लागत नाही.
त्याचसोबत आरसा लिफ्टमध्ये लावल्याने लोकांना क्लॉस्टरफोबियापासून दूर राहतात. म्हणजेच सीमित जागेमध्ये वाटणारी भीती. काही लोकांना मर्यादित किंवा कमी जागेच्या ठिकाणी भीती वाटत राहते. लिफ्ट बंद झाल्यास त्यांचा श्वास कोंडू लागतो. अशा विविध कारणामुळे लिफ्टमध्ये आरसा लावला जातो.(Mirror in Lift)
हे देखील वाचा- गाडीमध्ये मागील सीटसाठी सुद्धा सील्ट बेल्ट अनिवार्य, जाणून घ्या काय आहेत नियम
या व्यतिरिक्त उंच इमारतींमध्ये पायऱ्यांच्या माध्यमातून वरती जाणे शक्य नसते. त्यासाठी लोक एलिवेटरचा आधार घेतात. उदाहरणासाठी ३० व्या मजल्याच्या इमारतीसाठी जेव्हा २९ व्या मजल्यावर जायचे असते तेव्हा तुम्ही एलिवेटर किंवा लिफ्टचाच वापर कराल. मात्र अशा लिफ्टमध्ये सुद्धा तुम्हाला आरसा लावलेला दिसून येईल. असे आपण वर पाहिले की, आरसा लावल्याने व्यक्तीचे लक्ष हे आरशाकडे प्रथम जाते. जेणेकरुन ऐकटे असताना होणारी घुसमट सुद्धा दूर होण्यास मदत होते.